Breaking News LIVE : सीरियल बॉम्बस्फोटांमुळे काबुल स्तब्ध, 4 अमेरिकन सैनिक ठार, 60 हून अधिक जखमी, तालिबानकडून घटनेचा निषेध
Breaking News LIVE Updates, 26 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याची राज्य सरकारची ग्वाही
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टानं दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत राणेंविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे तूर्तास नारायण राणेंना चौकशीसाठी कुठेही हजेरी लावण्याची गरज नाही. मात्र महाड कोर्टानं जामीनाच्या ज्या अटीशर्ती लावल्या आहेत त्या मात्र त्यांना पूर्ण कराव्याच लागतील.
दरम्यानच्या काळात नारायण राणेंनी अशी कोणतीही विधानं अथवा कृत्य करू नयेत ज्यानं आम्हाला पुन्हा कारवाईसाठी भाग पाडलं जाईल अशी अट विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी कोर्टापुढे मांडली होती. याला विरोध करत अशी हमी देता येणार नाही, कारण असं करणं याचिकाकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखं होईल असा युक्तिवाद नारायण राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी हायकोर्टात केला. जो ग्राह्य धरत हायकोर्टानं तशी कोणतीही अट न घालता नारायण राणेंना अंतरिम दिलासा दिला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे राहुल गांधी यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर, म्हणाल्या तुम्हाला मुद्रीकरण समजते का?
नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईन (NMP) वरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. आज त्यांनी ट्विटरवर #IndiaOnSale या हॅशटॅगसह लिहलंय, की "सर्वात आधी विश्वास विकला आणि आता.." याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 वर्षात जनतेच्या पैशाने बनवलेली देशाची संपत्ती त्यांच्या काही उद्योगपती मित्रांना विकत आहेत. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, की "त्यांना (राहुल गांधी) मोनेटाइजेशन समजते का? काँग्रेसनेच देशाची संसाधने विकली आणि त्यात लाच घेतली." त्या म्हणाल्या की, काँग्रेस सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे 8,000 कोटी रुपये उभारण्यासाठी मोनेटाइजेशन केलं, 2008 मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकासाठी प्रस्ताव मागवण्या आले होते.
पालघर जिल्ह्याचा प्रवास कोरोनामुक्तीकडे; 95 टक्के कोरोना हद्दपार, 859 गावं कोरोनामुक्त
पालघरचा प्रवास कोरोनामुक्तीकडे सुरु असून जिल्ह्यातून 95 टक्के कोरोना हद्दपार झाला आहे. यामध्ये 859 गावं कोरोना मुक्त झाली आहेत. जिल्ह्यासमोर विधवा महिला तसेच एकल माता यांच्या पुनर्वसनाचं आव्हान असून याकरिता उपसमिती गठीत करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांनी पालघरमध्ये जिल्हा विकास कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत न होणाऱ्या नऊ विभागांचा बुधवारी पालघर मध्ये आढावा घेतला.
एकल व विधवा महिला यांचं पुनर्वसन आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणी करण्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. जिल्हा विकास कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत न होणाऱ्या कामगार, परिवहन, आदिवासी विकास, नाभिक, एकल महिला, रोजगार हमी, रिक्षा चालक, फेरीवाले इतर मागास प्रवर्ग, लोककलाकार यांच्यासह नऊ विभागांचा आढावा दौरा पूर्ण झाल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
सीरियल बॉम्बस्फोटांमुळे काबुल स्तब्ध, 4 अमेरिकन सैनिक ठार, 60 हून अधिक जखमी, तालिबानकडून घटनेचा निषेध
सीरियल बॉम्बस्फोटांमुळे काबुल स्तब्ध, 4 अमेरिकन सैनिक ठार, 60 हून अधिक जखमी, तालिबानकडून घटनेचा निषेध
अमरावती : मेळघाटच्या धारणीत 41 किलो गांजा जप्त
गुप्त माहितीच्या आधारे धारणी पोलिसांनी दीया फाट्या जवळ असलेल्या एपीएमसी नाक्यावर संशयित दोन आरोपींना नाक्यावर अडवून तपासणी केली असता मोटर सायकलच्या मधात पांढऱ्या रंगाच्या बोरीत गांजा असल्याचे निदर्शनास आले.. तात्काळ कार्यवाही करून घटनास्थळावर मुद्दे मालाचा पंचनामा केला आणि जागेवरच किलो काटा आणून जागेवर गाज्याची मोजणी केली असता एकूण 41 किलो गांजा आरोपी अर्पित संजय मालवीय (वय 20) आणि सय्यद अली सय्यद हसन (वय 19) या दोन आरोपींना जवळून जप्त करण्यात आला..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, 18 उपाध्यक्ष, दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड, पृथ्वीराज चव्हाण शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष, अमरजीत मनहास काँग्रेसचे खजिनदार
उल्हासनगरात भाजप नगरसेवकाला काळं फासल्याचं प्रकरण, पाच शिवसैनिकांना अटक आणि जामिनावर सुटका
उल्हासनगरात भाजप नगरसेवकाला काळं फासल्याचं प्रकरण, पाच शिवसैनिकांना अटक आणि जामिनावर सुटका, प्रत्येकी 20 हजारांच्या जातमुचलक्यावर झाली सुटका, शिवसेनेनं पाचही जणांचा न्यायालयाच्या बाहेर केला सत्कार
सोलापुरातील प्रसिद्ध पैलवान अप्पालाल शेख यांचं दीर्घ आजाराने निधन
सोलापुरातील प्रसिद्ध पैलवान अप्पालाल शेख यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. 1991 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अप्पालाल यांना सुवर्ण पदक, तर 1992 साली महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला. जवळपास वर्षभरापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात काही वेळापूर्वी अखेरचा श्वास घेतला असल्याची परिवारातील सदस्यांनी माहिती दिली आहे