ठाणे : बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता बदलापूरजवळील अंबरनाथमध्येही असाच अल्वपयी मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा महिलांवरी अत्याराचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचे दिसून येते. अंबरनाथ मधील 9 वर्षीय अल्पवीयन मुलीवर तिच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालयाशेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय नराधमानाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या नराधमाने अश्लील व्हिडिओ दाखवून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अंबरनाथ मधील एका भागातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग जुलैमध्ये झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेतील आरोपी आणि पीडित हे शेजारी राहत आहेत, एकमेकांचे ओळखीचे देखील आहेत. जुलै महिन्यात पीडित एका शौचालयजवळ आली होती, तिला आरोपीने अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केला. त्यानंतर, हे प्रकरण आपसात मिटवून घेतले. मात्र, 20 ऑगस्ट रोजी पीडित आणि आरोपी यांच्या कुटुंबात पुन्हा वाद झाला आणि त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन मागच्या महिन्यात घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. आरोपीला उल्हासनगर न्यायालयात हजर केले न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे. मात्र, या घटनेमुळे अशा कितीतरी घटना समाजात घडत असून दाबल्या जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. समजातील अशा विकृतींना वेळीच ठेचलं पाहिजे, तरच अशा घटनांना आळा मिळेल. त्यासाठी केवळ कायदा करुन नाही, तर कायद्याच कठोर अंमलबजावणी करणे गरजेची असल्याची भावनाही वेळोवेळी व्यक्त होत आहे.
24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद
दरम्यान, बदलापूरमधील घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असून महाविकास आघाडीकडून येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देत आहे. तरी जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.
हेही वाचा
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर