Breaking News LIVE : मंदिर उघडून अभिषेक करणाऱ्या शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल
Breaking News LIVE Updates, 30 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...
LIVE
Background
योग्य वेळी सीडी लावणार, पोलिसांकडून तिची चौकशी सरुये, अहवाल आला की, जाहीर करणार : एकनाथ खडसे
मी ईडी लावली तर मी सिडी लावेल, हे वक्तव्य केलं होतं त्यानुसार ही सिडी योग्य वेळी येईलच, या सिडीची चौकशी पोलीस गेल्या काही महिन्यांपासून करत आहेत, त्याचा अहवाल आल्यावर मी तो जाहीर करणार आहे, असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. दरम्यान, भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसेंची ईडीकडून सध्या चौकशी सुरु आहे. तसेच याप्रकरणी एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, "मी ईडी लावली तर मी सिडी लावेल, हे वक्तव्य केलं होतं त्यानुसार ही सिडी योग्य वेळी येईलच, या सिडीची चौकशी पोलीस गेल्या काही महिन्यांपासून करत आहेत, त्याचा अहवाल आल्यावर मी तो जाहीर करणार आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून मी राजकारणात आहे. या कालावधीत माझ्यावर कोणताही आक्षेप आलेला नाही. मात्र सध्या जमिनी संदर्भात माझ्यावर लावण्यात आलेला आक्षेप हा हेतू पुरस्कार लावण्यात आलेला आहे."
"या व्यवहाराची संपूर्ण चौकशी झाली आहे. हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे. या प्रकरणात कोणतंही तथ्य नसल्याचा अहवाल एसिबीनं दिलेला आहे आणि तरीही ईडीची चौकशी सुरु आहे. मात्र कर नाही तर डर कशाला पाहिजे. म्हणून मीसुद्धा या ईडी चौकशीला सामोरं जात आहे. महाराष्ट्राच्या विधान सभेत मी अनेक वेळा माझा दोष काय आहे? ते विचारलं आहे. आणि दोषी असेल तर फासावर लटकवा, असंही सांगितलं होतं. आता पुन्हा ईडीनं चौकशी लावली आहे." , असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.
ईडीच्या नोटीसनंतर शिवसेना नेते, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
ईडीच्या नोटीसनंतर शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीची नोटीस आज संध्याकाळी मिळाली, त्यात कुठल्याही प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख नाही. केवळ 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं असं नोटीसमध्ये म्हटलं आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
नोटीसमध्ये स्पष्ट कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे ही नोटीस कशा संदर्भात आहे हे आता सांगता येणे सध्यातरी कठीण आहे. नोटीसमध्ये सविस्तर काही लिहीलं नाही त्यामुळे कुठल्या कारणास्तव ही नोटीस दिली हे सांगता येणार नाही. केवळ चौकशीसाठी बोलावल्याचा त्यात उल्लेख आहे. यावर कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही त्याला उत्तर देऊ. ईडीची नोटीस येईल ही असा अंदाज होताच. आता कायदेशीर बाबींचा विचार करुन याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र."
मंदिर उघडून अभिषेक करणाऱ्या शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल
मंदिर उघडून अभिषेक करणाऱ्या शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दानवे यांच्यासह 6 ते 8 कार्यकर्ते आणि मंदिर पुजाऱ्यावर ही गुन्हा दाखल झाले आहे. कोविड काळात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचाच
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचाच, राज्य सरकारने मागील वर्षी निर्णय घेतला होता मात्र त्यात मराठी विषय सक्तीचा असा शब्द प्रयोग नसल्याने अनेक शाळांनी पळवाट काढत मराठी विषय टाळला होता. आज पुन्हा एकदा शासन निर्णय काढून राज्यातील सर्व शाळांच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.
भाजप आमदार रवी चव्हाण यांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
डोंबिवली गणेश मंदिर समोर मंदिर उघडण्यासाठी भाजपतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप आमदार रवी चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजप आमदार रवी चव्हाण यांनी राज्य सरकारने अनलॉक मध्ये सर्व आस्थपणा सुरू केल्या असताना फक्त मंदिर बंद करण्यात आली आहेत. देशभरात सर्वत्र मंदिर सुरु असताना फक्त महाराष्ट्रातच मंदिर बंद आहेत. महाविकास आघाडी सरकार टिकल पाहिजे, अल्पसंख्यांकांची पाठराखण करण्यासाठीच मंदिर उघडली जात नाहीत असा आरोप केला.
पुण्यात मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आंदोलनात सहभागी, कसबा मंदिराच्या समोर आंदोलन सुरू
BREAKING News Live : पुण्यात मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आंदोलनात सहभागी, कसबा मंदिराच्या समोर आंदोलन सुरू https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-august-30-2021-maharashtra-political-news-1001107