Breaking News LIVE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Breaking News LIVE Updates, 27 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 22 सप्टेंबर पासून सुरु होणार असून 10 ऑक्टोंबरपर्यंत ही परीक्षा असेल. बारावी बोर्डाची पुरवणी परीक्षा 16 सप्टेंबरपासून सुरू होऊन 11 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. जे विद्यार्थी दहावी ,बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाही, तसेच एटीकेटी साठी पात्र विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल.
राज्यातील विमानतळांसंदर्भात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले पत्र
महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या कामांबाबत नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले. पत्रात अकोला विमानतळासाठी आवश्यक उर्वरित जमीन त्वरित द्यावी, औरंगाबाद विमानतळासाठी आवश्यक असलेली 182 एकर जमीन द्यावी, गोंदिया, कोल्हापूर विमानतळासाठीही आवश्यक जमीन द्यावी, अमरावती, रत्नागिरी विमानतळाचा विकास करावा, सोलापूर विमानतळाच्या आड येणारी चिमणी पाडावी यासह अनेक अन्य गोष्टींचाही पत्रात उल्लेख केला आहे.
चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीचं निधन
सीमाभागातल्या लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या नूल गावी त्यांची प्राणज्योत मालवली. सुरगीश्वर मठाचे ते मठाधीपती होती.
पासबुक, चेकबुक हरवल्यास अॅफिडेव्हिटची मागणी बेकायदेशीर, मुंबई पोलीस आयुक्तांनी काढले परिपत्रक
पासबुक, चेकबुक, ड्रायव्हिंग लायसन किंवा अन्य महत्वाची कागदपत्रं हरवल्यास पोलीस तक्रार केली जाते. मात्र कधी कधी पोलीस अशा वस्तू हरवल्याचं अॅफिडेव्हिट आणण्यास सांगतात. हे बेकायदेशीर असून याची मागणी करणाऱ्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी काढले परिपत्रक
गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट, महिला वाहकाच्या हाताला इजा
गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट, महिला वाहकाच्या हाताला इजा , मशीनच्या अनेक तक्रारी येत असताना ही गंभीर घटना,