एक्स्प्लोर

Breaking News LIVE : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

Breaking News LIVE Updates, 30 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

Background

Maharashtra Corona Cases : राज्यात काल 11, 124 रुग्णांना डिस्चार्ज, 7,242 रुग्णांची भर
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 7242  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 हजार 124 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 75 हजार 888 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59टक्के आहे. 

राज्यात काल 190 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 27 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  78 हजार 562 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), जालना (84), हिंगोली (69), वाशिम (85),  गोंदिया (97), गडचिरोली (61) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

Ind vs SL 3rd T20I: श्रीलंकेने रचला इतिहास, पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-20 मालिका जिंकली
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताला 7 गडी राखून पराभूत केले. यासह श्रीलंकेने ही तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. श्रीलंकेने दोन वर्षानंतर द्विपक्षीय टी -20 मालिका जिंकली आहे. याआधी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी -20 मालिका जिंकली होती. त्याचबरोबर भारताविरुद्ध पहिल्यांदाच श्रीलंकेचा संघ टी -20 मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. बर्थडे बॉय वनिंदू हसरंगा हा श्रीलंकेच्या विजयाचा नायक होता. पहिल्यांदा गोलंदाजीत हसरंगाने त्याच्या चार षटकांत केवळ 9 धावा देऊन चार महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. आणि नंतर 9 चेंडूत 16 धावांची नाबाद खेळी खेळली.

'पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी', मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
 ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे  पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पुर्तता करून लवकरात लवकर मिळावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त भागातील व्यावसायिक दुकानदार आणि नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने विमा कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

22:07 PM (IST)  •  30 Jul 2021

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडे नऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले.  ते 95 वर्षाचे होते. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते

18:29 PM (IST)  •  30 Jul 2021

ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखला नवीन समन्स

ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखला नवीन समन्स. सोमवारी सकाळी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स.

16:50 PM (IST)  •  30 Jul 2021

पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली न करण्याचे महावितरणला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची पुरग्रस्त भागासाठी मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त भगत वीजबिल वसुली न करण्याचे महावितरणला आदेश  दिले आहेतय. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत ग्राहकांना वीजबिल देण्यात येणार नाहीत. वीजबिल माफ करण्याचा माझा अधिकार नाही, हा अधिकार राज्य मंत्रिमंडळाला आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. 

12:32 PM (IST)  •  30 Jul 2021

पूरग्रस्तांना तातडीची मदत तर दिलीच पाहिजे, मात्र यावर कायमस्वरुपी उपाय काढावा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Breaking News LIVE : पूरग्रस्तांना तातडीची मदत तर दिलीच पाहिजे, मात्र यावर कायमस्वरुपी उपाय काढावा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
 
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-july-30-2021-maharashtra-political-news-mumbai-rain-updates-hsc-results-996637

12:19 PM (IST)  •  30 Jul 2021

मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही कोल्हापूरच्या दौऱ्यावर, जिथं मुख्यमंत्री येणार आहेत तिथे आधी फडणवीस पोहोचले 

Breaking News LIVE : मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही कोल्हापूरच्या दौऱ्यावर, जिथं मुख्यमंत्री येणार आहेत तिथे आधी फडणवीस पोहोचले 
 
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-july-30-2021-maharashtra-political-news-mumbai-rain-updates-hsc-results-996637

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget