एक्स्प्लोर

Breaking News LIVE Updates : नीट परीक्षेचा निकाल जाहीर

Breaking News LIVE Updates, November 01 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE Updates : नीट परीक्षेचा निकाल जाहीर

Background

Kranti Redkar : तीन जणांकडून आमच्या घराची रेकी, कुटुंबाला धोका; क्रांती रेडकर-वानखेडे यांनी मागितली सुरक्षा

Maharashtra News : मुंबई NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर-वानखेडे यांनी दावा केला आहे की, त्यांचे पती समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात आहे. त्या म्हणाल्या की, काही लोकांनी तीन दिवसांपूर्वी आमच्या घराची रेकी केली आहे. आम्ही यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार आहोत. तसेच, आमच्या कुटुंबाला धोका आहे, त्यामुळे आम्हाला सुरक्षा मिळणं गरजेचं आहे, अशी मागणीही क्रांती रेडकर यांनी काल माध्यमांशी बोलताना केली. 

क्रूझ ड्रग प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून सातत्यानं होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक लोकांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिकाच सुरु केली होती. काही दिवसांपूर्वीच मलिकांनी दावा केला होता की, समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब मराठी नसून मुस्लिम आहेत. तसेच समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटी प्रमाणपत्र सादर केली. दरम्यान, नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावले. 

IND vs NZ, T20 World Cup: टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडचा 8 गडी राखून विजय

IND vs NZ, T20 World Cup: न्यूझीलंड विरुद्ध 'करो या मरो'च्या सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव झाला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर आज खेळण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली.  भारताने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 110 धावा केल्या. या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने 8 विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला आहे. 

Rajinikanth Discharged: सुपरस्टार रजनीकांत यांना मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण

Rajinikanth Discharged: साऊथचे सुपरस्टार रजनीकांत  (Rajinikanth) यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये आनंदी आनंद आहे. उद्यापासून सुरू होणारा दिपावलीचा सण रजनीकांत यांना त्यांच्या घरी साजरा करता येणार आहे. रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईतील (Chennai) कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल होण्याच्या चार दिवस आधीच रजनीकांत यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

20:33 PM (IST)  •  01 Nov 2021

Neet Result 2021 : नीट परीक्षेचा निकाल जाहीर

सप्टेंबर रोजी एनटीए (नेशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे देशभरात मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 16 लाख विद्यार्थी ज्यांनी ही परीक्षा दिली होती ते विद्यार्थी मागील काही दिवसांपासून परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार ? याची वाट बघत होते. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी ला नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत हिरवा कंदील दिल्यानंतर  अखेर हा निकाल आज जाहीर झाला आहे. 

16:16 PM (IST)  •  01 Nov 2021

सचिन वाझेंची कोठडी 6 नोव्हेंबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेकडे

सचिन वाझेंची कोठडी 6 नोव्हेंबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेकडे असणार आहे. 

12:30 PM (IST)  •  01 Nov 2021

Anil Deshmukh At Ed Office : अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित

Anil Deshmukh At Ed Office : गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले आहेत. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे."

09:26 AM (IST)  •  01 Nov 2021

नीरज गुंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या काळातील 'वाझे' होते; नवाब मलिकांचा मोठा आरोप

नीरज गुंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या काळातील 'वाझे' होते; नवाब मलिकांचा मोठा आरोप

09:25 AM (IST)  •  01 Nov 2021

मी वानखेडे यांच्या पत्नीवर, मुलांवर कोणतीही वैयक्तिक टीका केलेली नाही : नवाब मलिक

मी वानखेडे यांच्या पत्नीवर, मुलांवर कोणतीही वैयक्तिक टीका केलेली नाही : नवाब मलिक

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget