एक्स्प्लोर

Breaking News LIVE : सीबीआयच्या एफआयआरविरोधात राज्य सरकारची याचिका फेटाळली

Breaking News LIVE Updates, 22 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : सीबीआयच्या एफआयआरविरोधात राज्य सरकारची याचिका फेटाळली

Background

Maharashtra Rains Updates : पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावासाचा इशारा
राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावलेली असली तरी पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

राज्यात काल 8159  नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7839 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज 8 हजार 159  नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7 हजार 839 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 8 हजार 750 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. राज्यात आज 165 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  94 हजार 745 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (31), हिंगोली (45), यवतमाळ (17), गोंदिया (55) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 566 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

11 वी CET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी काही कालावधीसाठी बंद
इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात (CET) ऑनलाइन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात आली असल्याचे बोर्डकडून सांगण्यात आले आहे. 21 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी http://cet.mh-ssc.ac.in/ हे संकेतस्थळ ज्यावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरत होते ते तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले असून अर्ज भरण्याची ऑनलाइन सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी सीईटी परिक्षेचा ऑनलाइन अर्ज भरला नाही किंवा भरत असताना तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांना तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी सुद्धा देण्यात येईल असे देखील बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर, जवळपास एक हजार कामांची चौकशी होणार
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांशी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच कॅगनेही यावर ठपका ठेवला होता. याच अनुषंगाने ठाकरे सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार जवळपास एक हजार कामांची खुली चौकशी केली जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या एक हजार कामांची चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यापैकी तब्बल 900 कामांची अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी होणार आहे, तर उर्वरित 100 कामांची विभागीय चौकशी होणार आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना ओळखली जाते. मात्र या योजनेच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा सुरू झालाय. फडणवीस सरकारच्या योजनेच्या चौकशी करण्यासाठी ठाकरे सरकारने चार सदस्यीय समिती गठीत केली होती आणि या समितीचा अहवाल राज्य सरकारला आता सादर झालाय.

19:57 PM (IST)  •  22 Jul 2021

Corona Update : राज्यात आज 7302 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 7756 रुग्णांची कोरोनावर मात, तर आज 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

Corona Update : राज्यात आज 7302 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 7756 रुग्णांची कोरोनावर मात, तर आज 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

15:03 PM (IST)  •  22 Jul 2021

सीबीआयच्या एफआयआरविरोधात राज्य सरकारची याचिका फेटाळली

सीबीआयच्या एफआयआरविरोधात राज्य सरकारची याचिका फेटाळली, अनिल देशमुख प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका,सीबीआय पोलीस अधिका-यांच्या बदल्या आणि सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयाचा तपास करू शकते - हायकोर्ट,पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची रितसर तक्रार करायला हवी होती - हायकोर्ट

13:10 PM (IST)  •  22 Jul 2021

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील इतर पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील एका बांधकाम व्यासायिकाने हा गुन्हा दाखल केला आहे. 

13:07 PM (IST)  •  22 Jul 2021

शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून प्रारंभ, मंदिर बंद असल्याने यावर्षी उत्सव साधेपणाने

आज पहाटे काकड आरतीनंतर साई प्रतिमा आणि पोथीची मिरवणूक काढून शिर्डीतील तिन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालीय. कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी गुरुपोर्णिमा उत्सव भक्तांविना साध्या पध्दतीने साजरा होतोय. मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच. बगाटे यासह अधिकारी पोथी मिरवणुकीत सहभागी झाले होते. साईबाबांना गुरुस्वरुप मानून दरवर्षी लाखो भक्त साईचरणी नतमस्तक होतात. मात्र यावेळी मोजके भाविक साईदर्शनासाठी आल्याच चित्र पहायला मिळतय.

12:19 PM (IST)  •  22 Jul 2021

संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी शिवसैनिकाची यवतमाळ ते मुंबई सायकल वारी

शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्यावे या मागणीसाठी शिवसैनिक गिरीश व्यास हे यवतमाळ ते मुंबई सायकल वारी करणार आहेत. हा प्रवास 700 किमीचा आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्याचं साकडं घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यवतमाळ येथून ते मुंबई दादर येथील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत जाण्यासाठी निघाले आहे. पुढील 8 दिवसात ते मुंबईला पोहचतील.

 

 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयातBaba Siddique Dead Update | बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात बिश्नाई गँगच्या अॅगलने पोलिसांचा तपास सुरुEknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget