Breaking News LIVE : राज्य सरकारने सुरु केली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी, 549 कोटीपेंक्षा अधिक रकमेची औषधे खरेदी करणार
Breaking News LIVE Updates, 23 August 2021 : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं असेल? याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. अशातच आता पुरातत्व विभागानं दिलेल्या विकास आराखड्याला मंदिर समितीनं मंजुरी देत तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे. येत्या 5 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. विठुरायाच्या बाबतीत नाही, घडविला नाही बैसविला ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. विठ्ठल मंदिर हे 11व्या शतकातील असल्याचं अभ्यासक मनात असले, तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे पंढरपुरातील मंदिर अस्तित्वात असल्याचं काही अभ्यासकांचे मत आहे .
आता पुन्हा 700 वर्षांपूर्वीचे मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा बनविला असून पुरातत्व विभागाने गेल्या दोन वर्षांपासून याचा आराखडा बनविण्याचे काम केलं होतं. आता हे काम पूर्ण झालं असून यासाठी 61 कोटी 50 लाखांचा आराखडा मंदिर समितीकडे सोपवला होता. मंदिर समितीनं नुकत्याच झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता हा अंतिम आराखडा मंजुरीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे पाठविला आहे. या आराखड्यानुसार, विठुरायाच्या मंदिराचं काम पाच टप्प्यात केलं जाणार आहे. यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथं दगडांची झीज झाली आहे, अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केलं जाणार आहे. याशिवाय मंदिराचं आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचं काम केलं जाणार आहे. विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणलं जाणार आहे.
नागपुरात गंगा जमुना वस्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्या आमने-सामने
महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचं गृह खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलं, तरी उपराजधानी नागपुरात पोलिसांच्या एका कारवाईसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन महिला नेत्या आमने-सामने आल्या आहेत. एका बाजूला ज्वाला धोटे गंगा जमुना वारंगणांची वस्ती खुली करण्यासाठी आंदोलन करत आहेत. तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आभा पांडे इतर पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह गंगा जमुना वस्ती हटवण्यासाठी आंदोलन करत आहेत. काल (रविवारी) रक्षाबंधनाच्या दिवशी गंगा जमुना या वारंगणाच्या वस्तीसमोर दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर तब्बल दोन तास जबर राडा झाला. दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात आर्थिक लाभापाई आंदोलन उभारण्याचा आरोप करत हा मुद्दा फक्त गंगा जमुना वस्ती पुरता मर्यादित नाहीच, असे संकेतही दिले.
नागपूरच्या मध्यवर्ती भागांत सुमारे दहा एकर परिसरात ही वारंगणांची गंगा जमुना वस्ती विस्तारलेली आहे. उपराजधानी नागपुरात रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वस्तीत सुमारे दोन हजार महिला आणि तरुण मुली देहविक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, 10 ऑगस्ट रोजी पोलिसांनी या वस्तीत छापा घातल्यानंतर आठ अल्पवयीन मुलींकडून बळजबरीनं देहव्यापार करून घेतलं जात असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगा जमुना वस्तीत अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतले जात असल्याचा ठपका ठेवत वस्ती एका वर्षासाठी सील केली.
गंगा जमुना वस्तीत देह व्यवसायाच्या आड अनेक गुन्हेगार अमली पदार्थांचा व्यवसाय आणि गुन्हेगारी कृत्य करतात, असा ठपकाही पोलिसांनी आपल्या कारवाईच्या समर्थनार्थ ठेवला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गेल्या काही दिवसांपासून गंगा जमुना वस्ती सील करण्याच्या पोलिसांच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. 15 ऑगस्ट रोजी ज्वाला धोटे यांनी वस्तीत जाऊन पोलिसांनी लावलेले सर्व बॅरिकेड्स फेकून दिले होते. अशातच काल (रविवारी) रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्वाला धोटे पुन्हा गंगा जमुना वस्तीत पोहोचल्या आणि त्यांनी वारंगणांकडून रक्षासूत्र बांधून घेत, मी तुमची रक्षा करेन, असं आश्वासन दिलं आणि पुन्हा पोलिसांनी लावलेल्या बेरिकेट्सची तोडफोड करत वस्ती खुली करण्याचा प्रयत्न केला.
नारायण राणेंच्या वक्तव्यांनं युवा सेना आक्रमक, नारायण राणेंच्या घरांवर युवा सेना मोर्चा काढण्याची शक्यता
नारायण राणेंच्या वक्तव्यांनं युवा सेना आक्रमक, नारायण राणेंच्या घरांवर युवा सेना मोर्चा काढण्याची शक्यता, सर्व युवा सैनिकांना उद्या जुहू येथे जमण्याचे आदेश
राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
सन 2021 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील खुर्शीद कुतुबुद्दीन शेख, जिल्हा परिषद उच्च प्राथिमक शाळा,आसरअली,ता. सिरोंचा जि.गडचिरोली व उमेश रघुनाथ खोसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जगदांबानगर, कडदोरा ता.उमरगा जि.उस्मानाबाद या दोन शिक्षकांची निवड केद्र शासनाने केली आहे.
दीड कोटीच्या हरभरा आणि तूर घोटाळ्यात सहा जणांना अटक
दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात खळबळ माजवून दिलेल्या कोट्यवधींच्या हरभरा आणि तूर गहिवताल्यातील ६ आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली आहे. या सहा आरोपींना बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील १५ पेक्षा अधिक आरोपी अजूनही फरार आहेत.
राज्य सरकारने सुरु केली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी, 549 कोटीपेंक्षा अधिक रकमेची औषधे खरेदी करणार.
राज्य सरकारने सुरु केली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी असून 549 कोटी 33 लाख 50 हजार रकमेची औषधे खरेदी करणार. ही रक्कम खर्च करण्यास सरकारने दिली मान्यता. या पैशातून आरोग्य विभाग रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब,अॅम्फोटेरिसीन, पॅरासीटेमॉल. ऑक्सीजन मास्क, ऑक्सीजन हूड, आरटीपीसीआर टेस्ट कीट, रॅपिड अंटिजेन टेस्ट कीट ट्रिपल लेयर मास्क, एन-95 मास्क, पीपीई किट, डेड बॉडी सूच अशा 25 वस्तूंची खरेदी करणार. सरकारने या संदर्भातील जीआर जारी केला आहे.
लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांना अखेर जामीन मंजूर
लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांना अखेर जामीन मंजूर झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयानं अटी-शर्तींवर केला जामीन मंजूर केला आहे. दर सोमवारी झनकर यांना ACB कार्यालयात हजेरी बंधनकारक आहे.