एक्स्प्लोर

Breaking News LIVE : सोलापूर - इंदोर महामार्गावर मोताळानजीक ट्रक आणि एसटीचा अपघात

Breaking News LIVE Updates, 19 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : सोलापूर - इंदोर महामार्गावर मोताळानजीक ट्रक आणि एसटीचा अपघात

Background

गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी
गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने  मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होणार नाही. यासाठी गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

Maharashtra Corona Update : राज्यात काल 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3 हजार 841  रुग्ण कोरोनामुक्त
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात काल  3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 841  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 28 हजार 561  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.09 टक्के आहे. राज्यात काल 80 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 699 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यात सध्या 47 हजार 919 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,68,74,491 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,18,502 (11.46 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,83,445 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,812  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
मुंबईत गेल्या 24 तासात 485 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कोरोनाची ही वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 485 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,14,424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 41 हजार 024 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली  मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4739 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1276 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 42 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जात त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा देण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कल्पना दिली असल्याची माहितीही अमरिंदर सिंह यांनी दिली. राजीनमा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं की, ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्री बनवावं. सरकार चालवण्यासंदर्भात माझ्यावर संशय निर्माण करण्यात आला आहे. माझा अपमान करण्यात आला. मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे. सकाळी मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनाम्यासंदर्भात माहिती दिली होती. मला सर्व रस्ते खुले आहेत. सर्व पर्यायांवर विचार केला जाईल. समर्थकांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल असं, अमरिंदर सिंह यांनी म्हटलं.   

20:01 PM (IST)  •  19 Sep 2021

किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यामुळे वातावरण विस्कळीत होत आहे- शंभुराजे देसाई

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यामुळे वातावरण विस्कळीत होत आहे. चुकीच्या पद्धतीने ते वेगवेगळ्या नेत्यांवर ते आरोप करत आहेत.सध्या गणेशोत्सवाचा काळ आहे. पोलीस यंत्रणा आणि इतर यंत्रणा ही त्यात गुंतलेली आहे.अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना कोल्हापूर येथे येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यांना मोठी सिक्युरिटी आहे. 

13:28 PM (IST)  •  19 Sep 2021

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आमदार गोपीचंद पडकरांचा लढा उभारण्याचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, एसटी कर्मचाच्या आत्महत्या या मुद्यावरून आमदार गोपीचंद पडळकर उभा करणार लढा.

येत्या 21 सप्टेंबरला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी आटपाडी तालुक्यातील झरेमध्ये केलं बैठकीचे आयोजन.

जे राज्य कर्मचाऱ्यांना सुविधा आहेत तेच एसटी कामगारांना द्या अन्यथा अन्यथा संघर्ष अटळ आहे असा राज्य सरकारला पडळकर यांनी दिला इशारा. 

11:50 AM (IST)  •  19 Sep 2021

बारामती : मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी

बारामती : मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी..   पोलिस कोठडी संपल्यानं बारामती न्यायालयात केलं होतं हजर.. 

- या प्रकरणातील ओंकार शिंदे या आरोपीलाही करण्यात आलं हजर.. ओंकार शिंदेला 3 दिवसांची पोलीस कोठडी,

- मनोहरमामाला न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. व्ही. रणवीर यांनी दिले आदेश..

10:31 AM (IST)  •  19 Sep 2021

मनोहर भोसलेला आज कोर्टात हजर करणार

आज मनोहर भोसलेला बारामती कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज कोर्टाने दिलेली तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज  सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे..  त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो जामिनासाठी अर्ज करू शकेल. बारामतीतून जमीन घेतल्यानंतर सोलापूर पोलीस मनोहर भोसलेला अटक करण्याची शक्यता आहे..

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra NewsJalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP MajhaPushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Embed widget