सोशल मीडियावर भाईगिरीचा रील बनवणं पडलं महागात, जळगाव पोलिसांनी घडवली अद्दल
भाईगिरीचे रील बनवणाऱ्या एता तरुणाला जळगाव पोलिसांनी चांगंलीच अद्दल घडवली आहे. सोशल मीडियावर भाईगिरीचा रील बनवणं या तरुणाला महागात पडलं आहे.
Jalgaon Crime News : भाईगिरीचे रील बनवणाऱ्या एता तरुणाला जळगाव पोलिसांनी चांगंलीच अद्दल घडवली आहे. सोशल मीडियावर भाईगिरीचा रील बनवणं या तरुणाला महागात पडलं आहे. त्याच्यावर कारवाई करत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इमरान भिस्ती असं या युवकाचं नाव आहे. पोलीस स्थानकात आणल्यानंतर इमरानने माफी मागणारा व्हिडिओ बनवला आहे. इमरान भिस्तीवर पोलिसांची प्रतिबंधकात्मक कारवाई केली आहे.
व्हिडिओंद्वारे समाजात भीती पसरवणाऱ्या तरुणांना पोलिसांचा इशारा
जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या इमरान भिस्ती या तरुणाने सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारा एक रील बनवून व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करत इम्रानला घरुन ताब्यात घेतले होते. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर इम्रानला खाक्या दाखवताच त्याने लगेच माफी मागणारा व्हिडिओ बनवला. इम्रान विरुद्ध प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या व्हिडिओंद्वारे समाजात भीती पसरवणाऱ्या तरुणांना इशारा देत सांगितले की, भाईगिरी दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
महत्वाच्या बातम्या:


















