Breaking News LIVE : आज दिवसभरात अकोला जिल्हाभरात कोरोनाचे 473 नवे रूग्ण
Breaking News LIVE Updates, 28 February 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांची माहिती
मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांना आता राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राठोड यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. संजय राठोड प्रकरणावरुन सरकारची नामुश्की झाल्यामुळे हा मोठा निर्णय होणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
संजय राठोड अधिवेशानपूर्वी राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संजय राठोड प्रकरणी एक सूचक वक्तव्य केलं होतं की, मुख्यमंत्री सर्व काही पाहत आहेत. आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. त्यामुळे एकंदरीत मुख्यमंत्र्यांवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
पंतप्रधान मोदींची आज मन की बात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणर आहेत. आजची ही 74 वी 'मन की बात' असणार आहे. या द्वारे पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशवासियांचे लक्ष लागून आहे. याआधीच्या मन की बात कार्यक्रमात मोदी यांनी प्रजासत्ताक दिनावेळी शेतकऱ्यांच्या रॅली वेळी झालेला हिंसा पाहून ज्या पद्धतीने तिरंग्याचा अपमान झाला त्याचे दु:ख मोदी यांनी व्यक्त केले होते
फ्लिपकार्टमधील डिलिव्हरी बॉयची करामत, कंपनीला 8 लाखाचा चुना, नवी मुंबईत अटक
नवी मुंबई : ऑनलाईन साईटवर जावून ॲार्डर दिल्यानंतर अनेकांच्या पदरी बनावट वस्तू मारल्याच्या तक्रारी या आदी अनेक वेळा घडलेल्या आहेत. मात्र फ्लिपकार्ट ॲानलाईन कंपनीच्याच गळ्यात चक्क बनावट वस्तू मारण्याचा प्रताप समोर आला आहे. महागड्या वस्तू चुकीच्या पत्त्यावर मागवून त्या प्रत्यक्ष ग्राहकांना न देता मध्येच हडप करून लाखो रूपयांचा चुना डिलिव्हरी बॉयने फ्लिपकार्ट कंपनीला लावला आहे. संघपाल मोरे असं या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. ऐरोली येथे राहणारा आरोपी संघपाल मोरे हा फ्लिपकार्ट कंपणीत डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करत होता. आपल्या मित्रांना घेवून तो बनावट पत्त्यावर महागडे मोबाईल, लॅपटॉप, टॅब, घड्याळे, ट्रॅव्हल्स बॅग आदी सामान मागवत असे. प्रत्यक्ष डिलिव्हरी करण्यासाठी सामान घेवून गेल्यानंतर दिलेला मोबाईल नंबर स्विचॲाफ करून ठेवत होते. तीन वेळा जावूनही ग्राहक मिळाले नाही असे दाखवून मागवलेल्या वस्तू तीन आरोपी काढून घेत असत. यानंतर पार्सलमध्ये साबन , कांदा बटाटा भरून ते पार्सल कमीत जमा केले जात होते. अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्याने कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर केलेल्या तपासात आरोपींनी बनावट पत्ता देवून 8 लाख 24 हजारांच्या महागड्या वस्तू लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी डिलिव्हरी बाॅय बरोबर इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.