Buldhana Accident Live Updates : ''समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो 'देवेंद्र'वासी...''; बुलढाणा बस अपघातावर शरद पवार काय म्हणाले?

Buldhana Accident Live Updates : बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे

abp majha web team Last Updated: 01 Jul 2023 03:59 PM
Sharad Pawar : ''समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो 'देवेंद्र'वासी...''; बुलढाणा बस अपघातावर शरद पवार काय म्हणाले?
Sharad Pawar on Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो 'देवेंद्र'वासी होतो असे लोक सांगतात, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. Read More
Buldhana Accident : समृद्धी महामार्गानं केली मायलेकींची ताटातूट; अवंतीसाठी आईनं पाहिलेलं 'मेकअप आर्टिस्ट'चं स्वप्न एका रात्रीत भंगलं
Buldhana Bus Accident : पुण्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघालेल्या अवंती पोहनेकर या 25 वर्षीय तरुणीचा बुलढाण्याच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि तिच्या स्वप्नांचे पंख तिथेच कोलमडून पडले. Read More
Buldhana Accident : ड्रायव्हरला झोप आल्याने बुलढाणा बस अपघात? रोड हिप्नॉसिस म्हणजे काय?
Buldhana Bus Accident : बुलढाण्याचील भीषण बस अपघात ड्रायव्हरला थकवा किंवा झोप आल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचं नेमकं कारण काय? Read More
फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर आतापर्यंत 900 अपघात, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी दुसऱ्यांचा स्वप्नभंग का? खडसे बरसले
Eknath Khadse on Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरुन एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे. Read More
Nashik Bus Accident : तारीख होती 08 ऑक्टोबर, भल्या पहाटेची वेळ; काळजाचा थरकाप उडविणारा नाशिक बस अपघात 
Nashik Bus Accident : नाशिकच्या मिरची चौफुलीवर बस आग दुर्घटना घडली होती, आज बुलढाण्यात अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. Read More
Buldhana Accident : पाहा बुलढाणा बस अपघातातील मृत प्रवाशांची नावं 

बुलढाणा बस अपघातातील मृत प्रवाशांची नावं 


मृत –



  1. रामदास पोकळे

  2. करण बुधबावरे

  3. वृषाली वनकर

  4. इशांत गुप्ता

  5. शृजान गुप्ता

  6. मेघना तायडे

  7. तेजु राऊत

  8. कैलाश गंगावणे

  9. संजीवनी धोटे

  10. कौस्तुभ काळे

  11. सुशील केळकर

  12. गुडिया शेख

  13. राजश्री गांडोळे

  14. राधिका खडसे

  15. प्रथमेश खोडे

  16. अवंती पोहणेकर

  17. निखिल पाटे

  18. कांचन गंगावणे

  19. ऋतुजा गंगावणे

  20. शोभा वनकर

  21. ओवी वनकर

  22. अरविंद राठोड – चालक

  23. तेजस पोकळे

  24. श्रेया वंजारी

  25. तनिषा तायडे


बुलढाणा बस अपघातातील जखमी प्रवाशांची नावं 



  1. संदीप राठोड – क्लीनर

  2. साईनाथ पवार

  3. पंकज गाडगे

  4. योगेश गवई

  5. शशिकांत गजभिये

  6. आयुष गाडगे

  7. दानिश शेख इस्माईल- चालक


 

Imtiaz Jalil: अपघात नव्हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केलेली हत्या; बुलढाणा अपघातावर जलील यांची प्रतिक्रिया
Imtiaz Jaleel : बुलढाणा अपघाताला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही जबाबदार असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.  Read More
BJP Morcha : बुलढाणा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आजचा मोर्चा रद्द, ठाकरे गट मात्र मोर्चावर ठाम
BJP Morcha Cancelled : बुलढाणा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आजचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे, तर ठाकरे गट आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यावर ठाम आहे. Read More
समृद्धी महामार्गावर आतापर्यंत 900 जणांचे बळी, उपायोजना केल्या पाहिजेत : एकनाथ खडसे

Eknath Khadse : समृध्दी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून या अपघातामध्ये अनेकांचे स्वप्न भंग पावत आहेत. आजचा अपघात हा फारच दुर्देवी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. समृध्दी महामार्गवर आतापर्यंत 900 जणांचे बळी गेले असून राज्य सरकारने या अपघाताची कारणे शोधली पाहिजेत. यावर उपायोजना केल्या पाहिजे. रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी  काही दिवसापूर्वी म्हटले होते की रस्ते प्राधिकरणाच्या नियमांचे प्रवाशी वर्गाकडून पालन केले जात नाही. ते केले गेले पाहिजे असे गडकरी म्हणाले होते असे खडसे म्हणाले.

Buldhana Accident : नोकरी शोधण्यासाठी पुण्यात निघालेल्या 23 वर्षीय निखिलचा अपघातात मृत्यू

Buldhana Accident : विदर्भ ट्रॅव्हलच्या अपघातात यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील गोंधळी या गावाचा 23 वर्षीय निखिल पाथेचा मृत्यू झाला आहे. तो कामाच्या शोधत पुणे येथे जात होता. त्याचा भाऊ हर्षद पाथे याने ही माहिती सांगितली आहे. निखिलच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून कुठल्याही कामधंदा नसल्याने तो पहिल्यांदाच पुणे येथे नोकरी शोधण्यासाठी काल रात्री 8 वाजता निघाला होता. काल रात्री त्यांचा भाऊ हर्षद याने त्याला ट्रॅव्हल्समध्ये बसवून दिले होते. तो पुणे येथे पोहचल्यानंतर सकाळी 5 हजार पाठवणार होता. मात्र, दुर्दैवाने सकाळी त्याच्या अपघाताची बातमी कळली. हे सगळे सांगत असताना त्यांच्या डोळयांत अश्रू तराळले.

लोखंडी खांबाला धडकून अचानक स्फोट, 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघातापूर्वीचा EXCLUSIVE Video
Buldhana Accident: वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील न्यू राधाकृष्ण रेस्टॉरंट या ठिकाणी काल रात्री 9.50 मिनिटांनी विदर्भ ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबली होती. त्या ठिकाणचा EXCLUSIVE CCTV व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. Read More
प्रत्येक जीव महत्वाचा, असे अपघात होऊन चालणार नाही : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde : ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. असे अपघात होऊन चालणार नाहीत. प्रत्येक जीव महत्वाचा आहे. सगळ्या उपाययोजना करण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवाजा खाली अडकल्याने प्रवाशांना बाहेर येता आले नाही. नाहीतर प्रवासी वाचले असते असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. काही बाबतीत ते घटना दिसत नाही. अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


 

बुलढाणा अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण, अशा घटना कधीच होणार नाहीत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत : राज ठाकरे





Raj Thackeray : बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्र्क ड्रायव्हर तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत.







Buldhana Accident : बुलढाणा अपघातस्थळी जाणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर तपासणी
Buldhana Accident : मुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरून करणार असल्याने त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर आरटीओकडून तपासणी करण्यात आली आहे.  Read More
Buldhana Accident : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अपघातस्थळी दाखल

Buldhana Accident : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. ते अपघातस्थळाची पाहणी करत आहेत. यानंतर दोघेही रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत.


 

समृद्धी महामार्गावर राज्य सरकारकडून उपाययोजना नाहीत, खासदार विनायक राऊतांची टीका

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन अगदी ढोल वाजवत केलं, मात्र वर्षभर झालं जे अपघात होतात त्यावर राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात नसल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केली.


समृद्धी महामार्ग सुरू करण्याची घाई केली आणि आता अशा अपघातांच्या घटना होताना दिसतायेत


दुर्घटना झाली याबद्दल आम्ही संवेदनशील आहोत पण आमचा मोर्चा मुंबईत निघणार कारण हा मुंबईकरांच्या प्रश्नासाठी निघालेला मोर्चा आहे.


 

Buldhana Accident : बुलढाणा अपघातात जखमी झालेल्यांची नावे

Buldhana Accident : बुलढाणा अपघातात जखमी झालेल्यांची नावे


योगेश गवई
सहिणाठ पवार
शशिकांत गजभिये
पंकज गाडगे.
शेख दानिश ड्रायव्हर
संदीप राठोड कंडक्टर

Buldhana Accident : मुलाला कॉलेजला सोडून पुण्यात परतताना काळाचा घाला; पुण्यातील शिक्षक कुटुंबीयांचा 'हा' फोटो ठरला अखेरचा
बुलढाणामधील बस दुर्घटनेनं पुण्यातील एका शिक्षकाच्या कुटुंबावर घाला घातला. हे नागपूरला मुलाला महाविद्यालयात सोडायला गेले होते. तिथंच मुलाला निरोप दिल्यानंतर त्यांनी काढलेला अखेरचा फोटोही समोर आला आहे. Read More
Buldhana Accident : चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानेचं दुर्घटना, नागपूर परिवहन विभागाचा अहवाल

Buldhana Accident : चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानेचं दुर्घटना झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागानं दिला आहे. बसचे टायर फुटल्यानं या बसचा अपघात झाला नसल्याची माहिती नागपूर परिवहन विभागानं दिली आहे.  

Nashik Police Accident : गाडीवर झाड कोसळलं, नाशिकच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू, पोलीस क्षेत्र हळहळलं
Nashik Police Accident : नाशिक येथून एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या गाडीवर झाड कोसळले. Read More
Uddhav Thackeray : या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा अपघातावरुन उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

Uddhav Thackeray on Buldhana Accident : बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 25 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हे वृत मन हेलावणारे असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले आहेत. सरकारनं अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे उद्धव टाकरेंनी म्हटलंय.

Buldhana Accident : मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत, पंतप्रधानांची माहिती

Buldhana Accident :  बुलढाणा बस अपघाताच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.  



हा अपघात नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेला घात, बुलढाणा अपघातावरुन इम्तियाज जलील यांची
MP Imtiyaz Jaleel : खासदार इम्तियाज जलील यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर अपघाताच्या घटनेवरुन सडकून टीका

मी याला अपघात म्हणणार नाही हा घात आहे. हा घात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला असल्याचे जलील म्हणाले. 


आज फक्त ते पाच लाख रुपये देणार असल्याची घोषणा करण्यासाठी येत आहेत


आपल्या राजकीय स्वार्थासाठी मीडिया इव्हेंट करुन समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले


राजकीय श्रेय घेण्यासाठी कोणतीही रोड शेफटी न पाहता हे उद्घाटन करण्यात आले

Accident : बारामतीतील प्रसिद्ध वकील अमर काळे यांच्या नातेवाईकांचा बुलडाणा येथील अपघात मृत्यू

Accident : बारामतीतील प्रसिद्ध वकील अमर काळे यांच्या नातेवाईकांचा बुलडाणा येथील अपघात मृत्यू झाला आहे. या अपघातात काळे यांची सख्खी बहीण, दाजी आणि भाचीचा मृत्यू झाला असल्याची माहिती अमर काळे यांनी दिली. अमर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात त्यांची सख्खी बहीण कांचन गंगावणे, दाजी कैलास गंगावणे आणि भाची ऋतुजा गंगावणे हीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत झालेल्या लोकांच्या मृतदेहाची ओळख पटत नाहीये. त्यामुळे कदाचित डीएनए टेस्ट करावी लागेल असे काळे यांनी सांगितले. सरकारी यंत्रणा सध्या काम करीत आहेत. घटनास्थळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचल्यानंतर ते निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय झाल्यानंतर मृतदेह आमच्या ताब्यात देणार आहेत. काळे सध्या पुण्याहून बुलढाण्याला चालेल आहेत.

Buldhana Accident : पाहा अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्म्ध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी

Buldhana Accident : अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्म्ध्ये प्रवास करणाऱ्यांच्या नावांची यादी आली आहे. 



Buldhana Accident : मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून जखणींची विचारपूस

Buldhana Accident : मंत्री गिरीष महाजन यांनी अपघातस्थळी भेट दिली. तसेच त्यांनी या आपघातात जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. 

LLB च्या शिक्षणासाठी मुलाला नागपुरला सोडलं, माघारी परतताना काळाचा घाला; मुलीसह गंगावणे दामप्त्याचा अपघातात मृत्यू

Buldhana Accident :  पहाटे झालेल्या अपघातामध्ये कैलास गंगावणे आणि राधिका गंगावणे यांच्यासह त्यांची मुलगी सई गंगावणे यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. कैलास गंगावणे हे आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर नावाच्या गावात हायस्कूल शाळेत शिक्षक होते. त्यांच्या मुलाला नागपूर येथे एलएलबीला अॅडमिशन मिळालं होतं. त्यासाठी मुलाला सोडण्यासाठी हे दांपत्य आपल्या मुलीसह गेलं होतं. माघारी येताना अपघातामध्ये या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार सईला सध्या आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला होता. आपल्या भावाला नागपूरला सोडण्यासाठी ती देखील आपल्या आई-वडिलांसोबत गेली होती. गंगावणे कुटुंबीय मूळचे शिरूरचे रहिवासी आहे.

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे अपघातस्थळाला भेट देण्यासाठी रवाना

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या निवासस्थानाहून बुलढाण्यातील अपघातस्थळी जाण्यासाठी निघाले आहेत. ते थोड्याचे वेळात मुंबई विमानतळावरुन बुलढाण्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत. 

Buldhana Accident : अपघाताच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. बस दुभाजकाला धडकल्यामुळं डिझेलची टाकी फुटीन बसला आग लागली. त्यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आठ जण सुखरुप बाहेर आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवून देण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींचा रुगणालयाचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपाययोजना करत आहोत. याठिकाणी अपघात होणार नाहीत यासाठी प्रयत्न करत आहोत. 


समृद्धी महामार्गाचे काम अतिशय चांगले करण्यात आले आहे. त्याठिकाणी स्मार्ट सिस्टीम लावण्याचे काम करण्यात येणार आहे. 

Buldhana Accident : मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार, बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Buldhana Accident :  मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात येणार असल्याची माहिती बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


 

अपघाताची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी : उपमुख्यमंत्री

Buldhana Accident : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.
जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.

अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी, सरकारने समृद्धी महामार्गावर त्वरीत उपाययोजना कराव्या : शरद पवार

Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना. या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते.

कोणत्या जिल्ह्यातील किती प्रवासी? विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दराने यांनी दिली माहिती

Buldhana Accident : नागपूरमधून 8 प्रवाशांनी, वर्ध्याहून 14, यवतमाळहून 3 प्रवाशांनी बुकींग केलं होते. यामध्ये 2 चालक 1 क्लीनर होता अशी माहिती विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दराने यांनी दिली. 


 

Buldhana Accident : यवतमाळधील सहा प्रवाशांपैकी चार जण बचावले

Buldhana Accident : यवतमाळ येथील दोन चालक आणि एक क्लीनर आणि तीन प्रवाशी होते. यातील चार जण बचावले आहे. 


बचावलेल्या प्रवाशांची नावे 



1) शेख दानिश शेख इस्माईल- चालक
2)) अरविंद राठोड- चालक
3) संदीप राठोड- क्लीनर
4) शशिकांत गजभिये - प्रवाशी

Buldhana Accident :  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अपघातस्थळी भेट देणार

Buldhana Accident :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अपघातस्थळी भेट देणार आहेत. तसेच जखमींची भेट घेऊन विचारपूस देखील करणार आहेत.  

बुलढाणा अपघाताची घटना अत्यंत दुःखद, अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं उपाययोजना कराव्यात : अजित पवार

Ajit Pawar : नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा - सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी करतो.

बुलढाणा बस अपघाताची घटना वेदनादायी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 

बुलढाणा बस अपघाताची घटना वेदनादायी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 

Buldhana Accident : मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती   

Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. 

अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी, खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाच्या मुद्याचा शासनानं विचार करावा : सुप्रिया सुळे

Supriya Sule : सिंदखेडराजा जि. बुलढाणा परिसरात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटली. या अपघातात काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा ही विनंती.

अपघातग्रस्त बस नागपूरहून पुण्याकडे निघाली होती

Buldhana Accident :अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावळेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.  

Buldhana Accident : बुलढाणा बस अपघातात वर्ध्यातील 14 प्रवाशांचा समावेश

Buldhana Accident : समृद्धी महामार्ग इंथं झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातात वर्ध्यातील 14 प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. वर्ध्यात एकूण 14 प्रवाशांची बुकिंग झाली होती. यामध्ये सहा महिला आणि आठ पुरुष प्रवाशांचा समावेश आहे. वर्ध्यातून सायंकाळी साडेसात वाजता सावंगी टी पॉईंटवरुन हे प्रवासी बसले होते. 

पार्श्वभूमी

Buldhana Accident Live Updates : बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.


बस विदर्भ ट्रॅव्हल्सची 


अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावळेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.  


बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही


बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले. पोलीस आणि घटनास्थळी असलेल्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढे जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.