Breaking News LIVE : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला
Breaking News LIVE Updates, 4 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
राज्यात काल 4,313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 92 रुग्णांचा मृत्यू
राज्यात काल 4,313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 360 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 86 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे.
राज्यात काल 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 466 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 973 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (66), नंदूरबार (2), धुळे (25), जालना (22), परभणी (53), हिंगोली (60), नांदेड (28), अकोला (18), वाशिम (1), बुलढाणा (74), यवतमाळ (13), नागपूर (64), वर्धा (3), भंडारा (6), गोंदिया (3), गडचिरोली (37) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 44,87,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,77,987 (11.98 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,98,098 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,954 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी फेटाळून लावला.
गिरीश चौधरी यांनी या प्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय असा आरोप केला होता. मात्र विशेष पीएमएलए कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साल 2016 मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुपचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती. मात्र एसीबीनं खडसे यांना याप्रकरणी क्लीन चीट दिली होती.
अँटीलिया बाहेर स्फोटकांची गाडी का ठेवले याचा कारण स्पष्ट
अँटीलियाच्या बाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्याप्रकरणी आज एनआयए कोर्टात दहा हजार पानांची चार्जशीट केली सादर केली. ज्यामध्ये सचिन वाझेने अँटीलिया बाहेर स्फोटकांची गाडी का ठेवली? याचं कारण देण्यात आलं आहे. ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात सचिन वाझेला सस्पेंड करण्यात आलं. मात्र, 2020 मध्ये वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं आणि इतकंच नाही तर क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट (सीआययु) सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर त्याला बसवण्यात आलं.
सचिन वाझेची ओळख ही उत्तम तपास अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून होती. मात्र, पंधरा वर्षानंतर मुंबई पोलिस दलात रुजू झाल्यावर त्याला ती ओळख पुन्हा मिळवायची होती आणि म्हणून त्याने अँटीलियाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्याचा हा सगळा कट रचल्याचा एनआयएने आपल्या आरोप पत्रात म्हटलं आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला तर जिल्ह्यातील सकल भागात पाणी साचलं. निर्मला नदीला पुर आल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या लोकांना गेल्या दोन तासापासून संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात सरासरी 27.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3257.6075 मि.मी. पाऊस झाला आहे.
आणखी एक गोल्ड!
आणखी एक गोल्ड!
प्रमोद भगतने ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 21-17 असा पराभव करत पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले. आणि याच प्रकारात मनोज सरकारला कांस्यपदक मिळालंय.
माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत, लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या भाषणात व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. मात्र आज त्यांच्याच कार्यक्रमात एका दारुड्यानं एन्ट्री केली. आणि अजितदादांनी आपल्या भाषणात माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत. लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत, असं म्हणत तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाईच्या सुचनाही त्यांनी केल्या.
आठ महिन्यांचं घरभाडे मागायला आल्याने घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरुन ढकललं
आठ महिन्यांचं घरभाडे मागायला आले म्हणून भाडेकरूने घरमालकाच्या मुलाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलले. पिंपरी चिंचवडच्या सांगवीत ही घटना 29 ऑगस्टला घडली असून गुन्हा 2 सप्टेंबरच्या रात्री दाखल करण्यात आलाय. यात जखमी झालेल्या मुलांचं नाव सौरभ पोरे असं आहे. सचिन पोरे आणि त्यांचा मुलगा सौरभ हे भाडेकरू विजय पाटोळे यांच्याकडे गेले. त्यांनी आठ महिन्यांचे थकलेले भाडे मागितले. याचा राग मनात धरून पाटोळे कुटुंबीयांनी त्या दोघांना टेरेसवर बोलण्यासाठी नेले. तिथं धक्काबुक्की आणि शिवीगाळ सुरू केली. मग टेरेसवरून थेट खाली ढकलले असा आरोप पोरेंनी पाटोळे कुटुंबियांवर केलाय.
अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर, कट ऑफ अजूनही नव्वदीच्या वर
मुंबईत नामांकित कॉलेज दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर सुद्धा कट ऑफ नव्वदी पार झाल्याचं दिसून आलंय. पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत नामांकित कॉलेजच्या कट ऑफ जवळपास 1 टक्यांनी घसरला ( 4 ते 7 गुणांनी कमी). मुंबई विभागात 60,037 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत कॉलेज प्राप्त झाले आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागात 13,282 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. सायन्स 5125, कॉमर्स 37186, आर्टस् 17333 शाखेसाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत कॉलेज मिळाले आहेत.