Breaking News LIVE : राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
Breaking News LIVE Updates, 06 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
राज्यात काल 6695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7120 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल 6695 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.
राज्यात काल कोरोनामुळे 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 34 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74 हजार 995 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (10), हिंगोली (76), अमरावती (87), वाशिम (94), गोंदिया (95), गडचिरोली (31) या सात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 974अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
वरुण सरदेसाई युवासेनाप्रमुख होणार? राजकीय वर्तुळात चर्चा
युवासेनेला नवा सरसेनापती मिळणार असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे मंत्रिपदाच्या कामात व्यस्त असल्यानं त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं प्रमुखपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. ठाकरे कुटुंबाबाहेर पहिल्यांदाच महत्वाचे पद जाणार आहे. गेले काही दिवस वरुण सरदेसाई यांनी महाराष्ट्रभरात दौरे सुरु केलेत. येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांची फौज शिवसेनेच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न युवासेनेकडून सुरू आहे. पण आदित्य ठाकरे मंत्रिपदी व्यस्त असल्यानं युवासेनेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झालीय.
येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा विचार : उदय सामंत
राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत. आता कॉलेज सुरु होण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंत यांनी सांगितलं. बुधवारी कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंय यांनी सांगितलं.
राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट! दिवसभरात 5 हजार 539 नवीन रुग्णांची नोंद तर 5 हजार 859 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज. आज 187 कोरोना रुग्णांचा मृत्यू.
नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचा शिरकाव, 30 रुग्ण आढळून आल्याने खळबळ, 155 सॅपल्स पाठवले होते तपासणीला त्यापैकी 30 जणांना डेल्टा व्हेरियन्ट
नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचा शिरकाव, 30 रुग्ण आढळून आल्याने खळबळ, 155 सॅपल्स पाठवले होते तपासणीला त्यापैकी 30 जणांना डेल्टा व्हेरियन्ट, ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण, जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यात आढळले तर नाशिक शहरात 2 रुग्ण, सर्व रुग्ण,आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली, ज्या गावात रुग्ण आढळले तिथे अधिक खबरदारी घेतली जाणार
कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारवरून चारचाकी गाडी खोल दरीत कोसळली, चारचाकी मधील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारवरून चारचाकी गाडी खोल दरीत कोसळली, चारचाकी मधील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती, मसाई पठारावर फिरण्यासाठी गेल्यानंतर घडला अपघात, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
मला लोकांचा जीव महत्वाचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावलं
मला लोकांचा जीव महत्वाचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावलं, आठवड्याभरात परिस्थिती पाहुन निर्णय घेईन, मुख्यमंत्र्यांचं हॅाटेल मालकांना आश्वासन, हॅाटेल्सच्या मालक संघटनांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार, याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक
राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार, याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक, सध्या आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत