एक्स्प्लोर

तळीरामांना अद्दल, पुष्पमाला घालून महिलांची गांधीगिरी

बुलडाणा : गावातील दारुचं दुकान हटवण्याची मागणी करुनही प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्यामुळे महिलांनी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी केली आहे. देशी दारुच्या दुकानातून बाहेर पडणाऱ्या तळीरामांच्या गळ्यात पुष्पमाला घालून त्यांना लाज आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुलडाणा जिल्हयातल्या धाड गावातील देशी दारुचे दुकान बाहेर काढण्यासाठी गावातील महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्याप प्रशासनाने याबाबत कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी चक्क दारुच्या दुकानासमोर गांधीगिरी करुन देशी दारुच्या दुकानात जाणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या मद्यपींच्या गळ्यात फुलांचे हार घातले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महिलांच्या या कारवाईचं कौतुक होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुख्य मार्गापासून 500 मीटर अंतरावरील दोन देशी दारुची दुकानं बंद झाली. मात्र धाड गावातील एक दुकान अद्याप सुरु आहे. परिणामी या ठिकाणी दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली असून प्रमाणाबाहेर गर्दी होत आहे. याचा सर्वाधिक त्रास गावातील महिला, वृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांना होत आहे. यासंदर्भात गावातील 300 पेक्षा जास्त महिलांनी 1 मे रोजी ग्रामसभेत आग्रही मागणी करत दारुचं दुकान हे गावाबाहेर हटवण्याचा ग्रामसभेचा ठराव घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 15 दिवसाची मुदत दिली. मात्र आजपर्यंत यावर कुठलीच कारवाई न झाल्याने अखेर धाड येथील महिलांनी मंगळवारी संध्याकाळी देशी दारुच्या दुकानासमोर जमून दारु पिण्यासाठी येणाऱ्या तळीरामांचा पुष्पहार घालून गांधीगिरी करत 'सत्कार केला'. या अभिनव आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 09 PM TOP Headlines : 9 PM 21 September 2024Sachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वरPrataprao Jadhav On Electricity : 'माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि मी कधीच वीज बिल भरलं नाही'- जाधवPrakash Ambedkar On Vidhansabha Seats : प्रकाश आंबेडकरांकडून विधानसभेसाठी ११ उमेदवार जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Embed widget