एक्स्प्लोर
Advertisement
पाली-खोपोली मार्गावरील पुलाला तडा, स्लॅबच्या सळ्याही निखळल्या
मुंबई-गोवा हायवेवरून माणगाव, महाड, श्रीवर्धनकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी पाली-खोपोली मार्ग हा एकमेव मार्ग आहे.
रायगड : रायगड जिल्ह्यातील पाली-खोपोली मार्गावरील जांभुळपाडा गावाजवळील पुलाला तडे गेल्याने पूल धोकादायक बनला आहे. या दगडी पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. काही ठिकाणी स्लॅबमधील सळ्याही निखळल्या आहेत.
मुंबई-गोवा हायेववर होणारी वाहतूक कोंडी आणि खड्डे टाळण्यासाठी अनेक वाहनचालक हे पाली - खोपोली मार्गाचा वापर करतात. मुंबई-गोवा हायवेवरून माणगाव, महाड, श्रीवर्धनकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी पाली-खोपोली मार्ग हा एकमेव मार्ग आहे.
यामुळे मुंबई आणि महाड-चिपळूणकडे जाणारे बहुतांश वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. मात्र, याच मार्गावर पालीनजीक असलेल्या जांभुळपाडा गावानजीक असलेल्या एक लहान पूल सध्या धोकादायक झाला आहे. जांभुळपाडा नजीक असलेल्या आंबा नदीला जोडणाऱ्या नाल्यावरील ह्या पुलाला तडे गेले आहेत.
50 वर्षांपेक्षा जुना असलेला हा दगडी पूल सुमारे 14 मीटर लांब आहे. तर तीन दगडी पिलर्सवर उभ्या असलेल्या या पुलाच्या टोकावरील कडेचा काही भाग कोसळला असून या दगडी पिलरला 15 फूटाचा तडा गेला आहे. तर दोन टप्प्यात असलेल्या या पुलाच्या स्लॅबच्या सळया देखील निखळल्या असून यामुळे हे दोन्ही स्लॅब कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुलाच्या या दुरावस्थेसंदर्भात गावकऱ्यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला या पुलाच्या मार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. तर, जांभुळपाडा नजीक असलेल्या आंबा नदीला येणाऱ्या पुरामुळे या पुलाखाली असलेल्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी आत्ताच पाऊल उचलण्याची गरज आहे.
मुंबई - पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई - गोवा हायवेला जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे हा खोपोली - पाली मार्ग आहे. काही दिवसांपूर्वीच 24 - 26 जूनच्या रात्री या मार्गावरील खुरावले फाटा येथील रस्ताच वाहून गेला होता. तेव्हा हा मार्ग 48 तास वाहतुकीसाठी बंद होता. यामुळे, शासनाने तातडीने या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची मागणी केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement