Malavya Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र महिन्यातून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. धन आणि वैभवाचा स्वामी शुक्र सध्या कुंभ राशीत भ्रमण करत असून 28 जानेवारीला तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल, परंतु काही राशी आहेत, ज्यांचं नशीब या काळात उजळू शकतं. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची अभूतपूर्व प्रगती होऊ शकते. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सन्मान आणि भरपूर पैसा मिळेल. व्यावसायिकांना विशेष लाभ मिळेल आणि फालतू खर्च कमी होईल. नोकरीत नवीन संधी उघडतील. नवीन नोकरीच्या ऑफर किंवा परदेशी प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. यावेळी, तुमच्या वडिलांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
धनु रास (Sagittarius)
मालव्य राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरू शकतो. यावेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही काही लक्झरी वस्तू खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तसेच, शुक्र ग्रह हा तुमच्या राशीच्या सहाव्या आणि 11व्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकतं. या कालावधीत तुम्हाला तुमच्या आईकडून आर्थिक लाभ मिळू शकतो आणि त्यांचा पाठिंबा मिळू शकतो.
कुंभ रास (Aquarius)
मालव्य राजयोगाची निर्मिती कुंभ राशीसाठी अनुकूल ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून धन आणि वाणी स्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू आणि संपत्तीतही वाढ होईल. करिअरमध्ये बढतीची शक्यता आहे. तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेतील. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच, तुमचं भाषण प्रभावी असेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: