Breaking News LIVE : परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी होणार
Breaking News LIVE Updates, 24 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये... cc
LIVE
Background
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच अनेक मंत्र्यांनााही कोरोनाची लागण झाली आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
अनिल देशमुख प्रकरणी शिवसेनेची सावध भूमिका, मुख्यमंत्री हस्तेक्षेप करणार नाहीत, सूत्रांची माहिती
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकारला बॅकफुटवर जावे लागले असताना आता शिवसेनेने देखील या प्रकरणात सावध पवित्रा घेतला आहे. अनिल देशमुख प्रकरणात शिवसेना हस्तक्षेप करणार नाही अशी माहिती मिळत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजीनामा होणार की, नाही याबाबत शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. मात्र सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाहीत. देशमुखांचे काय करायचे याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
हायकोर्टात परमबीर सिंह प्रकरणात दोन स्वतंत्र याचिका; भ्रष्टाचाराबद्दल गुन्हा दाखल करत स्वतंत्र चौकशीची मागणी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहयांच्या लेटरबॉम्बमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यातील हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची सीबीआय अथवा ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात करण्यात आली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या याचिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही प्रतिवादी करण्यात आले आहे.
परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी होणार
परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी होणार. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय. लवकरच नियुक्त करणार चौकशी आयोग.
पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव
जव्हार आदिवासी विकास विभागाच्या दाभेरी आश्रम शाळेतील दहा विद्यार्थ्यांना कोरोना. दाभेरी आश्रम शाळा सील. मंगळवारी याच आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. डहाणू आणि जव्हारच्या प्रकल्प अधिकारी तथा प्रांत अशिमा मित्तल यांनी केल्या कडक उपायोजना. आश्रम शाळेत येणारे बहिस्थ विद्यार्थ्यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच बाहेरून ये-जा करणाऱ्या शिक्षकांमुळे पसरतोय कोरोना. त्यामुळे सर्व शिक्षकांना कामाच्या ठिकाणी दिले निवासी राहण्याचे आदेश.
धरणावर फिरायला गेलेल्या दोघा मित्रांचा पाण्यात पडून मृत्यू
मालेगाव तालुक्यातील विराणे येथील धरणात सेल्फी काढत असताना दोघा मित्रांचा पाण्यात पडून झाला मृत्यू. दोघेजण जवळच्या अंजगवडेल येथील तरुण.
हिंगोली कोरोना अपडेट
हिंगोली जिल्ह्यात आज तब्बल 139 नवीन रुग्णांची भर तर एका रुग्णाचा मृत्यू. दिवसभरात 80 रुग्ण बरे झाल्याने देण्यात आला डिस्चार्ज. सध्या एकुण 547 रुग्णांवर उपचार सुरू.
मटणाच्या दुकानाच्या जागेवरून दोन गटात हाणामारी
उदगीर येथील भाजी मार्केट भागात मटणाचे दुकान आहेत..या ठिकाणी दुकान लावण्यावरून दोन मटण दुकानदारांना भाडणं झाले. वादावादी वाढली, प्रकरण हाणामारीवर गेले यावेळी दोन्ही बाजूकडून मटण दुकानातील हत्यारांचा वापर झाला. या हाणामारीत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या भागात जखमी लोक आणि सर्वत्र रक्त दिसत असल्यामुळे मोठी दशहत निर्माण झाली होती. घटना अचानक घडल्यामुळे भाजीमार्केट भागात दशहत निर्माण झाली होती. याची माहिती उदगीर शहर पोलिसांना मिळताच ते तातकल घटनास्थळी दाखल झाले यामुळे पुढील अनर्थ टळला. जखमी वर उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. उदगीर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.