Breaking News LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची वर्षा निवासस्थानी भेट
Breaking News LIVE Updates, 26 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कोल्हापुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा,
24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 2599 कोरोना रुग्णांची नोंद ,
तर कोल्हापूर जिल्ह्यात 45 जणांनी कोरोनामुळे दगावले,
1622 जण आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले,
Breaking News LIVE : राज्यात आज तर 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट, वर्षा निवासस्थानी भेट, पवारांच्या आजारपणानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात भेट, विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती
रायगड : पेणच्या खारेपाटातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार, 30 कोटींच्या योजनेला जलसंपदा विभागाची मंजुरी, हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणात सोडून ते खारेपाटातील गावांना पुरवले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झाली बैठक.
जळगाव : मुक्ताईनगर नगरपरिषदेमधील भाजपच्या सात नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश, सात नगरसेवकांमध्ये भाजपचे गटनेते यांचाही प्रवेश, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
आता 5 जुलैपासून सीएच्या (इंटर्मिडीएट आणि फायनल) परीक्षा घेतल्या जातील, सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, सीए परीक्षा आधी 27 एप्रिलच्या परिपत्रकानुसार पुढे ढकलली होती.
आधी या परीक्षा 21 आणि 22 मे रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र आता ही मे महिन्यातील परीक्षा, 5 जुलैपासून घेतल्या जाणार असल्याच जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही महाविकास आघाडी सरकारनं भ्रष्टाचार केला आहे. भाजप नेते नारायण राणेंनी असा आरोप करत थेट संजय राऊतांना आवाहन केलं आहे. संजय राऊतांनी सगळं जाहीर करावं अन्यथा मी जाहीर करेन, असं आवाहन भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊतांना दिलं आहे. तसेच पोलीस वसाहतीच्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार असून प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार मी उघड करणार आहे, असं सांगत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर मोठा आरोप केला आहे.
मी लोकांच्या भावना समजण्यासाठी दौरा करत आहे .कोणत्याही पक्षाचा याच्याशी संबंध नाही. या दौऱ्यात मुख्यमंत्री, शरद पवार, विरोधी पक्ष नेत्यांना भेटणार आणि मराठा समाजाला काय देता येईल या बाबत चर्चा करणार. 30 टक्के मराठा समाज गरीब आहे, त्यांना न्याय मिळायलाच हवा- संभाजीराजे छत्रपती
सातारा जिल्ह्यात 2156 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले तर
33 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल उपचार घेऊन 2147 रूग्णं घरी परतले. आज अखेर जिल्ह्यात 1,55,662 बाधित तर 1,30,920 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.
लसीसाठी मुंबई महानगरपालिकेनं काढलेल्या निविदांना 8 पुरवठादारांचा प्रतिसाद. ग्लोबल टेंडर काढलेल्या राज्यांना मात्र अद्याप प्रतिसाद नाही
चंद्रपूर : बिबट्याचा हल्ल्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या ग्रामस्थाचा मृत्यू. ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचखेडा गावाजवळील झुडपी जंगलातील घटना, भाऊराव जांभुळे (40) असं मृतक ग्रामस्थाचं नाव असून तो चिचखेडा येथील रहिवासी आहे, आज सकाळी तेंदूपत्ता तोडत असताना बिबट्याचा हल्ल्यात झाला मृत्यू
बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वाहन अज्ञाताने पेटवण्याचा प्रयत्न केला. घरासमोर उभी असलेली इनोव्हा कार रात्री 3 ते 4 च्या सुमारास जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्या घराभोवती सुरक्षा वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले होते.
वाशिम : वाशिमच्या माहूरवेस परिसरात असलेल्या एका भंगार खरेदीच्या दुकानाला आग लागल्याची घटना सकाळी घडली. या आगीच्या घटनेत दुकानाच मोठं नुकसान झालं असून एक भांगार वाहून नेणारे वाहन या घटनेत जळून राख झालं आहे. तर वाशिमनगरपालिका च्या अग्निशमन विभागाला आग विझवण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले भर वस्तीत आग लागल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा वेळ लागला.
बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. सोलापूर जिल्ह्यातील लोकं आंदोलन करणार आहेत, असं समजताच पोलिसांनी गोविंद बागेबाहेर सुरक्षा वाढवली आहे. दोन आंदोलकांना बारामतीत पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. सोलापूर जिल्ह्यातील लोक आंदोलन करणार आहेत असं समजताच पोलिसांनी गोविंद बागेबाहेर सुरक्षा वाढवली. बारामती पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात तब्बल 500 शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला.
रायगड : मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर खाजगी बसचा अपघात झाला असून या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. माडपनजीक सिमेंट ट्रक आणि खाजगी बसचा अपघात झाला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर माडपनजीक अपघात झाला असून या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून मंगळवारपर्यंत 41 हजार 823 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात 0 ते 17 वयोगटातील रुग्णांची संख्या 2 हजार 453 होती. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपर्यंत 5.8 मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. दुसऱ्या लाटेत 0 ते 17 वर्षे वयोगटातील 120 मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नागपूर शहर पोलिसांच्या पथकाने बेकायदेशीरपणे रेतीचे (वाळू) उत्खनन करुन सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडावणाऱ्या रेती माफियांविरोधात कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नेरी गावातील सिंगारदीप घाटावर पोलिसांनी सापळा रचला होता. रात्रीच्या वेळी अवैधपणे अनेक ट्रकमध्ये मशीनच्या मदतीने रेती भरली जात असल्याचं नजरेस पडतात, पोलिसांनी छापा टाकून सात डंपर (ट्रक) जप्त केले आहेत. जप्त केलेले ट्रक आणि इतर मशिन्सची किंमत 1 कोटी 28 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी आठ ट्रक चालक आणि क्लिनरसह काही मजुरांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
एसईबीसीअंतर्गत देण्यात येणारे आरक्षण रद्द ठरवण्यात आल्याने मराठा समाज आता खुल्या प्रवर्गात समाविष्ट झाला. केंद्र सरकारने 103 च्या घटनादुरुस्तीनुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये माेडत असलेल्या समाजांना देण्यात येणाऱ्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ मराठा समाजालाही देण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मंगळवारी (25 मे) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ऑनलाईन पद्धतीने दाखल केली. याचिकेनुसार 28 जुलै 2020 ला राज्य सरकारने एक अध्यादेश काढला हाेता. या अध्यादेशानुसार एसईबीसी अंतर्गत जे मराठा समाजातील पात्र लाभार्थी आहेत, त्यांना ईडब्लयूएसचे आरक्षण लागू हाेत नाही. त्यानंतर 9 सप्टेंबर 2020 रोजी आरक्षणाला स्थगिती दिली तर 5 मे 2021 रोजी सर्वाेच्च न्यायालयाने एसईबीसीअंतर्गत देण्यात येणारे आरक्षण रद्द ठरवले. त्यामुळे मराठा समाजाचा खुल्या वर्गात समावेश झाला. परिणामी मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र ठरत असून समाजाला ईडब्ल्यूएसअंतर्गत आरक्षण द्यावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
औरंगाबाद : संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद येथील कर्मवीर श्री शंकर सिंग नाईक हायस्कूलमधील कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून गौतम बुद्धांची रांगोळी काढून आपल्या कलेच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. संपूर्ण जगात पिंपळाच्या पानावर गौतम बुद्धांची रांगोळी रेखाटण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद घेतली गेली आहे. आपल्या हाताच्या तळव्या एवढ्या पिंपळाच्या पानावर ही रांगोळी रेखाटली गेली असून तीन तासाचा अवधी लागून 35 ग्राम रांगोळीचा उपयोग रांगोळी रेखाटण्यासाठी करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona Cases: राज्यात आज 24,136 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 36,176 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज तर 24,136 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 36,176 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 601 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज पुन्हा एकदा दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात आज एकूण 3,14,368 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत एकूण 52,18,768 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 601 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.
आज नोंद झालेल्या एकूण 601 मृत्यूंपैकी 389 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत तर 212 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोवि पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 536 ने वाढली आहे.
CBI Director Appointment : सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआय प्रमुखपदी नियुक्ती
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन अर्थात सीबीआयच्या संचालकपदी राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार सुबोधकुमार जयस्वाल दोन वर्षे सीबीआय संचालकपदाची धुरा सांभाळतील. सुबोध कुमार जयस्वाल यांच्यासह सशस्त्र सीमा बल (एसएसबी) चे महासंचालक कुमार राजेश चंद्र आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. के. कौमुडी यांची नावं देखील सीबीआय संचालक पदाच्या शर्यतीत होती.
Coronavirus : कोरोनाचा प्रसार पाण्यातूनही होतोय? लखनौमध्ये सांडपाण्यात आढळले कोरोनाचे विषाणू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरु असताना, कोरोना व्हायरसचा फैलाव कसा होतो याबाबत अभ्यासात अनेक बाबी समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सांडपाण्यात कोरोनाचे विषाणू आढळल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर मात्र लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एसजीपीजीआयच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी सांगितले की, देशात सांडपाण्याचे नमुने आयसीएमआर-डब्ल्यूएचओमार्फत तपासले जात आहेत. यात उत्तर प्रदेशमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी एका जागी सांडपाण्यात कोरोना विषाणू आढळल्याचं निष्पन्न झालं आहे.
मायक्रोबायोलॉजी विभागाच्या एचओडीने डॉ. उज्ज्वला घोषाल यांनी सांगितले की, आमच्या टीमने लखनौतील विविध ठिकाणाहून सांडपाणी चाचणीसाठी गोळा केले होते. ज्यामध्ये खदरा, मछली मोहल्ला आणि घंटाघर येथील सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी रुद्रपूर खद्रातील पाण्यात कोरोना विषाणू आढळल्याची खात्री झाली आहे. मात्र यातून कोरोनाचा फैलाव होणार की नाही होणार हा संशोधनाचा विषय आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -