(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून मंदिर व्यवस्थेची पाहणी
Breaking News LIVE Updates, 19 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Breaking News LIVE Updates, 19 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Mumbai Rain : येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचसोबत नैऋत्य वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Monsoon Session : आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, या अधिवेशनात नेमकं काय अपेक्षित, 'हे' मुद्दे वादळी ठरणार?
संसदेच्या पावसाळी अधिवेशन आजपापासून राजधानी दिल्लीत सुरु होत आहे. जवळपास 20 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात नेमकं काय काय अपेक्षित आहे, कुठले मुद्दे वादळी ठरु शकतील हे जाणून घेऊयात. मोदी सरकारच्या नव्या मंत्र्यांची या अधिवेशनातली ही पहिलीच परीक्षा असणार आहे. 7 महिन्यांपासूनही तोडगा न निघालेलं शेतकरी आंदोलन, कोरोनाच्या दुसरा लाटेतला कहर आणि तिसऱ्या लाटेची भीती, प.बंगालच्या निकालानंतर विरोधकांमध्ये वाढलेला आत्मविश्वास या पार्श्वभूमीवर हे आंदोलन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
India vs Sri Lanka: शिखर धवननं रचला इतिहास, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत केले हे विक्रम, गांगुलीचाही विक्रम मोडीत
India vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह भारतीय कर्णधार शिखर धवननं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. धवननं या सामन्यात पहिल्यांदा कर्णधारपद सांभाळलं आणि नाबाद 86 धावा करत काही विक्रमही आपल्या नावे केले. त्यानं माजी कर्णधार सौरव गांगुलीचा एक विक्रम मोडीत काढला.
मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून मंदिर व्यवस्थेची पाहणी
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर यांनी मंदिर परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरू
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरू. दोन लेन वरून ही वाहतूक धीम्या गतीने वाहतूक पुण्याला येत आहे. मात्र तिसरी लेन बंद आहे, त्या लेन वरील दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. बोरघाटात पावणे दहाच्या सुमारासची घटना आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प, काही वेळात वाहतूक सुरू होईल. अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली. युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
ठाणे डान्स बार प्रकरण : दोन सिनिअर पीआय निलंबित, तर दोन एसीपींची तात्काळ बदली
ठाणे डान्स बार प्रकरण : दोन सिनिअर पीआय निलंबित, तर दोन एसीपींची तात्काळ बदली करण्यात आली आहे
अकरावी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर
अकरावी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. 20 जुलै सकाळी 11:30 पासून ते 26 जुलै पर्यंत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आवेदन पत्र ऑनलाइन भरायचे आहेत.