Breaking News LIVE : दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

Breaking News LIVE Updates, 27 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2021 07:25 PM
राज्यात आज तर 21,273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Breaking News LIVE : राज्यात आज तर 21,273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 34,370 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज, 425 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद 

छत्रपती संभाजीराजे उद्या दुपारी 1 वाजता मराठा आरक्षण विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

छत्रपती संभाजीराजे उद्या दुपारी 1 वाजता मराठा आरक्षण विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार.

मुंबईत मागील 24 तासात 1,266 रुग्णांचे निदान

Breaking News LIVE : मुंबईत मागील 24 तासात 1,266 रुग्णांचे निदान, तर 855 रुग्ण बरे होऊन घरी, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 351 दिवसांवर 

दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव, मूल्यमापनासाठी नववी आणि दहावीतील आतापर्यंतच्या गुणांचा आधार घेतला जाण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांबरोबर झाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची चर्चा

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय

अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात बहुउद्देशिय निवारा केंद्रे, भूमीगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसह लाईटनिंग अरेस्टर उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागतो. या नैसर्गिक आपत्तीत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्रे, भूमीगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात येणार आहेत. यासाठी कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या भागातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनांची कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण किनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (व्हीसीव्दारे), राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती,  मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह कोकण विभागाचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बुलढाणा : शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

बुलढाणा :  एबीपी माझाच्या बातमीची पालकमंत्र्यांनी घेतली दखल. जिल्ह्यात 138 गावात कोरोनाने शिरकाव केला नसल्याचा खोटा दावा प्रशासनाला भोवणार. एबीपी  माझाच्या रियालिटी चेक मध्ये प्रशासनाचा दावा फोल निघाला होता. शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची फोनवरून एबीपी  माझाला माहिती दिली.हे सरकार पारदर्शक असल्याचं आपण सांगतो, पण जर अधिकारी लपवाछपवी करत असतील तर कारवाई नक्की करणार.

सांगलीतील कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन 

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील प्रकाश कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टराचे कामबंद आंदोलन सुरू केलं आहे.  काम बंद करून डॉक्टर व नर्सिंग स्टाफन कोरोना रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह 5 जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा निषेधार्थ हे आंदोलन सुरु आहे. प्रशासनाकडून चुकीची पद्धतीने कारवाई झाल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

आप नेते जितेंद्र भावे यांच्याविरोधात गुन्हा, नाशिकमधील व्हिजन हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि स्टाफला धमकावून बिलाची काही रक्कम न भरल्याचा आरोप

अर्धनग्न अवस्थेत केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेले आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांच्याविरोधात नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 22 मे रोजी व्हिजन हॉस्पिटलमध्ये एका कोविड रुग्णाला आकारलेले बिल अवाजवी असल्याच्या कारणावरुन भावे यांनी रुग्णाचे नातेवाईक आणि दोन समर्थकांसह हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता. डॉक्टर आणि स्टाफला धमकावून बिलाची काही रक्कम न देता निघून गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हानी व नुकसान कायदा तसंच साथरोग कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. व्हिजन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल (26 मे) रात्री सरकारवाडा पोलीस ठाण्यात जितेंद्र भावे, दोन समर्थक आणि संबंधित रुग्णाचे दोन नातेवाईक अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंच्या पुत्रासह चौघांना अटक

पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंच्या पुत्रासह चौघांना अटक करण्यात यश आलेलं आहे. सिद्धार्थ बनसोडे असं पुत्राचे नाव आहे. कथित गोळीबाराची घटना 12 मे ला घडली होती. कंत्राटदार ऍंथोनीचा मॅनेजर तानाजी पवार ने हा गोळीबार केला होता. आमदारांनी त्यांच्या दिशेने हा गोळीबार झाल्याचा दावा केला होता. तर आमदार पुत्रासह कार्यकर्ते जीवे मारत असल्याने बचावासाठी हवेत गोळीबार केल्याचा प्रतिदावा तानाजीने केला होता. याप्रकरणी आमदार पुत्रासह कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल होता.

भाजप स्वतः आंदोलन करणार नाही, मात्र मराठा आरक्षणासाठी भाजपचा पाठिंबा : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भाजप स्वतः आंदोलन करणार नाही, मात्र मराठा आरक्षणासाठी भाजपचा पाठिंबा आहे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मांडली आहे. 

बाईक चोरीचे रॅकेट लोणार पोलिसांच्या अटकेत

लोणार पोलिसांनी दुसऱ्या जिल्ह्यातून बाईक चोरी करून चोरीच्या बाईक बुलढाण्यात विक्री करणारे एक सहा जणांचं मोठं रॅकेट पकडलं असून त्यांच्याकडून सध्या 15 बाईक्स जप्त केल्या आहेत , अजून कुठून , किती बाईक्स चोरी करून विक्री केल्या आहेत याचा तपास लोणार पोलीस करत आहे


 

शरद पवारांना मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना दिली, भेटीनंतर संभाजीराजे यांची प्रतिक्रिया

शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील बैठक संपली आहे. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली. या संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तर संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी बैठकीनंतर दिली.

खासदार संभाजीराजे छत्रपती सिल्वर ओकवर पोहोचले

खासदार संभाजीराजे छत्रपती सिल्वर ओकवर पोहोचले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे आज शरद पवार यांची भेट घेत आहेत. 

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज सकाळी साडे आठ वाजता शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सकाळी नऊ वाजता सिल्वर ओकवर पोहोचले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.

मराठा आरक्षणप्रश्नी आज खासदार संभाजीराजे शरद पवारांची भेट घेणार

आज मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात ते मुंबईतील शरद पवार यांचं निवासस्थान सिल्वर ओकवर भेटीसाठी पोहोचतील. अजित पवार सिल्वर ओकवर साडे आठ वाजता दाखल झाले आहेत. तर 9 वाजता दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील देखील सिल्वर ओकवर पोहचले आहेत. आज कॅबिनेट बैठक आहे , त्या पूर्वीची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. 

आयटी अभियंत्यांच्या उच्चभ्रू परिसरात कोरोना नियमांची पायमल्ली

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागरमध्ये कोरोना नियमांना घेऊन उदासीनता पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आयटी अभियंत्यांनी गजबजलेला हा उच्चभ्रू परिसर मानला जातो. दुसऱ्या लाटेत कोरोनाने भल्याभल्यांना धडकी भरवली, याची पूर्ण कल्पना या सुशिक्षितांना आहे. तरी देखील रोज इथली मंडळी लेकरा-बाळांना घेऊन गार्डनमध्ये वावरायला येतात. म्हणूनच काल सायंकाळी पोलीस आणि पालिकेने धडक कारवाई केली. यावेळी काही अभियंत्यांनी नियमावरून पोलिसांशी हुज्जत देखील घातली तर काहींनी हास्यास्पद कारणं पुढं केली. मात्र तरी सर्वांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलं.

नाकाबंदीदरम्यान दंड ठोठावल्याच्या रागातून औरंगाबादमध्ये माजी सैनिकाकडून वाहतूक पोलिसांना शिविगाळ आणि मारहाण

औरंगाबादमध्ये माजी सैनिकाने शिविगाळ करुन पोलिसांच्या बोटाला कडकडून चावला. फौजदारासह वाहतूक हवालदाराच्या बोटाला टाके पडले आहेत. बाबा चौकात काल सायंकाळची ही घटना आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी अडवून दंड ठोठावल्याचा राग आल्याने माजी सैनिकाने वाहतूक पोलिसांना हेल्मेटने मारहाणही केली. छावणी विभागाचे फौजदार संजय बनसोड आणि हवालदार दिलीप माळे यांच्या बोटाला गंभीर जखम झाली असून टाके देखील पडले आहेत पोलिसांनी माजी सैनिकाला पकडून वेदांतनगर पोलिस ठाण्यात नेत अटक केली. भगवान कृष्णाजी सानप असे त्याचे नाव आहे.

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोकसीला अटक

मुंबई : 14 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोकसी याला अटक करण्यात आली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिगामध्ये मेहुल चोकसी वास्तव्याला होता. याच बेटावरील डॉमिनिकामधून मेहुल चोकसीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

पार्श्वभूमी

Maharashtra Coronavirus: राज्यात बुधवारी डिस्चार्जपेक्षा नवीन कोरोना रुग्ण अधिक, 'या' शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही


Maharashtra Corona Cases :राज्यात आज तर 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे.  राज्यात आज एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


आजपर्यंत एकूण 52,41,833 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 453 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,38,24,959 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,50,907 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 23,70,326 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,943 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


Mumbai Coronavirus: मुंबईचा रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर मात्र बुधवारी दैनंदिन रुग्ण वाढले


मुंबई आणि पुणे शहरात कोरोनानं कहर केला होता. मात्र आता या दोन महत्वाच्या शहरांमधील कोरोना नियंत्रणात आला आहे. मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 56 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 348 दिवसांवर गेला आहे.  मुंबईत सध्या 27,943 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


मुंबईत रिकव्हरी रेट वाढला असला तरी कालपेक्षा आज दैनंदिन रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. काल 1,037 रुग्णांचे निदान झाले होते तर 1417 रुग्ण बरे होऊन घरी गेले होतं. तर आज 1362 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज नवीन रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्जही कमी झाल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. मुंबईमधील धारावीत आज 3, दादरमध्ये 15, माहिममध्ये 19 नवीन रुग्ण आढळले आहेत.  


Corona Vaccine : Pfizer ची लस 12 वर्षांपुढील सर्वांसाठी प्रभावी, कंपनीची केंद्र सरकारला माहिती


देशात कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. मात्र कोरोनाशी सामना करण्यासाठी महत्त्वाची असलेल्या कोरोनाचा लसींचा तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकन कंपनी फायझरने (Pfizer) आपल्या कोरोना लसीच्या परिणामकारकतेची, चाचणीची संपूर्ण माहिती भारताला दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इतर देशांनीही या लसीला दिलेल्या मंजुरीबाबत संपूर्ण माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.


फायझरने सरकारला सांगितले की, त्यांची कोरोना लस ही 12 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांसाठी उपयुक्त आहे. या लसीला एका महिन्यासाठी 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवता येऊ शकते. तसेच कंपनीने केंद्र सरकारला सांगितले की, ही कोरोना लस भारतात आढळणार्‍या कोरोना व्हायरससाठी बरीच प्रभावी आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.