एक्स्प्लोर

Breaking News LIVE : आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्ष

Breaking News LIVE Updates, 14 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्ष

Background

इंग्लंडप्रमाणे भारतातही लोकांना मास्कशिवाय फिरताना पाहायचंय - हायकोर्ट

मुंबई : रविवारी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीचा आनंद तिथले क्रिडा रसिक जसे प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सेंटर कोर्टवर विनामास्क घेत होते, तसा आनंद आपल्या भारतातही लोकांना मास्कशिवाय फिरताना घेतलेला पाहायचाय, अशी आशा मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे.

राज्यातील कोविड-19च्या सद्यस्थितीबाबत आणि येऊ घातलेल्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या सज्जतेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, विम्बल्डनची अंतिम लढत पाहताना सेंटर कोर्टवर उपस्थित एकाही प्रेक्षकाने मास्क घातले नव्हते, कोर्ट प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले होते. एका भारतीय क्रिकेटपटूनं तसेच बॉलिवूडच्या अभिनेत्रीनंही त्या सामन्याला हजेरी लावली होती. मात्र, त्यांनीही मास्क घातलेलं नव्हते ही बाब न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि भारतात अशी वेळ कधी येणार? भारतीय पुन्हा कधी सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू लागणार? अशी विचारणाही केली. त्यावर सगळ्यांचे लसीकरण ही त्यामागची एकमेव गुरुकिल्ली असल्याचं हायकोर्टानं नमूद केलं.  

एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न; झोटींग अहवाल गायब प्रकरणी प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

मुंबई : "राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीची चौकशी सुरु आहे. त्यांना क्लिनचिट देणारा अहवाल गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. मला वाटतंय, झोटींग समितीचा अहवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी गायब केला आहे. एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा आहे. तसं वातावरण देखील सध्या निर्माण झालं आहे.", आशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी झोटींग समितीचा अहवाल गायब होण्याबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, "आमचं सरकार असतं तर आमच्यावर आरोप झाला असता की, यांनीच जाणीवपूर्वक अहवाल गायब केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्यातील लोकांनी एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे."

दरमान्य प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना देखील उत्तरं दिली. नाना पटोले यांच्या विधानाबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, "नाना पटोले यांनी अनेकवेळा अशाप्रकारे आपली तलवार म्यांन केली आहे. आता नानांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे. नाना पटोले यांच्या भावना खऱ्या आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना खऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी भावना ताकदीने मांडल्या. परंतु त्यानंतर अजित दादांची नाराजी, मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असणार त्यामुळे ते शांत झाले आहेत. त्यामुळं त्यांनी तलवार म्यान केली आहे. भावना तर त्यांनी प्रकट केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे दिसत आहे. जे एकमेकांवर विश्वास ठेवू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय विश्वास देणार?"

Mumbai Airport Update: मुंबई विमानतळाची कमांड आता अदानी समूहाकडे; गौतम अदानी म्हणाले...

Adani Mumbai International Airport : अदानी समूहाने आता जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली आहे. मंगळवारी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही घोषणा केली. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती.

या करारानंतर अदानी ग्रुपचा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळात 74 टक्के हिस्सा असेल. त्यापैकी 50.5 टक्के भागभांडवल जीव्हीके समूहाकडून आणि उर्वरित 23.5 टक्के भागभांडवल भागीदार विमानतळ कंपनी दक्षिण आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूहाकडून अधिग्रहित केला जाईल.

एमआयएएल बोर्डाच्या बैठकीनंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने (एएएचएल) जीव्हीके ग्रुपकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान हाती घेतली. गौतम अदानी म्हणाले, की "जागतिक दर्जाचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापित करण्यास आम्हाला आनंद होत आहे. मुंबईला आमच्यावर अभिमान असेल. भविष्यातील व्यवसायासाठी अदानी समूह विमानतळात आणखी सुधारणा करेल. "

20:53 PM (IST)  •  14 Jul 2021

राज्यात आज 8602 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6067 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

Corona Update : राज्यात आज 8602 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6067 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद
 
19:16 PM (IST)  •  14 Jul 2021

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव  अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल.

या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र  व आवश्यक सर्व  अहर्ता प्राप्त केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील. साहसी पर्यटन धोरणाचा परिणामकारक अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय समिती व विभागीय स्तरावर समित्या गठित करण्यात येतील.  या समित्यांमध्ये जमीन हवा आणि जल पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल.साहसी पर्यटन उपक्रम सुरक्षित व शिस्तबध्दरित्या आयोजित करण्यासाठीच्या सविस्तर आणि तपशीलवार सुरक्षा मार्गदर्शक सूचना पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील

17:14 PM (IST)  •  14 Jul 2021

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्ष

आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 62 वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आलीय. राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार.

16:59 PM (IST)  •  14 Jul 2021

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्याची दखल,

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्याची दखल, कोरोनाकाळात धारावीत केलेल्या कार्याचा लंडनच्या संस्थेकडून गौरव, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कोरोनाकाळातील कार्याची दखल लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'नं घेतली, कोरोनाला हद्दपार करणारा धारावी पॅटर्न राबविण्यात विशेष योगदान दिल्याबद्दल 'सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट' या सन्मानपत्राने त्यांना गौरविण्यात आले. वर्ल्ड रेकॉर्ड बुकचे डॉ. दीपक हरके यांनी मुंबईत खासदार शेवाळे यांना हे सन्मानपत्र बहाल केले

16:55 PM (IST)  •  14 Jul 2021

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना, राज्यांच्या मुख्य सचिव आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश, सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारांमध्ये सुरु असलेल्या गर्दीवर कडक कारवाईचे निर्देश

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget