Breaking News LIVE : मराठा आरक्षण; 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका दाखल
Breaking News LIVE Updates, 13 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षातील नेत्यांचं पत्र, आठ महत्त्वाच्या मागण्या
विरोधी पक्षातील 12 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवून मोफत व्यापक कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या पक्षांनी म्हटले आहे, की सर्व बेरोजगारांना दरमहा सहा हजार रुपये द्या, गरजूंना मोफत धान्य द्या. लाखो 'अन्नदात्याला' साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी नवीन कृषी कायदे रद्द करा. विरोधी पक्षनेत्यांनीही सरकारला त्यांच्या सूचनांना प्रतिसाद देण्याची विनंती केली आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हे पत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्यासह ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, स्टॅलिन यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांकडून पत्र लिहण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर पीपल्स अलायन्सतर्फे फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, माकपचे सरचिटणीस डी राजा आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे पत्र पाठविणार्या नेत्यांमध्ये आहेत.
राज्यात कोरोनाचा आलेख उतरतोय, बुधवारी 58 हजार 805 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यात बुधवारी 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.01% एवढे झाले आहे. राज्यात काल 816 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,01,00,958 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,26,710 (17.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,13,000 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,417 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल एकूण 5,46,129 सक्रीय रुग्ण आहेत.
लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची सर्वच मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : राजेश टोपे
राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते. तसेच राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना वेळेत दुसरा डोस न दिल्यात पहिला डोसचा प्रभाव होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोरोनाविषयी भारताचा अंदाज चुकला, वेळेआधीच लॉकडाऊन उठवल्याने परिस्थिती गंभीर : अमेरिकन तज्ज्ञ डॉ. फौची
कोरोना महामारी संपली असा चुकीचा समज तयार करुन भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देश गंभीर संकटात अडकल्याचे अमेरिकेचे वरीष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फौची यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेचा जबरदस्त तडाखा भारताला बसला आहे. अनेक राज्यात रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, लस, ऑक्सिजन, औषधे आणि बेड्सच्या तुटवड्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोना प्रतिक्रियांवरील सुनावणी दरम्यान मंगळवारी फौची यांनी सिनेट आरोग्य, शिक्षण, कामगार आणि निवृत्तीवेतन समितीला सांगितले की, “कोरोना आता संपला अशी समजूत घालत भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे डॉ. फौची म्हणाले. डॉ. फौची हे अमेरीकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅन्ड इन्फेक्टीव्ह डिजीजिस (एनआयएआयडी) चे संचालक आहेत आणि अध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार देखील आहेत.
महिलेला थुंकी चाटायला लावल्याचे प्रकरण, दहा पंचांवर चोपडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल
अकोला जिल्ह्यातील वडगाव येथील जात पंचायतीने महिलेला थुंकी चाटायला लावल्याचे प्रकरण. जात पंचायतीमधील दहा पंचांवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल. 9 एप्रिलला जातपंचायतीमध्ये प्रकार घडल्याचा पीडितेचा आरोप. चोपडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर प्रकरण तपासासाठी केलं अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिसांकडे वर्ग. या प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी गृहमंत्र्यांना लिहिले आहे पत्र.
मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड
मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड, 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका दाखल, राज्यांना ओबीसी लिस्टमध्ये समावेशाचे अधिकार नाहीत, खंडपीठाने दिला होता निर्णय
मुंबईत आज 1946 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2037 रुग्णांना डिस्चार्ज, सध्या एकूण 38,649 सक्रिय रुग्ण
मुंबईत आज 1946 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2037 रुग्णांना डिस्चार्ज, सध्या एकूण 38,649 सक्रिय रुग्ण
बीड जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसांसाठी कडक निर्बंध
बीड जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसांसाठी कडक निर्बंध. बीड जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यात दहा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 मे रोजी रात्री 12 वाजतापासून म्हणजेच 16 मे पासून 25 मे रोजी रात्री 12 वाजतापर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.
महाराष्ट्रात एकूण केसेस 5 लाख 46 हजारांवर, रुग्णसंख्या 7 लाख केसेसवरुन 5 लाखांवर
महाराष्ट्रात एकूण केसेस 5 लाख 46 हजारांवर, रुग्णसंख्या 7 लाख केसेसवरुन 5 लाखांवर, रिकव्हरी रेट वाढलाय., ग्रोथ रेट 1 टक्केपेक्षा खाली, देशाचा ग्रोथ रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त, रुग्णदराबाबत महाराष्ट्राचा देशात 31 वा क्रमांक