Breaking News LIVE : अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली
Breaking News LIVE Updates, 13 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेले भूपेंद्र पटेल आहेत तरी कोण?
गुजरातच्या नवीन मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. मात्र नेहमीप्रमाणे भाजपने पुन्हा आश्चर्यचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली. भूपेंद्र पटेल संध्याकाळी 5.30 वाजता राज्यपालांना भेटायला जातील. दुसरीकडे, भूपेंद्र पटेल यांच्यासह 15 मंत्री उद्या शपथ घेऊ शकतात.
भूपेंद्र पटेल पाटीदार समाजातून येतात. विजय रुपाणी सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. यासह, भूपेंद्र पटेल दीर्घ काळापासून संघाशी संबंधित आहेत. पटेल समाजातही त्यांची चांगली पकड आहे. त्याचबरोबर 2017 च्या निवडणुकीत त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला होता. भूपेंद्र पटेल विधानसभा निवडणूक 1 लाख 17 हजार मतांनी जिंकले होते. भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभेचे आमदार आहेत. यापूर्वी भूपेंद्र पटेल अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे (AUDA) अध्यक्ष होते. भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या (एएमसी) स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
खड्ड्यात गेलं राजकारण म्हणत वाहतूक विभागानेच भरले खड्डे
पावसाळा सुरू होताच शहरातील विविध महामार्गावरील खड्डे डोके वर काढतात. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून खड्ड्यांवरून राजकारण करताना दिसून येतात. ज्या दिवशी आंदोलन किंवा राजकीय नेत्यांच्या दौरा असेल त्या दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी अथवा ठेकेदार खड्डे बुजवण्याचे आश्वासन देतात. मात्र, खड्ड्याचं साम्राज्य जैसे थे राहते. हेच वाहतूक पोलिसांना खटकलं म्हणूनच राजकारण गेलं खड्ड्यात म्हणत शहरातील विविध मार्गावरील खड्डे भरण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे.
भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने आज रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीत विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे पोलीस अधिकारी मायने यांनी असेही सांगितले आहे की मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी, कशेळी ते अंजुर फाटा व मानकोली ते चिंचोटी-कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात आणि नुकसान देखील या ठिकाणी होतात आणि त्याला सर्वस्वी जबाबदार नागरिक वाहतूक पोलिसांना जवाबदार ठरवतात. त्यामुळे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवत नसल्याने आज वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरु, संजय राऊतांची माहिती
शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात 80 ते 90 , तर गोव्यात 20 जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार आहे, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. यापूर्वी एनआयए वृत्तसंस्थेनं शिवसेना उत्तर प्रदेश निवडणुकीत 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती ट्वीटमार्फत दिली होती. परंतु, संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींमध्ये शिवसेना 80 ते 90 जागा लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, "गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरु आहे. तशी आमच्या पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत. या संघटनांनी सांगितलेलं आहे की, तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत, त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे. त्याला कितपत यश येतं त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्यांच्यामध्ये सहभागी होऊ शकेल.
अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली
अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली, ज्योती देवरे यांची जळगाव येथे बदली, ज्योती देवरे त्यांच्या ऑडिओ क्लिपमुळे आल्या होत्या चर्चेत
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.
राज्यात आज 2740 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233 रुग्णांची कोरोनावर मात, 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 2740 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233 रुग्णांची कोरोनावर मात, 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद
कोयना धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 5 फुट 3 इंचावर
कोयना धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 5 फुट 3 इंचावर, कोयना धरणातून 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु
ICMR ला ड्रोनच्या माध्यमातून लस पुरवठा करण्याची परवानगी
ICMR ला ड्रोनच्या माध्यमातून लस पुरवठा करण्याची परवानगी, अंदमान निकोबार, मणिपूर आणि नागालँड या भागांमध्ये लसीच्या वाहतुकीसाठी ड्रोनला परवानगी, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ICMR ला विशेष परवानगी, तीन हजार फूट उंचीपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून दुर्गम आणि वाहतुकीस कठीण भागांमध्ये लस वितरण