Breaking News LIVE : पुढील तीन तासात विदर्भातील अमरावतीसोबतच नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
Breaking News LIVE Updates, 11 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज 12 हजार 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
सध्या राज्यात 1,60,693 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण 56,08,753 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.45% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 10,76,165 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,384 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात अनलॉक उघडल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. राज्यात आज सर्वाधिक 1 हजार 50 नवीन कोरोना बाधित रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळले आहेत.
आज मुंबईत कोरोनाचे 660 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 768 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. दरम्यान आज कोरोनामधून 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे तर संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार हा असणार आहे. संघामध्ये आयपीएलमध्ये चमकलेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडसह वेगवान गोलंदाज चेतन सकारिया, नितीश राणा, देवदत्त पडिकल आणि कृष्णप्पा गौतम यांचा पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश केला गेला आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका तर तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.
13 ते 25 जुलैदरम्यान खेळली जाणार मालिका
भारतीय टीम श्रीलंकेमध्ये 13 ते 25 जुलै दरम्यान तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 13, 16 आणि 18 जुलै रोजी एकदिवसीय तर 21, 23 आणि 25 जुलै रोजी टी 20 सामने खेळले जाणार आहेत. हे सामने कुठे खेळले जाणार याबाबत अद्याप घोषणा केलेली नाही.
श्रीलंका दौऱ्यात या खेळाडूंना संधी
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियामध्ये फलंदाजाच्या यादीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. तर ऑलराउंडर म्हणून हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि के गौतम यांचा समावेश केला आहे. तर गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, राहुल चहर आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे.
पुढील तीन तासात विदर्भातील अमरावतीसोबतच नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
पुढील तीन तासात विदर्भातील अमरावतीसोबतच नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अमरावती, नागपुरातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील काही भागात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे.
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या, जुन्या भांडणातून हत्या झाल्याची चर्चा, अकरा वर्षापूर्वी घडलेल्या प्रकाश कांडेकर हत्या प्रकरणातील ते आरोपी होते, सध्या ते कांडेकर खून प्रकरणात शिक्षा भोगत होते, मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या ते रजेवर होते, दुपारच्या सुमारास राजाराम शेळके हे नारायण गव्हाण येथील आपल्या मालकीच्या शेतात काम करीत असताना अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
मुंबई आणि मुंबई उपनगर तिसर्या टप्प्यातून दुसर्या टप्प्यात
- मुंबई आणि मुंबई उपनगर तिसर्या टप्प्यातून दुसर्या टप्प्यात ,,
- लॉकडाऊनच्या निकषानुसार एका आठवड्यातच मुंबई दुसर्या टप्प्यात ,
मुंबईतील ऑक्सिजन बेडची उपलब्धता जास्त असल्याने आणि रुग्णवाढीची टक्केवारी घसरल्याने मुंबईचा समावेश दुसर्या टप्प्यात,
- त्यामुळे मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय कार्यालयांमधील उपस्थित १०० टक्के ठेवण्याचा निर्णय,
आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिंमत बिसवा शर्मा हे नागपूरच्या संघ मुख्यालयात
आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिंमत बिसवा शर्मा हे नागपूरच्या संघ मुख्यालयात सर संघचालक मोहन भागवत यांना भेटायला आले आहेत. साधारण चार वाजता ते संघ मुख्यालयात पोहोचले. मोहन भागवत यांच्या सोबत त्यांची बैठक सुरू आहे...
भाजप नेते मुकुल रॅाय यांची घरवापसी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश
भाजप नेते मुकुल रॅाय यांची घरवापसी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश