फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर आतापर्यंत 900 अपघात, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी दुसऱ्यांचा स्वप्नभंग का? खडसे बरसले
Eknath Khadse on Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरुन एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.
Eknath Khadse on Buldhana Accident : समृद्धी महामार्गवर (Samruddhi Mahamarg) झालेला हा अपघात दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतरांची स्वप्न भंग करणं योग्य होणार नाही, असा खोचक टोला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणीस यांना लगवला आहे.
राष्ट्रवीदीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे बोलताना म्हणाले की, "समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा ड्रिम प्रोजेक्ट असून या अपघातातमध्ये अनेकांचं स्वप्न भंगलं आहे. आजचा अपघात हा फारच दुर्देवी अपघात असून समृद्धी महामार्गवर आतापर्यंत 900 अपघात झाले आहेत. राज्य सरकारनं या अपघातांची कारणं शोधली पाहिजे, यावर उपायोजना केल्या पाहिजेत. रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूवी म्हटलं होतं रस्ते प्राधिकरणाच्या नियमांचं प्रवाशी वर्गाकडून पालन केलं जात नाही, ते केलं गेलं पाहिजे."
पाहा व्हिडीओ : Eknath Khadse on Buldhana Bus Accident : फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर आतापर्यंत 900 अपघात
बुलढाण्यातील अपघातात 25 जण दगावले, नेमका अपघात कसा झाला?
"बस रात्री 1.35 च्या सुमारास नागपूरहून पुण्याकडे जात असताना सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावानजीक एका खांबावर जाऊन आदळली. याबाबत ड्रायव्हरला विचारलं असता टायर फुटल्यानं बस जाऊन आदळल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर खांब बाजूला जाऊन उडाला. त्याचवेळी बस पुढे जाणाऱ्या डिझेल टँकरवर जाऊन आदळली. डिझेल टँकचा स्फोट झाला आणि मोठ्या स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर गाडी सुमारे 30 ते 40 फुट पुढे जाऊन पलटी झाली आणि अचनाक गाडीत आग लागली.", अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. तसेच, गाडीचा अपघात झाला त्यावेळी प्रवासी गाडीत झोपले होते. त्यामुळे गाडीचा अपघात झाला याबाबत अनेकांना कल्पना नव्हती. त्यावेळी जेवढे प्रवासी काचा फोडून बसबाहेर पडले, तेवढे प्रवासी सुखरुप बचावले आहेत, अशी माहितीही पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.
बसमधील सर्वाधिक प्रवासी हे नागपूरचे होते. त्यानंतर बस मध्ये यवतमाळला थांबली होती. त्यामुळे यवतमाळमध्येही काही प्रवासी बसमध्ये चढल्याची माहिती मिळत आहे. अजून कोणते प्रवासी कुठून बसमध्ये चढले याबाबत मात्र योग्य माहिती अद्याप हाती आलेली नाही, असंही पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :