Survey on Jobs : नोकरी (Job) करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे मिळमारा पगार आणि दुसरी म्हणजे नोकरीची हमी. विशीष्ट काळानंतर काही कर्मचारी (Employee) पगाराला महत्व देतात. पण नोकऱ्यांसंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात (Survey on Jobs) 10 पैकी 8 कर्मचारी त्यांच्या पगारापेक्षा त्यांच्या कामाच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व देतात. म्हणजेच त्यांच्या कामात कोणत्या प्रकारचे कौशल्य वापरले जाते हे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ज्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला अधिक महत्त्व दिले जाते, तेथे कर्मचारी टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. 


सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की 63 टक्के एचआरला असे आढळून आले की टॅलेंटला महत्त्व दिल्याने कर्मचाऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याच वेळी, स्किल फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन (SFT) सारख्या कार्यक्रमांचा कर्मचाऱ्यांवर खूप सकारात्मक परिणाम झाला आहे. एकूण 1775 कंपन्यांमधील 240 एचआर लीडर्स आणि 340 कर्मचाऱ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षणात अमेरिका, भारत, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.


कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला महत्त्व दिल्यास व्यवस्थापन उत्तम


काही वेळा पारंपारिक पद्धतींद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे कौशल्यांना तितकेसे प्राधान्य मिळत नसल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. परंतु जर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला महत्त्व दिले तर अशा परिस्थितीत कंपनीचे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. यासह, कंपनीच्या निकालात 5 पट सुधारणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच या अहवालात असेही म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या परिवर्तनादरम्यान होणाऱ्या खर्चाला अनेकदा कमी लेखले जाते. अशा स्थितीत खर्चात 3 ते 10 पट फरक दिसून येतो.


कंपन्यांनी कौशल्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज 


नवीन भरती करताना कंपन्यांनी कौशल्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. हे कंपन्यांना त्यांच्या वास्तविक खर्च समजून घेऊन चांगल्या लोकांना कामावर घेण्यास मदत करेल. यासोबतच कंपन्यांना त्यांच्या कौशल्यातील अंतर भरून काढण्यासाठी मदत केली जाईल. दरम्यान, अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला महत्त्व दिले तर अशा परिस्थितीत कंपनीचे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्यामुळं त्याचा कंपनीला फायदा होतो, असंही अहवालात सांगण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


धक्कादायक! नोकरी करणं कठीण, 57 टक्के नोकऱ्यांमध्ये 20 हजारांपेक्षा कमी पगार, मुलभूत गरजा पूर्ण करणही अवघड