Breaking News LIVE : हिंगोलीत 1 ते 7 मार्च दरम्यान संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Breaking News LIVE Updates, 27 February 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Feb 2021 08:18 PM
हिंगोली जिल्ह्यातील वाढत्या कोरोना चा प्रादुर्भाव पाहता हिंगोली चे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोलीत 1 ते 7 मार्च दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात त्यांनी आज आदेश काढले आहेत या सात दिवसांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना जिल्ह्यामध्ये मुभा असणार आहे त्या व्यतिरिक्त शासकीय निमशासकीय कार्यालय बँका केवळ शासकीय कामकाजा करीता सुरू राहतील तसेच दूध विक्रीला वेळेचे बंधन असणार आहे व इतर सर्व व्यवहार हे बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश त्यांनी काढले आहेत या दरम्यान कोणतेही नागरिक बाहेर पडल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची त्यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांना अधिवेशनाआधी राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांना अधिवेशनाआधी राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी, जि. अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.
 
विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. के.पी. विश्वनाथ यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार 4 नोव्हेंबर 2020 पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.  
 
डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम.टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीपीएच.डी प्राप्त केली आहे.   
पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात महिलांकडून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न. स्वयंम महिला मंडळ मुंबई यांच्याकडून देवीला साकडे आणि मंदिराचे शुद्धीकरण. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकारणार वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. तेच संजय राठोड या मंदिरात येऊन देवीसमोर खोटं बोलतात. त्यामुळे ज्योती साठे, स्मिता कवडे आणि योगिता साळवे यांनी गंगाजलाने मंदिराचे शुद्धीकरण केले.

भिवंडी मतदारसंघाचे भाजप खासदार कपिल पाटील आज कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते. त्यांच्या ताफ्यातील गाड्या खाली पार्क करून ते पाटीदार भवन हॉल येथील कार्यक्रमासाठी गेले होते. यादरम्यान पाटील यांच्या ताफ्यातील अंगरक्षकांच्या स्कॉर्पियो गाडीने अचानक पेट घेतला .भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली .याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले .मात्र या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले
मेहकर तालुक्यातील जवळा गावची ग्रामपंचायत गावच्या उपसरपंचानेच जुगारीचा अड्डा बनविल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे गावातीलच नागरिकांनी शासकीय इमारतीत जुगार खेळणाऱ्या उप सरपंचाचा व्हिडिओ बनवून समाज माध्यमात व्हायरल केला. गावातील नागरिक एव्हड्यावरच थांबले नाही तर नागरिकांनी मेहकर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना या बाबत तक्रार देखील दिलीय. त्यामुळे गावाचे सरपंच, उपसरपंच हे गावच्या ग्रामपंचायत या शासकीय इमारतीत जुगार खेळत असतील तर न्याय कुणाकड़े मागावा अशी भावना गावातील नागरिकांची आहे.
मेहकर तालुक्यातील जवळा गावची ग्रामपंचायत गावच्या उपसरपंचानेच जुगारीचा अड्डा बनविल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे गावातीलच नागरिकांनी शासकीय इमारतीत जुगार खेळणाऱ्या उप सरपंचाचा व्हिडिओ बनवून समाज माध्यमात व्हायरल केला. गावातील नागरिक एव्हड्यावरच थांबले नाही तर नागरिकांनी मेहकर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना या बाबत तक्रार देखील दिलीय. त्यामुळे गावाचे सरपंच, उपसरपंच हे गावच्या ग्रामपंचायत या शासकीय इमारतीत जुगार खेळत असतील तर न्याय कुणाकड़े मागावा अशी भावना गावातील नागरिकांची आहे.
नांदेड : नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील निर्माणाधीन पूल कोसळला, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मजुरांचा जीव जीव टांगणीला.


नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून नांदेड -बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील फुलवळ गावाजवळील निर्माणाधीन असलेला पूल निकृष्ट कामामुळे कोसळलाय. आज सकाळच्या सुमारास फुलवळ गावा नजीक राष्ट्रीय महामार्गावर या पुलाचे काम असताना हा पुल कोसळला. सुदैवाने यात काम करणारे मजूर वेळीच बाजूला झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नांदेड : नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील निर्माणाधीन पूल कोसळला, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मजुरांचा जीव जीव टांगणीला.


नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून नांदेड -बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील फुलवळ गावाजवळील निर्माणाधीन असलेला पूल निकृष्ट कामामुळे कोसळलाय. आज सकाळच्या सुमारास फुलवळ गावा नजीक राष्ट्रीय महामार्गावर या पुलाचे काम असताना हा पुल कोसळला. सुदैवाने यात काम करणारे मजूर वेळीच बाजूला झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 वरील फुलवळ गावाजवळील निर्मानाधीन असलेला पूल निकृष्ट कामामुळे कोसळला आहे. आज सकाळच्या सुमारास फुलवळ गावा नजीक राष्ट्रीय महामार्गावर ह्या पुलाचे काम असताना हा पुल कोसळला,तसेच अब्युटमेंट वाॅल पण पुर्ण पणे झुकलेली क्रॅक झाली आहे.परंतु सुदैवाने यात काम करणारे मजूर वेळीच बाजूला झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नांदेड : एज्युकेशन हब म्हणून ओळख असलेल्या नांदेडच्या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. यात नांदेड महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कोरोना तपासणीत पाच शिक्षक आणि 16 विद्यार्थाी असे 21 जणांना कोरोनाची लागण झालीय. कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना खाजगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षक विद्यार्थ्यांची चाचणीची करण्यात येत आहे.या खासगी कोचिंग क्लासेस मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर याठिकाण चे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात,आणि त्याच्यातच 21 जण कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
कोल्हापूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी कोल्हापुरात देखील भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर शहरातील बिनखंबी गणेश मंदिर इथं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जागे व्हा, शरद पवार जागे व्हा च्या घोषणा देण्यात आल्या. महाद्वार रोड परिसरातील मुख्य चौकात हे आंदोलन करण्यात आल्यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ महिला आंदोलकाना ताब्यात घेतलं.
भिवंडी मतदारसंघाचे भाजप खासदार कपिल पाटील आज कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते. त्यांच्या ताफ्यातील गाड्या खाली पार्क करून ते पाटीदार भवन हॉल येथील कार्यक्रमासाठी गेले. यादरम्यान पाटील यांच्या ताफ्यातील अंगरक्षकाच्या स्कॉर्पियो गाडी रस्त्यावर उभी असताना गाडीने अचानक पेट घेतला .भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली.याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले .मात्र या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार,

अधिवेशन दहा दिवस होत असल्यामुळे दोन वेळा कोरोना चाचणी होणार,

पाच दिवस कामकाज पुन्हा एकदा कोरोना चाचणी होणार,

जेणेकरून या पाच दिवसात कोणी कोरोना बाधित झाले तर स्पष्ट व्हावे,


अधिवेशन 1 मार्च रोजी होत आहे,
त्यासाठी आज आणि उद्या टेस्ट होणार,

तर आठ मार्च ते दहा मार्च कामकाज साठी सहा आणि सात मार्च रोजी दुसरी कोरोना चाचणी होणार,
पिंपरी चिंचवडमधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिकांची आज सोडत पार पडली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर या सोडतीला ऑनलाइन सहभागी झाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र अनुपस्थित राहिले. याची सोडत 11 जानेवारीला होणार होती. पण त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डावलून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्याचं डाव होता. त्यामुळे राष्ट्रवादीने अभूतपूर्व गोंधळ घातला आणि सोडत रद्द करण्याची वेळ भाजपवर आली. तेंव्हा लाभार्थ्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या राजकारणावर तोफ डागली. त्यामुळे दोघांच्या राजकारणात लाभार्थ्याना रिकाम्या हाती परतावे लागले होते. पण आज अखेर सर्व लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे.
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आमदार खासदार यांनी केली विमानतळाची पाहाणी,

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले गाडीचे सारथ्य,

पालकमंत्री सतेज पाटील,शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने,संजय मंडलिक यांना सोबत घेत एकाच गाडीतून पाहाणी,

वेगवेगळ्या पक्षातील नेते विमानतळाच्या कामासाठी एकत्र
,
श्रीमंत शाहू महाराज यांचीही उपस्थिती,
चंद्रपूर : मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी चंद्रपुरात आज भाजपने रास्ता रोको केला. चंद्रपुरात भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर-मूल महामार्गावर महाविदर्भ चौकात चक्का जाम करून आक्रोश व्यक्त केला. पूजा चव्हाण या मयत तरूणीला न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. वनमंत्री राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय या मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशी शक्य नसल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांचा बचाव करत असल्याचा आरोप करत आधी राजीनामा द्या आणि मग चौकशी करण्याची जोरकस मागणी भाजप कडून रेटण्यात आली.
औरंगाबाद पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण.औरंगाबाद भाजपा महिला आघाडीचे आंदोलन.शहरातील आम्रपरित चौकात आंदोलन. सरकार विरोधात घोषणाबाजी.महिलांनी काळ्या साड्या परिधान करून केला निषेध ..
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड दोषी असल्याचा आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. या विरोधात आज नवी मुंबईत भाजपा महिला मोर्चा कडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली सायन - पनवेल हायवे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. रस्ता रोको करण्यासाठी जाणार्या भाजपा महिला आणि पोलीसांमध्ये चांगलीच झटापट झाली. यावेळी पोलीस बंदोबस्त झुगारून रस्ता रोको करण्यासाठी निघालेल्या महिला आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. राज्य सरकार पोलीसांच्या माध्यमातून दडपशाही करीत असल्याचा आरोप भाजपा महिला मोर्चा कडून करण्यात आलाय.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून औरंगाबाद भाजपा महिला आघाडीने आंदोलन केलं. शहरातील आम्रपरित चौकात आंदोलन हे आंदोलन करण्यात आलं असून त्यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाच्यावेळी महिलांनी काळ्या साड्या परिधान करून राज्य सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.
- मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपू या! असे आवाहन केले आहे.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही? पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच," या भूमिकेचा देखील मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा शिरवाडकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, मराठीला माय मराठी म्हणण्याचा, अमृताते ही पैजा जिंकणारी भाषा म्हणून तिचा अभिमान मिरविण्यासाठी "मी मराठी, माझी मराठी!' असा बाणा जपू या! त्यासाठी मराठीत विचार करु या, मराठीत बोलू या, व्यक्त होऊ या. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू या. मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचे स्वीकार करू या. मुलांमध्ये, तरुणांमध्ये मराठीची ओढ वाढावी,तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करू या. नव तंत्रज्ञान, नव माध्यमात, समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर करू या!
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नागरिकांची तुफान गर्दी झाल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः उडाला फज्जा उडाल्याचं पहायला मिळालंय. त्यामध्ये अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही. हजारोंच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावाच्या वेळी होणारी गर्दी चिंता वाढवणारी ठरत आहे.
अकोला : अकोला, अकोट आणि मुर्तिजापूर शहरातील लॉकडाऊन 8 मार्चपर्यंत वाढवला. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राहणार सकाळी 8 ते 3 या वेळेत सुरू. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. बाकी शहरातील निर्बंधही कायम राहणार.
आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला, जगभरातील मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्तानं शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठी ही जगात सर्वधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी आहे. मराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता माळी, संत नरहरी सोनार यांच्यासारख्या संतांनी त्यांचे अलौकिक विचार मराठी भाषेत मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेशी मराठीतंच संवाद साधला. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी त्यांच्या साहित्यकृतींतून मराठी भाषा समृद्ध केली. गावखेड्यातल्या बोलीभाषांनी मराठीचं सौंदर्य अधिक वाढवलं. आज बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी, देशात तिसऱ्या आणि जगात दहाव्या क्रमांकावर आहे. अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. हे करत असतानांच मराठी भाषेची उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मराठी ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे. जागतिक स्तरावर संपर्क, संवाद, व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळालं पाहिजे. संगणकाच्या आज्ञावली मराठीत विकसित झाल्या पाहिजेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरंच औद्योगिक, आर्थिक, न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकानं स्वत:पासून, वैयक्तिक जीवनात, व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करुन करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
औरंगाबाद शहरातील एका कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत जेवण मिळाले नसल्यामुळे रुग्णांनी थेट रस्त्यावर येऊन जेवणाची शोधाशोध सुरू केल्याचं समोर आलंय. औरंगाबाद महापालिकेकडून देण्यात येणारे जेवण मिळाले नसल्यानं संतप्त रुग्णांनी सेंटरचे गेट काढून बाहेर पडले. ही घटना शुक्रवारी घडली.
सांगली -

सांगलीचे राष्ट्रवादीचे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी शरद पवार यांच्या भेटीला बारामतीमध्ये ,

गोविंदबागेत शरद पवार यांची घेणार सदिच्छा भेट,

सोबत राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार उपस्थित
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोव्हिड चाचणी केंद्रावर होणाऱ्या RTPCR व Rapid Antigen Test कोरोना चाचण्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी समिती गठीत करून चौकशी केली असता 7 हजार 882 कोरोना रिपोर्ट बनावट आल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या निगेटीव्ह रिपोर्टमध्ये हा प्रकार झाला होता. परिवारातील सदस्य पॉझिटिव्ह आल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ड्रेस करण्यासाठी इतर सदस्यांची नावे पालिका नोंदवत होती. मात्र हीच नोंदलेली नावे कोरोना निगेटीव्ह यादीत गेल्याने विना टेस्ट करता रिपोर्ट आला कसा हा सवाल उपस्थित झाला होता . याबाबत वरिष्ठांनी लक्ष न दिल्याने दोषी असणारांवर कारवाईचे संकेत आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. दरम्यान चुकीचे नावे नोंद झाली असली तरी यात कोणताही आर्थिक घोटाळा झाला नसल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे.
गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..
आज आणि उद्या नागपुरमध्ये दोन दिवसांचे बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. बाजारातील सर्व दुकाने, सर्व हॉटेल, रेस्टोरेंट, सर्व सरकारी व खाजगी कार्यालय बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा - दूध, भाजीपाला, पेट्रोल, औषध ह्या दुकानांना नियमात राहून उघडे राहण्याची परवानगी राहणार आहे. स्वतंत्र प्रवेश असलेली किराणा दुकानं सुरू राहू शकतील. मात्र, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील किराणा दुकान असल्यास बंद ठेवावे लागेल. नागरिकांनी कारणाशिवाय बाहेर येऊ नये असे आवाहन आहे, मात्र सक्ती नाही.

पार्श्वभूमी

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


 


 दहावी, बारावी बोर्डाचे अंतिम वेळापत्रक जाहीर



राज्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, राज्य मंडळाकडून 16 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या सूचनांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.


 पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे लष्कर कोर्टात खटला दाखल



पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे लीगल जस्टीस सोसायटीच्या वतीने खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. अॅड. भक्ती राजेंद्र पांढरे (वय 24) यांनी लष्कर न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.पूजा चव्हाण यांचा मृत्यू संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आरोपीद्वारा यातील पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करावी आणि तपास करावा यासाठी न्यायालयाचे आदेश आवश्यक असल्याचे याद्वारे भक्ती पांढरे यांनी न्यायालयामोर मांडले.


 बंगाल, केरळसह 5 राज्यात निवडणुका जाहीर; पश्चिम बंगालमध्ये तब्बल 8 टप्प्यात होणार मतदान



निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.