एक्स्प्लोर
Advertisement
म्हशीपासून क्लोनिंगद्वारे म्हशीची उत्पत्ती, चितळे प्रोजेक्टमध्ये प्रयोग यशस्वी
जागतिक पातळीवर दूध व्यवसायाचा विचार केला तर दुभत्या जनावरांची संख्या सर्वाधिक भारतात आहे. मात्र, जगाच्या तुलनेत दूध उत्पादनाचा वाटा केवळ 10 टक्के आहे.
सांगली : म्हशीपासून क्लोनिंगद्वारे म्हशीची उत्पत्ती करण्याचा प्रयोग सांगलीच्या चितळे प्रोजेक्टमध्ये यशस्वी झालाय. देशातील हा पहिलाच प्रयोग असून, यामध्ये 32 किलो वजनाच्या रेडीचा जन्म झालाय. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जन्म घेतल्यानं या छोट्या म्हशीचं नाव दुर्गा ठेवण्यात आलंय. नर-मादीचा प्रयोग न करता, फक्त जास्त दूध देणाऱ्या म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाद्वारे हे प्रजनन करण्यात आलंय.
नर आणि मादीच्या मिलनातून अथवा कृत्रिम रेतनातून नर आणि मादींच्या जन्माची टक्केवारी समान असते. यामुळे जन्मास येणाऱ्या नरामुळे दूधाचे उत्पादनही कमी होते. यावर तोडगा काढण्यासाठी आणि केवळ अधिक दूध देणाऱ्या मादीचा जन्म कृत्रिम रेतनाद्बारे करण्यासाठी गेली तीन वर्षे चितळे डेअरीच्या संशोधन विभागात सुरु होते. नरापासून मिळणाऱ्या सिमेन्समधून स्त्रीबीजाचे विलगीकरण करून त्याचे अधिक दूध देणाऱ्या आणि आशियाई हवामानात टिकू शकणाऱ्या दुभत्या जनावरावर येथील ब्रम्हा प्रकल्पात संशोधन करण्यात येत होते.
म्हैस आणि गाय या पशूंना कृत्रिम रेतन करण्यासाठी 100 हून अधिक रेडे आणि वळू याठिकाणी जोपासले जात असून यापैकी 'महाबली' या रेड्याच्या सिमेन्सचा या प्रयोगासाठी वापर करण्यात आला. सिमेन्समधील स्त्री बीज विलग करुन त्याचे मुर्हाध म्हशीच्या गर्भामध्ये रोपण करण्यात आले. हे रोपण यशस्वी झाले असून हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याचे जीनस एबीएसचे संचालक विश्वास चितळे यांनी सांगितले आहे.
या सर्व संशोधनातून चितळे डेअरीमध्ये जन्माला आलेली रेडी देखील नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जन्माला आली. यामुळे चितळे बंधूनी तिचे नाव दुर्गा असे ठेवले आहे. जन्मताच तिचे वजन 32 किलो असून अधिक स्निग्धांशाचे दूध देणारी मुर्हाध जातीची म्हैस ही या रेडीची आई आहे. सर्वसाधारण म्हशीचे दूध 1200 लिटर मिळत असताना या जातीकडून आता 4 हजार लिटरपर्यंत दूध मिळण्यास मदत होणार आहे.
हा प्रयोग यशस्वी होताच हरियाणाच्या राज्य शासनाने 1 लाख 20 हजार स्त्री बीजांची नोंदणी केली असून संकरित गाईंसाठीही हे संशोधन येथे करण्यात आले आहे. संकरित गाईंच्या स्त्रीबीजाची श्रीलंका, व्हिएतनामला निर्यात करण्यात येत असल्याचेही चितळे यांनी माहिती दिलीय.
जागतिक पातळीवर दूध व्यवसायाचा विचार केला तर दुभत्या जनावरांची संख्या सर्वाधिक आपल्या देशात आहे. मात्र, जगाच्या तुलनेत दूध उत्पादनाचा वाटा केवळ 10 टक्के आहे. जनावरापासून मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण कमी असल्याने दूधाच्या परिमाणात वाढ होण्यासाठी याच पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. चितळेंच्या ब्रम्हा प्रकल्पातून दरवर्षी 35 ते 40 लाख सिमेन डोसचे उत्पादन केले जात आहे. चितळे उद्योग समूहाने काउज टू क्लाउड हा उपक्रम गेली 7 वषे राबविला आहे. यामध्ये 10 हजार जातीवंत गाई व म्हैशींची संगणकीय नोंद करण्यात आली आहे. याद्बारे म्हशीच्या आरोग्याची काळजी देखील घेण्यात येते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement