(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldana News : लग्न जुळत नाही म्हणून शेतकरी तरूणाची आत्महत्या, स्वतःच सरण रचून त्यात घेतली उडी
Buldana News : बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
Buldana News : पेशाने शेतकरी, त्यात शेतीही जेमतेम, त्यात कर्जाचा वाढता डोंगर यामुळे लग्न जुळण्यास अडचणी येत असल्याने खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील तरुणाने आत्महत्या केली आहे. महेंद्र नामदेव बेलसरे (30 वर्षे) असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने चक्क स्वतःचंच सरण रचून त्यामध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे. बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबात कोणी मुलगी द्यायला देत नसल्यानं शेतकरी तरुणांना होणार त्रास पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द या छोट्याशा गावात बुधवारी दोन ठिकाणी लग्न समारंभ होते. महेंद्र बेलसरे हा युवकही या लग्नांमध्ये सामील झाला होता. परंतु सायंकाळी अचानक महेंद्र एकटाच आपल्या शेताकडे गेला. शेताकडे गेलेला महेंद्र परत आलाच नाही. त्याने आपल्या शेतामध्येच रात्री आठच्या सुमारास स्वत:च सरण रचत आणि अंगावर पेट्रोल ओतून सरणामध्ये उडी घेतली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी या तरुणाचे लग्न जुळत नसल्याने त्या निराशेपोटी आत्महत्या केली अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांनी दिली आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?
या घटनेने आसपासचा परिसर सुन्न झाला आहे. आजच्या घडीला शेतकऱ्यांना आणि त्यातल्या त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना लग्नासाठी कोणी मुलगी देत नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. पण ही परिस्थिती विदारक असल्याने बदलायला सामाजिक संघटना शासन स्तरावर प्रयत्न करणए गरजेचे झाले आहे. आतातरी सरकार काही पाऊलं उचलणार का? हे पाहावे लागेल. दरम्यान या घटनेचा तपास खामगाव ग्रामीण पोलिस करत आहेत.
हे ही वाचा-
- Buldana Murder: जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलाची हत्या, बुलढाणा येथील धक्कादायक घटना
- शेतकऱ्याचा संताप! केळीचे भाव पडल्याने बागच कापून टाकली, नांदेडमधील तरुण शेतकऱ्याची व्यथा
- केळीला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला; केळीच्या घडांचा गुरांना चारा म्हणून वापर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha