एक्स्प्लोर
अभिनेत्री हिना खानने रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; प्रेमळ जोडप्याचे लग्नानंतरचे सुंदर फोटोशूट
टेलिव्हीजन अभिनेत्री हिना खान हिने तिचा अनेक वर्षांपासूनचा बॉयफ्रेंड असलेल्या रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीच्या एका लहानशचा कार्यक्रमात गुपचूप लग्न उरकलं.
Hina Khan Gets Married Rocky Jaiswal
1/9

टेलिव्हीजन अभिनेत्री हिना खान हिने तिचा अनेक वर्षांपासूनचा बॉयफ्रेंड असलेल्या रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीच्या एका लहानशचा कार्यक्रमात गुपचूप लग्न उरकलं.
2/9

हिना खानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियातून समोर आले असून तिनेही इंस्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. त्यामध्ये, हे जोडपं अतिशय सुंदर दिसून येत आहे
3/9

ब्रेस्ट कँसरच्या रोगाने त्रस्त असलेल्या हिना खानने तिचा प्रियकर मित्र रॉकीसोबत कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले. डिझाईनर मनिष मल्होत्राच्या डिझाईनची ओपन ग्रील साडी तिने परिधान केली होती.
4/9

पांढर्या क्रीम कलची ओपन ग्रीड साडी आणि हलक्या गुलाबी रंगाच्या ब्लाऊजवरच हिनाचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. लग्नातील पारंपरिक पोशाखात दोघेही सर्वांचे लक्ष वेधत होते.
5/9

सोन्याचे दागिने, हातावरील सुंदर नक्षीकाम केलेली मेहंदी आणि मोकळे सोडलेले केस हिनाच्या सौंदर्याला अधिक उजळून टाकत होते.
6/9

आपल्या साडीच्या पदरावर हिनाने तिचे आणि तिच्या पती रॉकीचे नावही डिझाईन केले होते, रॉकीने व्हाईट कुर्ता परिधान केला होता.
7/9

हिनाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये हिना खान पेपरवर सही करताना दिसून येते, म्हणजेच तिने कोर्ट मॅरेजच्या पेपरवर सही केल्याचं पाहायला मिळत आहे.
8/9

आपल्या जोडीदारासमवेत तिने प्रेमळ पोज देत फोटो काढले असून हातातील बांगड्या आणि पायातील पैंजणही लक्ष वेधून घेत आहे.
9/9

हिनाने फोटोसह भावनिक बंध निर्माण करणारे कॅप्शन दिले आहे, दोन वेगवेगळ्या जगातून आम्ही आपलं नवं विश्व उभारलंय. आमच्यातील वाद संपला, आम्ही सहह्रदयी बनलो आहोत. आता एक नातं असं तयार झालंय ते आयु्ष्यभर जपलं जाईल.
Published at : 04 Jun 2025 08:43 PM (IST)
आणखी पाहा























