एक्स्प्लोर

IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 

IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ सप्टेंबर 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. टाटा कॅपिटलचा आयपीओ 17000 कोटींचा असण्याची शक्यता आहे.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात  2024 मध्ये अनेक कंपन्यांचे आयपीओ आणि एसएमई आयपीओ लिस्ट झाल्याचं पाहायला मिळालं. गुंतवणूकदारांना काही आयपीओ वगळता इतर आयपीओच्या माध्यमातून चांगला परतावा मिळाला. प्रीमियम एनर्जीज, वारी एनर्जीज, पीएनजी ज्वेलर्स, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स या कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. आयपीओचा ट्रेंड 2025 मध्ये देखील कायम राहण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये सर्वात मोठा आयपीओ ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आला होता.ह्युंदाईचा आयपीओ 25 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्यासाठी आला होता. 2025 मध्ये टाटा ग्रुपच्या टाटा कॅपिटल या कंपनीचा आयपीओ येण्याची शक्यता आहे. टाटा कॅपिटल 17000 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणणार आहे.

टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार अशी माहिती समोर येताच टाटांच्या कंपन्यांचे शेअर वधारले. टाटा कॅपिटलचा आयपीओ सप्टेंबर 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी टाटा कॅपिटलला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एनबीएफसी संदर्भातील नियमांची पूर्तता करावी लागेल. 

टाटा ग्रुपच्या टाटा टेक्नोलॉजी या कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर 2023 मध्ये आला होता. त्यामुळं या दशकातील टाटा ग्रुपचा हा दुसरा आयपीओ ठरणार आहे.फिनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार टाटा ग्रुपनं टाटा कॅपिटलच्या आयपीओसाठी कोटक इन्वेस्टमेंट बँकिंगला  प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. 

सप्टेंबर 2022 मध्ये आरबीआयनं टाटा कॅपिटल फिनान्शिअल सर्विसेसला अप्पर लेअर सिस्टीमेकली महत्त्वाची एनबीएफसीचा दर्जा दिला होता. त्यानुसार त्यासंदर्भातील नियमांची पूर्तता करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला होता. लिस्टींग साठी देखली तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. 

टाटा कॅपिटलकडून टाटा कॅपिटल फिनान्शिअल सर्विसेस, टाटा कॅपिटल हाऊसिंग फिनान्स , टाटा क्लीनटेक कॅपिटल यांना कर्ज दिलं जातं. याशिवाय टाटा सिक्युरिटीज, टाटा कॅपिटल सिंगापूर आणखी एका खासगी कंपनीसाठी इन्वेस्टमेंट अँड अडव्हायजरी बिझनसेस म्हणून काम करते. 

टाटा कॅपिटलचे अनलिस्टेड शेअर सध्या 900 रुपयांवर ट्रेड करत आहेत. गेल्या वर्षभरात या कंपनीचे शेअर 450 पासून 1100 रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्याच्या ट्रेडनुसार कंपनीचं बाजारमूल्य 3.74 अब्ज रुपयांच्या जवळपास असेल. 

टाटा कॅपिटलचे 92.93 टक्के शेअर टाटा सन्सकडे आहेत. टाटा केमिकल्सला आयपीओद्वारे अधिक भागिदारी मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या त्यांच्याकडे 3 टक्के शेअर आहेत. टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशनकडे 2.2 टक्के शेअर आहेत. टाटा कॅपिटलचा महसूल 34 टक्क्यांनी वाढून 18178 कोटींवर पोहोचला आहे. तर, नफा 3315 कोटी रुपयांचा झाला आहे. 

इतर बातम्या :

IPO Update : EIE च्या 89 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओतून गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा, शेअर किती रुपयांवर?

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हाTop 70 at 7AM Superfast 25 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 25 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्ससकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 25 December 2024  एबीपी माझा  Superfast

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
Embed widget