धक्कादाक! रेल्वे लाईनवर रील बनवणं बेतलं जीवावर, रेल्वेच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू
रेल्वे लाईनवर उभं राहून रील बनवणं युवकाच्या जीवावर बेतलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात रील बनवताना रेल्वेच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Buldhana : रेल्वे लाईनवर उभं राहून रील बनवणं युवकाच्या जीवावर बेतलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात रील बनवताना रेल्वेच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शेगाव जवळील आळसना रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. दरम्यान, या घटनेचा LIVE व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.
लग्नाच्या रिसेप्शनसाठी युवक आळसना गावात आला होता
रेल्वे लाईनवर उभ राहून रील बनवताना एका युवकाचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास शेगाव जवळील आळसना रेल्वे स्थानकाजवळ घडली. तर रील बनवताना त्याच्यासोबत असलेल्या त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मृत मुलाचे नाव हे शेख नदीम शेख रफिक असून तो खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील रहिवासी आहे. तो आज आळसना गावात लग्नाच्या रिसेप्शनसाठी आला होता.
कानात हेडफोन लावलेला असताना रेल्वे आल्याचे शेख नदीमला कळलं नाही
आज पाच वाजण्याच्या च्या दरम्यान गावाजवळ असलेल्या रेल्वे लाईनवर रील बनवण्याचा मोह या युवकाला आवरला नाही. तो मित्रासह रेल्वे लाईन वर रील बनवण्यासाठी गेला होता. दरम्यान रील बनवण्यात मग्न असताना व कानात हेडफोन लावलेला असताना रेल्वे आल्याचे शेख नदीमला कळलं नाही आणि तो रेल्वेच्या खाली आल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. दुसरीकडे रील बनवताना हजर असलेला नदीमचा मित्र सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. गेल्याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यातही रेल्वे लाईनवर रील बनवताना दोन युवकांना प्राणाला मुकावे लागले होते. त्यामुळं एबीपी माझा आपल्याला आवाहन करत आहे की धोकादायक ठिकाणी रील बनवू नका.
सध्या सोशल मीडियावर रीलचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर
सध्या सोशल मीडियावर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या ठिकाणी रीलचे ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. तरुण-तरुणी कुठल्याही ठिकाणी रील काढायला मागेपुढे बघत नाही. यामुळे आपला जीव जाऊ शकतो याची देखील चिंता या रील काढणाऱ्यांना नसते. अशीच एक घटना आज बुलढाणा जिल्ह्यात देखील घडली आहे. रील बनवताना रेल्वेच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
महत्वाच्या बातम्या:

























