(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन, राहत्या घरी 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Breaking News LIVE Updates, 6 March 2021:दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला, मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत, पत्नीची माहिती
कांदिवलीहून क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत. ते आत्महत्या करु शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमना हिरेन यांनी दिली. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं, असंही त्या म्हणाला. विमला हिरेन यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान ही प्रतिक्रिया दिली. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींना तुरुंगात टाकल्याचा राग आहे का? फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्र्यांचं प्रत्युत्तर
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युमुळे आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी काळंबेरं असल्याचं सांगत, मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात फोनवरुन संवाद होत असल्याचा दावा केला. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का, असा प्रतिसवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला.
ममता बॅनर्जींकडून प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदरावारांची यादी जाहीर
तृणमूल काँग्रेस अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 291 जागांसाठी उमेदरावारांची यादी जाहीर केली. यादीत नमूद केल्यानुसार ममता बॅनर्जी नंदीग्राममधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळं भवानीपूर मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. ममता बॅनर्जी यांच्या जागी तृणमूल नेते सोवान चॅटर्जी हे भवानीपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीसुद्धा शिवपूर येथून निवडणूक लढवणार असल्याचं या यादीतून स्पष्ट करण्यात आलं.