Breaking News LIVE : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या
Breaking News LIVE Updates, 25 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी होणार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. अशातच आता याप्रकरणी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. आता या आरोपांची चौकशी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज वर्षा येथील बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः माझी चौकशी करा अशी मागणी केली. याआधीही परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतरही अनिल देशमुख यांनी माझी चौकशी करा अशी भूमिका मांडली होती. गृहमंत्र्यांच्या या भूमिकेनंतरच याप्रकरणी चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे.
राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट; अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन
राज्यात आज विक्रमी 31 हजार 855 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्याच चिंता वाढवणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करुनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आज नवीन 15 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 247299 सक्रीय रुग्ण असू राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे.
मनसुख हिरण प्रकरणातील एटीएसकडे असलेले दोन्ही आरोपी एनआयएच्या ताब्यात
मनसुख हिरण हत्या प्रकरण एनआयएला सुपुर्द करण्याचे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने दिल्याने एटीएसला हा मोठा झटका मानला जात आहे. मनसुख हिरण यांची केस मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात वर्ग करण्याचे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. ठाणे सत्र न्यायालयाकडून केस विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे सर्व पुरावे, कागदपत्र आणि दोन्ही आरोपी विनायक शिंदे
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या. आज सायंकाळी 7 वाजता सरकारी बंगल्यात आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ. दिपाली चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी, हरीसाल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प असं महिला अधिकाऱ्याच नाव. आत्महत्या करण्यापूर्वी 4 पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती कळतेय. त्यात काय लिहलंय हे अद्याप कळू शकले नाही.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आशा भोसले यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांनी असंख्य मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत.
धुळ्यात जनता कर्फ्यु, जिल्हा प्रशासनाचे आदेश
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 381 कोरोना रुग्ण
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 381 कोरोना रुग्ण आढळले. आज 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 46 हजार 997 वर. एकूण रुग्णांची संख्या - 46997. सक्रीय रुग्ण - 4121. एकूण मृत्यू - 647.
लोणावळा नगरपरिषद आणि हॉटेल व्यावसायिकांना 'तसे' आदेश आलेले नाहीत. त्यामुळे धुलवड रंगपंचमीच्या सुट्टीत पर्यटकांनी पर्यटनासाठी यावं, पण..
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी निर्बंध घातले आहेत. यात हॉटेल, रिसॉर्ट, हॉल आणि खाजगी मोकळ्या जागेत एकत्रित येऊन हे सण साजरे करू नयेत असे आदेश दिलेत. पण तसा अध्यादेश लोणावळा नगरपरिषदेला आणि हॉटेल व्यावसायिकांना आलेला नाही. त्यामुळे पर्यटकांना इथं बंदी नाही. तेव्हा त्यांनी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी यावं. मात्र तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केलंय.