एक्स्प्लोर

Maharashtra News LIVE : सीबीएसई, आयसीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Breaking News LIVE Updates, 22st June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News LIVE : सीबीएसई, आयसीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Background

Navi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव देण्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेला कृती समितीचा विरोध

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु, आता नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळेच वळण लागले आहे. राज ठाकरे यांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून आम्ही त्यांच्याशी सहमत नसल्याचे मत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीने मांडले आहे. दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची मागणी कृती समितीने केली आहे.

मुंबईमध्ये असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत शिफ्ट होणार नाही. यामुळेच सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विचार केला. सरकार जर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार असले, तर याला प्रकल्पग्रस्त आगरी कोळी जनतेचा तीव्र विरोध असेल, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे. यासाठी येत्या 24 जून रोजी सिडकोवर मोर्चा काढण्यात येणार असून 1 लाखांवर जनता सहभागी होणार असल्याचे कृती समितीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरवणार असतील तर याला प्रकल्पग्रस्त जनता तोडीसतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका मांडली आहे. "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावच संयुक्तिक आहे," असं राज ठाकरे म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनीही शिवरायांचंच नाव सूचवलं असतं, असंही त्यांनी म्हटलं. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21  रुग्ण महाराष्ट्रात (Delta plus variant of coronavirus has been detected in 21 people in Maharashtra) आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. 

या संदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. 15 मे पासून 7500 नमुने  घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत. 

17:23 PM (IST)  •  22 Jun 2021

मुंबईत महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा उंदराने डोळा कुरतडला

मुंबईत महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा उंदराने डोळा कुरतडला. सदर रुग्ण आयसीयूमध्ये दाखल होता. त्यावेळी डोळ्याच्या खालच्या भागात रुग्णाला उंदीर चावला. ही गंभीर घटना असून चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणकेर यांनी दिलीय.

17:15 PM (IST)  •  22 Jun 2021

सीबीएसई, आयसीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सीबीएसई, आयसीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

16:28 PM (IST)  •  22 Jun 2021

मराठा आरक्षण बाबत राज्य शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

मराठा आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांची माहिती

16:23 PM (IST)  •  22 Jun 2021

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत वाकी येथे कन्हान नदीत बुडून चौघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत वाकी येथे कन्हान नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहरातून 8 तरुण मित्र फिरण्यासाठी वाकी येथे गेले होते. 8 मित्रांपैकी चौघेजण नदीत पोहोण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून एकाचा मृतदेह मिळाला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

15:31 PM (IST)  •  22 Jun 2021

हे सगळं षड्यंत्र मातोश्रीवरून घडलं, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीनंतर खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

आमची कागदपत्रं भक्कम आहेत. त्यामुळे खासदारकीला धोका नाही हा विश्वास होताच. विरोधक बालिशपणाने हे आरोप करत होते. आज त्यांना उत्तर मिळालं. हे सगळं षड्यंत्र मातोश्रीवरून घडलं आहे, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. माझा जन्म महाराष्ट्रातला असूनही मी महाराष्ट्रीयन आहे हे पण सिद्ध करावं लागलं हे वेदनादायी. अनिल परब यांनी कटकारस्थान रचलं, राणा कुटुंबियांचा आरोप. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदेशात कुठे कुठे संपत्ती आहेत याचे सगळे पुरावे माझ्याकडे : रवी राणा. ईडी, सीबीआयला हे सगळे पुरावे देणार.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget