एक्स्प्लोर

सहा मुलींवर अत्याचाराचा संशय, वैद्यकीय तपासणी बाकी : सावरा

बुलडाणा : बुलडाण्यातील आश्रमशाळेत किमान सहा मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्या मुलींची वैद्यकीय तपासणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढत असल्याचं विष्णु सावरा म्हणाले. खामगाव तालुक्यातील पाळा इथल्या कोकरे आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली. दरम्यान, शाळेला भेट देण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विष्णु सावरा यांच्या ताफ्याला घेराव घालून त्यांना काळे झेंडे दाखवले. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कार्यकर्ते पांगले. यावेळी एकनाथ खडसे आणि पांडुरंग फुंडकरही त्यांच्यासोबत होते.

बुलडाणा बलात्कार: आश्रमशाळेतील आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार

दुसरीकडे आश्रमशाळेतील मुलींच्या सुरक्षितता धोक्यात आणल्याने आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार : केसरकर या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल आणि आरोपींवर पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे.

बुलडाणा बलात्कार : आरोपी इतू सिंग आश्रमशाळेसाठी मुली जमवायचा

काय आहे प्रकरण? खामगाव तालुक्यातील पाळा इथं निनाभाऊ कोकरे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आहे. इथे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. दिवाळीच्या सुट्ट्यामुळे बहुतेक विद्यार्थी गावी गेले आहेत. मूळची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या एक विद्यार्थिनीही या शाळेत शिकते. ती सुट्टीसाठी घरी आली, तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होत असल्याचं, तिने पालकांना सांगितलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं. पीडित 10 वर्षीय चिमुकली चौथीत शिकते. तिच्यावर अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर, पालकांनी हलखेडा गावच्या पोलीस पाटील आणि सरपंचांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याबाबतची तक्रार पोलिसात दिली आणि हे मोठं प्रकरण जगासमोर आलं. बुलडाण्यातील बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे ही घटना दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी घडली आहे.

बुलडाण्यातील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  बुलडाणा बलात्कारप्रकरणी कोणा-कोणाविरोधात गुन्हा? *इतूसिंग पवार – मुख्य आरोपी *भरत लाहुडकर – मुख्याध्यापक *दिगंबर खरात – शिक्षक *स्वप्नील लाठे – प्रयोगशाळा सहाय्यक *नारायण आंबोरे – वसतीगृह अधीक्षक *दीपक कोकरे – आश्रमशाळा मदतनीस *विजय कोकरे – क्लार्क *ललिता वजिरे – वसतीगृह अधीक्षक *मंथन कोकरे – स्वयंपाकी *राऊत मावशी – स्वयंपाकी

बुलडाणा: आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना

  आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार : नवाब मलिक दरम्यान, बुलडाण्यातील आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे. शिवाय महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी नवाब मालिक यांनी केली. याप्रकरणी सुरुवातील 7 जणांना अटक केली होती. तर गुरुवारी रात्री आणखी 4 जणांना अटक बेड्या ठोकल्या. त्यामुळे आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे.

बुलडाणा : आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी आणखी 4 जणांना बेड्या

  तपासासाठी एसआयटीची स्थापना बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत. याशिवाय नागपूर सीआयडी विभागाच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग या खामगावला भेट देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर यांच्या निदर्शनाखाली होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget