Breaking News LIVE : Coronavirus : अमरावतीत चीनमधून येणार ऑक्सिजन प्लांट
Breaking News LIVE Updates, 07 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात गुरुवारी 62,194 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 63,842 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात गुरुवारी (6 मे) तब्बल 62 हजार 194 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 63 हजार 842 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण 42,27,940 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 85.54% एवढा झाला आहे. दरम्यान काल 853 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,86,61,668 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 49,42,736 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,26,089 व्यक्ती होम क्वॉरन्टीनमध्ये आहेत तर 29,406 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरन्टीनमध्ये आहेत.
जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही : हायकोर्ट
राज्यातील इतर शहराच्या तुलनेत मुंबईनं कोरोना आटोक्यात आणण्यात यश मिळविलं आहे. आतातर सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पॅर्टनचे कौतुक केलं आहे. मात्र जे मुंबईत शक्य आहे ते पुण्यात का नाही?, राज्यातील इतर महापालिका बीएमसीचा आदर्श डोळ्यापुढे का ठेवत नाहीत? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे. अन्यथा जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 ते 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सुरू असलेल्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु असलेल्या अत्यावश्यक सेवा देखील 8 ते 15 पर्यंत बंद असतील. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरु राहतील अशी घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. 8 मे रात्री 8 ते 15 मे सकाळी 7 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
कोरोनावर रशियाच्या नवीन 'स्पुटनिक लाईट'चा एक डोस पुरेसा
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला असून यापुढेही अशा लाट येत राहणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. या संदर्भात आता एक सकारात्मक बातमी आली आहे. रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला आहे. स्पुटनिक लाईट असं या लसीचं नाव असून याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यावूर्वी रशियन कंपनीची स्पुटनिक व्ही (Sputnik V) बाजारात उपलब्ध आहे.
लग्नाचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना बोरसे कुटुंबियांवर काळाचा घाला
धुळे: साक्री तालुक्यातील बळसाने गावाहून लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून दिघावे गावाकडे परतताना कासारे या गावाजवळ वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये कार जाऊन पडली. दुर्घटनेमध्ये अद्याप दोघा जणांचे मृतदेह बचाव कार्य करणाऱ्या पोलिसांच्या व ग्रामस्थांच्या हाती लागले आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश असून एक 14 वर्षाचा मुलाचा देखील मृतदेह मिळून आला आहे. अद्यापही विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आणखी दोन जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये वाहनातील एक इसम पाण्याबाहेर सुखरूप बाहेर निघाला असून वाहनामध्ये तब्बल पाच जण असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
अमरावतीत चीनमधून येणार ऑक्सिजन प्लांट
अमरावती जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून चिनमधून अत्याधुनीक ऑक्सिजन प्लांट आणण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने खा. नवनीत आणि आ. रवी राणा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. हा प्लांट हरमन फिनोकेम कंपनी आपल्या सीएसआर फंडातून उपलब्ध करून देणार आहे.
अत्याधुनीक ऑक्सिजन प्लांट 9 टनाचा राहणार असून 24 तासात 40 लिटरचे 209 सिलेंडर भरण्याची त्याची क्षमता आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात हा प्लांट लावण्यात येणार आहे. चिनमधल्या शांघाय शहरातून हरमन कंपनीने हा प्लांट घेतला आहे. जिल्ह्यातली ऑक्सिजनची टंचाई कायमस्वरूपी दुर व्हावी, कोरोना रुग्णांना तातडीने शुद्ध ऑक्सिजन मिळावा आणि त्या माध्यमातून रुग्णांचे प्राण वाचावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा ऑक्सिजन प्लांट अमरावतीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज राज्यात 54,022 नवीन कोरोना रुग्ण, 37,386 रुग्ण बरे होऊन घरी, रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर
Breaking News LIVE : आज राज्यात 54,022 नवीन कोरोना रुग्ण, 37,386 रुग्ण बरे होऊन घरी, रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर #Maharashtra #corona https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-may-07-2021-maharashtra-political-news-lockdown-corona-vaccination-985430
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळं मृत्यू, दिल्लीतील एम्स रुग्णालयात झालं निधन
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळं मृत्यू, दिल्लीतील एम्स रुग्णालयात झालं निधन