एक्स्प्लोर

Breaking News LIVE : जेईई मेन 2021 चा निकाल आज जाहीर होणार

Breaking News LIVE Updates, 14 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : जेईई मेन 2021 चा निकाल आज जाहीर होणार

Background

महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, अत्याचारातील नराधमांना वचक बसवा : मुख्यमंत्री

माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतीलच, पण निराधार, असहाय महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनं संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, राज्याच्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल, आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं. 

राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या या बैठकीस गृहमंत्री वळसे- पाटील यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव यांच्यासह वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील विविध पोलीस आयुक्तालयांचे वरीष्ठ अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यात सगळे उत्सव, कार्यक्रम सहजपणे, उत्साहात साजरे होऊ शकतात. हे केवळ पोलीस सदैव दक्ष असतात म्हणूनच. जनतेची काळजी घेणारे महाराष्ट्राचे रक्षक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्याला साजेसं कामही ते करताहेत. पण दुर्दैवी घटना घडते, सगळेच हादरून जातात. त्यावेळी मात्र काय करावे याची चर्चा सुरु होते. पण घटनांची माहिती घेतली, तर सुन्न व्हावे लागते आणि जनजागृती, लोकशिक्षण करायचं, तर कोणत्या वयापासून आणि केवळ राज्यातल्यांचे की,  इतर राज्यातून येणाऱ्यांचं असा प्रश्न उभा राहतो. कोविडच्या संकटातून बाहेर पडताना, आपल्याला अर्थचक्रही सुरु ठेवायचं आहे. पण पोस्ट कोविड परिणाम किती भयंकर असू शकतात हे दिसू लागले आहे. वैफल्यग्रस्तता वाढत आहे, त्याचं आव्हानही आपल्यापुढे आहे. त्यामुळे आता अशा दुर्दैवी घटनांबाबत प्रतिक्रीया देतानाही सजगता बाळगायला हवी. या प्रतिक्रीयांतून आपण काय साधतो आणि आहे ते वातावरण तर बिघडवत नाही, याचा विचार करायला हवा, चुकीचं चित्र रंगवलं जाऊ नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश...

  • गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.
  • इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात, कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
  • जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत. 
  • निती आयोगाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.
  • शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.
  • महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये. 

शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात : गृहमंत्री वळसे-पाटील

गृहमंत्री वळसे- पाटील म्हणाले की, "अलीकडच्या काळात राज्यात घडलेल्या घटनामुळे पोलीसांचा वचक  आहे की, नाही? अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. ही बाब पोलीस दलानं गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी पोलीस दलानं अधिक दक्ष आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. कोरोना काळात पोलीस यंत्रणावर विशेष ताण आहे, हे लक्षात घेतलं तरी यंत्रणांनी अधिक सतर्क आणि कार्य तत्पर रहावं. पोलीस स्थानकात आलेल्या महिलेची तक्रार तत्काळ नोंदवून घेण्यात यावी. या तक्रारीचा तपास, पुरावे जमा करण्यास प्राधान्य द्यावे. अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करावं. अशा न्यायालयीन प्रकरणांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा." तसेच, महाराष्ट्र पोलीस दल नावारुपाला आलेले दल आहे. हे नाव राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असेही त्यांनी सांगितले.

22:36 PM (IST)  •  14 Sep 2021

जेईई मेन 2021 चा निकाल जाहीर आज जाहीर होणार

जेईई मेन 2021 चा निकाल जाहीर आज जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.  विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबर आणि नोंदणी क्रमांकाच्या मदतीने अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in, ntaresults.nic.in आणि nta.ac.in वर निकाल पाहता येईल.

19:38 PM (IST)  •  14 Sep 2021

गर्लफ्रेंड मिळावी यासाठी आमदारांना पत्र लिहिणारा युवक अखेर सापडला.

गर्लफ्रेंड मिळावी यासाठी आमदारांना पत्र लिहिणारा युवक अखेर सापडला. पत्राखाली नाव असलेल्या भूषणच्या मित्रांनी सर्व कारभार केल्याचा धक्कादायक खुलासा. भूषणला याबाबत कल्पनाही नसल्याचे उघड, राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथील भूषणच्या मित्रांनी त्याच्या नावाने गंमतीने लिहून वायरल केले होते. पत्र, आमदार सुभाष धोटे आपल्याला वडीलधारे असून त्यांना त्रास देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे भूषण आणि मित्रांनी स्पष्ट केले. या कृतीविषयी सर्वांना पश्चाताप असून त्यानी माफी मागितली. आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकर्त्यांनी युवक शोधून काढल्यावर आमदार धोटे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि युवकांशी संवाद साधला.

19:14 PM (IST)  •  14 Sep 2021

राज्य सरकार दिल्लीमधील शाळेचे मॅाडेल स्विकारणार

राज्य सरकार दिल्ली सरकारचे तिथल्या शाळेचे मॅाडेल स्विकारणार. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर दिल्ली मॅाडलेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राची टिम दिल्लीला जाणार आहे.

16:40 PM (IST)  •  14 Sep 2021

पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार

पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार. विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण प्रामुख्याने पालघरमध्ये जोरदार सरींचा अंदाज. उत्तर कोकणात प्रमुख्याने पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट. 
विदर्भासाठी सर्वत्र आज यलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. मराठवाड्यात देखील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीत मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीला यलो अलर्ट. उत्तर मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज, प्रामुख्याने नाशिकमधील घाट माथ्यावर मुसळधार पावसाच्या सरींचा अंदाज. पुणे, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगावसाठी यलो अलर्ट तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

13:01 PM (IST)  •  14 Sep 2021

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर सुनावणी 18 तारखेला होणार; करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम वाढणार

करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी 18 तारखेला होणार. करुणा शर्मा यांचा कारागृहातील मुक्काम वाढणार. करुणा शर्मा यांना ॲट्रॉसिटी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा अंबाजोगाईचं जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली होती. आपल्याच प्रकरणी करुणा शर्मा यांना जामीन मिळावा म्हणून अंबाजोगाईच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी आज होणार होती, मात्र या प्रकरणात फिर्यादी आणि तपास अधिकारी यांचा जवाब नोंदविला गेला नाही, म्हणून न्यायालयानं या प्रकरणावरची सुनावणी अठरा तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे. 20 सप्टेंबरपर्यंत करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढच्या 18 तारखेला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवलीBaba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यूUddhav Thackeray Full Speech : मोदींची मिमिक्री, RSSला सवाल; उद्धव ठाकरे यांचं दमदार भाषण ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Embed widget