एक्स्प्लोर

Breaking News LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

Breaking News LIVE Updates, 3 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

Background

राज्यात काल  4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 04 टक्क्यांवर
राज्यात काल  4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 755  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 81 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे. 

राज्यात काल 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 50 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (59), नंदूरबार (2),  धुळे (23), जालना (19), परभणी (49), हिंगोली (60),  नांदेड (28), अकोला (23), वाशिम (5),  बुलढाणा (60), यवतमाळ (13), नागपूर (82),  वर्धा (4), भंडारा (6), गोंदिया (2),  गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 43,27,469 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,73,674 (11.92 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,87,385 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,971  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

दिवसअखेर इंग्लंडची 3 बाद 53 धावांपर्यंत मजल, तर भारताचा पहिला डाव 191 धावांवर गुंडाळला
इंग्लंड विरोधातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून  सुरूवात झाली आहे.  पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 3 बाद 53 धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाला फक्त 191 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. भारताकडून फक्त शार्दुल ठाकूरने चांगली कामगिरी केली आहे. शार्दुलने 36 बॉलमध्ये तीन षटकार आणि सात चौकार मारत 57 धावा केल्या. या शिवाय कर्णधार विराट कोहलीने 50 धावा केल्या. तर दुरीकडे इंग्लंडच्या क्रिस व्रोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतले तर ओली रॉबिन्सननी तीन विकेट घेतले.

मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलंय, मला थोडासा वेळ द्या, राष्ट्रपतींचं संभाजीराजेंना आश्वासन
मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.  या भेटीदरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी देखील होते.

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले, आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे.  राजर्षी शाहू हे आरक्षणाचे जनक असे उद्गार राष्ट्रपतींनीही काढले. दुर्गम आणि दूरवर भागात राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण असा जो कायद्यात शब्द आहे. तो बदलण्याची विनंती या भेटी दरम्यान केली.  "मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे.  मला या विषयी अभ्यासासाठी  थोडासा वेळ द्या", असं राष्ट्रपती म्हणाले आहेत.

शाळा दिवाळीपूर्वी सुरू करणार की दिवाळीनंतर याचा निर्णय दोन दिवसात, बच्चू कडू यांची माहिती
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय शिक्षणाचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. पण काही राज्यं मात्र या स्थितीतून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील अनेक राज्यात योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या. राजधानी दिल्लीत देखील कालपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु  माहिती शिक्षण राज्य मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी  शाळा सुरू होण्यासंदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, अशी माहिती दिली आहे.  

 

23:05 PM (IST)  •  03 Sep 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू...तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा, हल्लेखोरांवर निश्चित कडक कारवाई केली जाईल असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी बोलताना सांगून त्यांना धीर दिला. 
फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना श्रीमती पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यासध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

22:46 PM (IST)  •  03 Sep 2021

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत एकूण 50.41 टक्के मतदान

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत एकूण 50.41 टक्के मतदान झाले. 113396 पुरुष तर 103764 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 217160 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

11:52 AM (IST)  •  03 Sep 2021

सलायनमध्ये झुरळ निघाल्याचा रुग्णाच्या नातेवाईकांचा दावा; बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमधील प्रकार

सोलापूर : जिल्ह्यात सलायनमध्ये झुरळ निघाल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकाने केलाय. बार्शीतील डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने केलाय. निहिरा नीरज पुराणिक या तीन वर्षीय बालिकेला 27 ऑगस्टला ब्रॉकायटीस आणि निमोनियाचा त्रास होत असल्याने डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावरती हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार देखील सुरु होते. मात्र त्यातील एक सलायन ठराविक कालावधीनंतर नंतर बंद पडत होता. तेव्हा या सलाईन बॉटलची तपासणी केल्यानंतर त्यात चक्क झुरळ आढळल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकानी केलाय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच या बॅचमधील आणखी किती बॉटल रुग्णांना दिले गेलेत याची ही चौकशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केलीय. दरम्यान निहिरा पुराणिक हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून तिची तब्येत सध्या व्यवस्थित असल्याची ही माहिती आहे. 

11:52 AM (IST)  •  03 Sep 2021

भाजपचे नेते किरीट सोमय्या, आमदार नितेश राणेंची ओरोसमध्ये सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांची भेट

भाजपचे नेते किरीट सोमय्या, भाजप आमदार नितेश राणे ओरोस मध्ये सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांची भेट, संचयनी घोटाळ्यासंदर्भात चर्चा

जवळपास 20 मिनिटं झाली चर्चा, संचयनी घोटाळा संदर्भात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी केली चर्चा झाल्याची माहिती,

संचयनी घोटाळा संदर्भात ठेवीदारांच्या किती तक्रारी आल्या आणि पोलीसांच्या तपासा संदर्भातील जाणून घेतली माहिती

11:03 AM (IST)  •  03 Sep 2021

PF खातं दोन भागांत विभागलं जाणार, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

Provident Fund News : केंद्र सरकारच्या वतीनं नवे आयकर नियम जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, कर्मचाऱ्यांची भविष्य निधी खाती दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जाणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स अर्थात सीबीडीटीनेही यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यासोबतच सरकार आता वार्षिक 2.5 लाख रुपयांवरील ठेवींवर कर आकारणार आहे. अधिसूचनेनुसार, भविष्य निधि खात्यांवर मिळणारं व्याज मोजण्यासाठी केंद्र सरकार वेगळा विभागही उघडणार आहे. सर्व विद्यमान कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) खाती करपात्र आणि करपात्र योगदान खात्यांमध्ये विभागली जातील.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget