एक्स्प्लोर

बुलढाण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; शेगाव पोलीस ठाण्याची अज्ञातांकडून तोडफोड

police station vandalized

Attack on Police Station :  संबंधित परिसरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे, नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यावरच काहींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शेगाव शहर पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. 

मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास एका ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात डीजे पार्टी सुरू असल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाढदिवसाच्या पार्टीत सुरू असलेला डीजे बंद झाला. यानंतर काही वेळेनंतर काही अज्ञातांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. जवळपास 30 जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर धावून आला. 

या जमावाने पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड केली. पोलिसांनी या घटनेबाबत भाष्य करण्यास, माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी आठ ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. 

समाजकंटकांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करत तोडफोड केल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सामान्य नागरिकांविरोधात कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस आता हल्लेखोरांविरोधात किती कठोर कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
Amravati Accident: अमरावती -नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; बाळाच्या जन्माआधीच पित्याचं छत्र हरपलं
अमरावती -नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; बाळाच्या जन्माआधीच पित्याचं छत्र हरपलं
Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
Embed widget