Breaking News LIVE : राज्य सरकारचा मोठा निर्णय, घरासाठी इक्वेटेबल मॉडगेजसाठीचं शुल्क वाढवलं
Breaking News LIVE Updates, 26th June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात शुक्रवारी 9,677 नवीन कोरोनाबाधित तर 10,138 डिस्चार्ज
राज्यात काल (25 जून) 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,138 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 इतकी झाली आहे. काल 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.94 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सरकारकडून आधीच्या नियमावलीमध्ये नवीन बदल
राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचं राज्य सरकारविरोधात चक्का जाम तर काँग्रेसचं केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या निर्णयाचं खापर एकमेकांवर फोडलं जात असून आज 26 जून रोजी भाजपचं राज्य सरकारविरोधात चक्का जाम आंदोलन आहे तर काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवार 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, घरासाठी इक्वेटेबल मॉडगेजसाठीचा शुल्क वाढवलं
राज्य सरकारचा मोठा निर्णय, घरासाठी इक्वेटेबल मॉडगेजसाठीचा शुल्क वाढवलं. पुर्वी 1 हजार रूपयांत लेटर ॲाफ इंटीमेशनवर काम पूर्ण व्हायचे. आता बँकेचे कर्ज घेऊन घर खरेदी केलेल्या, फ्लॅट खरेदी केलेल्या प्रत्येक कर्जसाठी तारण देताना इक्विटेबल मॅाडगेजसाठी कमाल 15 हजार फी. कर्जाच्या प्रमाणात .05 टक्के वाढणार.
आज राज्यात 8,752 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, 9,812 नवीन रुग्णांची नोंद तर 179 मृत्यू
Breaking News LIVE : आज राज्यात 8,752 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, 9,812 नवीन रुग्णांची नोंद तर 179 मृत्यू
धुळ्यात बनावट मद्याच्या कारखान्यावर धाड, कारखाना उद्ध्वस्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अजंदे शिवारातील पद्मावती कापूस खरेदी विक्री केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिनिंगमध्ये सुरू असलेल्या बनावट मद्याच्या कारखान्यावर मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 9 जून रोजी धाड टाकत एक कोटींच्या मुद्देमाल हस्तगत केला. तसेच हा कारखाना उध्वस्त केला होता. मुंबई येथील पथकाने केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती. धुळे जिल्ह्यात एवढा मोठा बनावट मद्याचा कारखाना सर्रासपणे सुरू असल्याची माहिती असून देखील स्थानिक अधिकारी काय करतात? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या कारवाईची गांभीर्याने दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांनी धुळे येथील निरीक्षक दुय्यम निरीक्षक आणि जवान या पदावरील पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणी जिल्हा अधीक्षकांची ही तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
बुलडाणा : मोदी सरकार विरुद्ध भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे काँग्रेस पक्षातर्फे भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली , ओबीसी आरक्षण हे भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारमुळे रद्द झाल्याचा ठपका ठेवत मोदी सरकार मुर्दाबाद , ओबीसी विरोधी नरेंद्र मोदी अशा भाजपा कार्यालयासमोर घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं , माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
हॉटेल ताज येथे बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन, बॉम्बशोधक पथक दाखल, सर्च सुरू
हॉटेल ताज येथे बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन, बॉम्बशोधक पथक दाखल, सर्च सुरू