Breaking News LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Breaking News LIVE Updates, 13 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
PM Modi G7 Speech: जी-7 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा 'वन अर्थ वन हेल्थ'चा नारा, व्हर्चुअली सहभाग
PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज ब्रिटनमध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी झाले. यूनायटेड किंगडमनं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी जी-7 शिखर संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी 'वन अर्थ वन हेल्थ' चा मंत्र दिला. जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांनी देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला.
12 आणि 13 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन भाषणं (PM Modi Speech Live) या समिटमध्ये होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे G7 समिटमध्ये दुसऱ्यांदा सहभागी झाले आहेत. याआधी 2019 साली फ्रांसमध्ये झालेल्या समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.
सूत्रांनी सांगितलं की या बैठकीत फ्रांसचे राष्ट्रपती इमेनुएल मॅक्रो यांनी भारतासह अन्य देशांना कोरोना लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करताना त्यात सूट देण्याची मागणी केली. त्यांनी कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरील बंदी हटवण्याचीही मागणी केली. लस बनवणाऱ्या देशांना कच्चा माल मिळायला हवा, असं ते म्हणाले.
Maharashtra Corona Cases : राज्यात शनिवारी 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 14,910 डिस्चार्ज, सध्या 1,55,474 ॲक्टिव्ह रुग्ण
Maharashtra Corona Cases : राज्यात काल तर 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 14,910 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 360 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, शुक्रवारी ही संख्या कमी नोंदवण्यात आली होती. राज्यात आज एकूण 1,55,474 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत एकूण 56,31,767 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.48% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 360 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,78,34,054 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,98,550 (15.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,63,227 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,807 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
चंद्रपूर : नाल्यात ट्रॅक्टर वाहून गेल्याने 3 जणांचा मृत्यू, राजुरा तालुक्यातील देवाडा येथील घटना
चंद्रपूर : नाल्यात ट्रॅक्टर वाहून गेल्याने 3 जणांचा मृत्यू, राजुरा तालुक्यातील देवाडा येथील घटना, मल्लेश शेंडे यांच्या शेतात गावातील काही मजूर मशागतीचे काम करायला गेले होते, अंदाजे 5 वाजता मुसळधार पाऊस झाल्याने सर्व मजूर ट्रॅक्टरने गावाकडे निघाले, मात्र शेतजवळील नाल्यात ट्रॅक्टर टाकताच नाल्याच्या पाण्यात तो वाहून गेला ज्यात माधुरी वगणे (27), मल्लेश शेंडे (45) आणि लक्ष्मी वगणे (7) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 3 जण बचावले
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील बावची परिसरात दहशत, पिसाळलेल्या लांडग्याने एकूण सहा जणांचा चावा
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील बावची परिसरात दहशत पिसाळलेल्या लांडग्याने एकूण सहा जणांचा चावा घेवून गंभीर जखमी केलेले आहे. यामध्ये यशराज राजू फोंडे वय १५ , सुकदेव सिदू जाधव वय ६०, तानाजी श्रीरंग चव्हाण वय ३२ यांना तातडीने सोलापूर येथे सिव्हील हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले आहे . याशिवाय अनुसया बसवराज माळी वय ३५, पार्वती इराप्पा माळी वय ३२, भारत विठोबा म्हमाणे रा. . पौट यांनाही लांडग्याने जखमी केलेले आहे. तसेच या हल्ल्यात दोन कुत्रे , एक गाय व म्हैस यांनाही चावले आहे . सदर लांडगा पिसाळलेला असल्याचे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.
चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा आणि पावसाची जोरदार हजेरी
चंद्रपूर : विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा आणि पावसाची जोरदार हजेरी, चंद्रपूर शहरात जवळपास अर्धा तास कोसळला मुसळधार पाऊस, चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनजवळ एक झाड कोसळल्याची प्राथमिक माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापुरातील स्वप्नील पार्टे आणि सचिन तोडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मराठा समाजाच्या तरुणांचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा ताफा अडवणार असा दिला होता इशारा. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापुरातील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कोल्हापुरातील स्वप्नील पार्टे आणि सचिन तोडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, मराठा समाजाच्या तरुणांचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा ताफा अडवणार असा दिला होता इशारा, उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर