एक्स्प्लोर

Swabhimani Shetkari Saghtana : दुपारी 12 वाजता बुलढाण्यात स्वाभिमानीचा 'एल्गार', 30 ते 40 हजार शेतकरी येण्याची शक्यता

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana ) वतीनं बुलढाण्यात (Buldhana) 'एल्गार मोर्चा' काढण्यात येणार आहे.

Swabhimani Shetkari Saghtana : अतिवृष्टीनं झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळावा यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana ) वतीनं बुलढाण्यात (Buldhana) 'एल्गार मोर्चा' काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला राज्याच्या विविध जिल्ह्यातून 30 ते 40 हजार शेतकरी येणार असल्याची माहिती तुपकारांनी दिली आहे. दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून, एक वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

परतीच्या पावसाचा पिकांना फटका

आज होणाऱ्या 'एल्गार मोर्चा'साठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोठी तयारी केली आहे. विदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी हा मोर्चा महत्त्वाचा मानला जात आहे. परतीच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांची उभी पिकं वाया गेली होती. शेतकऱ्यांची हाती येणारी पिकं वाया गेल्यानं राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची पिकं या पावसाच्या फटक्यातून वाचली आहे, त्या पिकांना योग्य दर मिळावा, यासाठी आजचा एल्गार मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांनी संवाद साधला आहे. मोठ्या प्रमाणावर जागृती केली आहे. त्यामुळं मोठ्य संख्येनं शेतकरी या मोर्चात सामील होण्याची शक्यता आहे.

पाठीशी भक्कम उभे राहण्यासाठी मोर्चात सामील व्हा

दरम्यान, शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, नोकरदार, व्यापारी, विचारवंत, साहित्यिक, दुकानदार अशाच सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी बळीराजाच्या पाठिशी उभं राहावं असे आवाहन रविकांत तुपकरांनी केलं आहे. आपल्या ताटातला अन्नाचा कण अन्  कण शेतकऱ्याच्या घामाने पिकला आहे. शेतकऱ्यांनी अन्न पिकवणे बंद केलं तर आपण काय खाणार? अजून तरी टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यांमध्ये अन्न निर्मितीची सोय झालेली नाही. अन्नधान्य निर्मितीचे तंत्रज्ञान विकसितच झालेलं नाही. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही आणि देश सुद्धा टिकू शकत नाही, असे तुपकर म्हणाले. बळीराजाची फौज आपल्या घामाचे दाम मागण्यासाठी मोठ्या संख्येनं बुलढाण्यात दाखल होत आहे. राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात ही आपल्या बुलढाण्यातून होत आहे. या बळीराजाच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी, त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती देण्यासाठी या 'एल्गार मोर्चा'त आपण सहभागी व्हावं, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून धार द्या. तुम्हा शहरवासीयांच्या आधाराची शेतकऱ्यांना प्रचंड आवश्यकता असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 04 January 2024Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभुती घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 04 January 2024ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 04 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Embed widget