एक्स्प्लोर

Breaking News LIVE : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स

Breaking News LIVE Updates, 07 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स

Background

PM Modi Cabinet Expansion Date: मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजे बुधवारी संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

मंत्रिमंडळ कसे असेल?

मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून महिलांचे प्रतिनिधित्व वाढविले जात आहे. प्रोफेशनल, मॅनेजमेंट, एमबीए, पदव्युत्तर युवा नेत्यांचा मंत्रिमंडळा समावेश होण्याची शक्यता आहे. मोठ्या राज्यांना अधिक वाटा देण्यात येईल. बुंदेलखंड, पूर्वांचल, मराठवाडा, कोकण या भागांना वाटा देण्यात येईल अशी चर्चा आहे.

मंत्रिमंडळात लहान समुदायांना देखील प्रतिनिधित्व दिले जात आहे. यावेळी यादव, कुर्मी, जाट, पासी, कोरी, लोधी इत्यादी समाजाचे प्रतिनिधित्व दिसेल. या विस्तारानंतर दोन डझन ओबीसी किंवा मागासवर्गीय मंत्री यावेळी मंत्रिमंडळात दिसतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

अनेक मंत्रिपदं रिक्त 

शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर निघाले तसेच रामविलास पासवान व इतर काही मंत्र्यांच्या निधनानंतर सर्व मिळून अनेक मंत्रिपदे रिक्त आहेत. सध्या मोदी मंत्रिमंडळात फक्त 53 मंत्री आहेत. तर घटनेनुसार मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त 79 असू शकते. त्यामुळे सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 26 मंत्रिपदं रिक्त आहेत. तिथे कुणाची वर्णी लागणार येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.

JEE Main 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे( NTA)घेण्यात येणाऱ्या JEE Mains -2021 परीक्षेच्या उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये JEE Main 2021 तिसऱ्या सेशनची परीक्षा 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तर चौथ्या सेशन ची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखा आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केल्या आहेत

देशातील कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षेसाठी चार सेशन ठेवण्यात आले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिकची संधी परिक्षेसाठी मिळेल. यामध्ये ही परीक्षा फेब्रुवारी,मार्च, एप्रिल , मे या महिन्यात 4 सेशनमध्ये पार पडणार होती. त्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या असून दुसऱ्या लाटेत देशभरातील कोरोना स्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी जेईई मेन्स 2021 परीक्षेसाठी चार संधी देण्यात आल्या आहेत. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत

19:11 PM (IST)  •  07 Jul 2021

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स. भोसरी एमआयडीसी भुखंड प्रकरणात चौकशीसाठी उद्या हजर रहाण्याचं समन्स. आज त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.  याअगोदर जानेवारी महिन्यात या प्रकरणात ईडीने खडसेंची चौकशी केली आहे.

13:45 PM (IST)  •  07 Jul 2021

अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर लातुरात जोरदार पावसाला सुरुवात

लातूर : अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर लातुरात जोरदार पावसाला सुरुवात. मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. मात्र आज दुपारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. लातूर शहर, लातूर ग्रामीण भागांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळते. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याची माहिती आहे.

12:37 PM (IST)  •  07 Jul 2021

पालघर पोलिसांनी सोनसाखळी चोरणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या

पालघर जिल्ह्यात सक्रिय असलेल्या चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे . पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर भागात काही दिवसांपूर्वी रस्त्याने चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईक वरून आलेले चोरटे घेऊन पसार झाले होते . त्या नंतर परराज्यांतून या आरोपींना अटक करण्यात आली आहे . या टोळ्या संघटित गुन्हेगारी करत असल्याचं लक्षात असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे . जिल्ह्यातील महिलांची सुरक्षा ही सर्वोच्च स्थानी असल्याने अशा प्रकारच्या गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील यावेळी पालघर चे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिला आहे

12:13 PM (IST)  •  07 Jul 2021

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंची वर्णी जवळपास निश्चित; नारायण राणेंसह त्यांचे दोन्ही सुपुत्रही दिल्लीत दाखल

आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नारायण राणे सपत्नीक दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र दिल्लीत दाखल झाले आहेत. 

11:43 AM (IST)  •  07 Jul 2021

सात दिवसानंतर आज पुन्हा पंढरपूर शहरात लसीकरण सुरु

पंढरपूर : सात दिवसानंतर आज पुन्हा पंढरपूर शहरात लसीकरण सुरु झालं आहे. 100 दिवस उलटूनही अनेकांना दुसरा डोस न मिळाल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget