Breaking News LIVE : सीबीएसई बोर्डानंतर ICSE बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Breaking News LIVE Updates, 1 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथील?
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. वाशिम, सांगली, नंदुरबार, यवतमाळ कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार उद्यापासून (1 जून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश आज काढण्यात आला आहे.
कोरोनाची लाट ओसरतेय; राज्यात आज 15077 रुग्णांची नोंद
राज्यात आज गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. राज्यात सोमवारी 15 हजार 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 33 हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट 93.88 टक्क्यांवर पोहचला आहे. 14 मार्च रोजी राज्यात 15051 रुग्णांची नोंद झाली होती.
दरम्यान आज 184 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के आहे. राज्यात सध्या 2 लाख 53 हजार 367 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 53 लाख 95 हजार 892 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 95 हजार 344 रुग्णांना आतापर्यंत जीव गमावला आहे.
बारावीच्या परीक्षेसंदर्भात उद्या केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल करणार घोषणा, सूत्रांची माहिती
बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून उद्या शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घोषणा करण्यापूर्वी शिक्षणमंत्री पंतप्रधान मोदींना या विषीय माहिती देण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यांनी तयार केलेला रिपोर्ट पंतप्रधानांना देण्यात आला आहे. यामध्ये परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे.
मुंबई : परिवहन विभाग भ्रष्टाचार प्रकरण, तक्रारदार गजेंद्र पाटील यांची दुसऱ्या दिवसाची चौकशी पूर्ण
मुंबई : परिवहन विभाग भ्रष्टाचार प्रकरण, तक्रारदार गजेंद्र पाटील यांची दुसऱ्या दिवसाची चौकशी पूर्ण, उद्या पुन्हा चौकशीसाठी होणार हजर, आजच्या चौकशी दरम्यान भ्रष्टाचाराचे पुरावे केले सादर, मंत्रालयातील सह सचिव प्रकाश साबळेआणि अवर सचिव डी एच कदम यांचाही नोंदवण्यात आला जबाब, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी चौकशीची मुदत 5 दिवसांनी वाढवून दिली, या प्रकरणी सखोल चौकशी होणार, संबंधितांचे बँक खाते ही तपासले जाण्याची शक्यता
सीबीएसई बोर्डानंतर ICSE बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व टिकवण्याबाबत राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार
राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व टिकवण्याबाबत राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार. शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत आज झाली चर्चा, केंद्र सरकार रिझर्व्ह बॅंकेच्या कायद्यात बदल करत आहे. या बदलांमुळे राज्यातील जिल्हा बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. या बँका कशा वाचवता येतील यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या मंत्र्यांची टास्क फोर्स नियुक्ती करण्याची चर्चा आजच्या बैठकीत झाली. या कायद्याविरोधात कोर्टात जाण्याची तयारी आहे. या बँका वाचवण्यासाठी काय पावले उचलायची नवे कायदे करायची का याबाबतही टास्क फोर्स चर्चा करुन निर्णय घेणार आहे.

हिंगोलीचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी मागितली 3 लाखांची लाच
हिंगोलीचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी मागितली 3 लाखांची लाच. वाळूचे 5 टिप्पर सोडण्यासाठी लाचेची मागणी. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोलीच्या पथकाची कारवाई.