एक्स्प्लोर

Breaking News LIVE : रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याचा निर्णय रद्द

Breaking News LIVE Updates, 14 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याचा निर्णय रद्द

Background

राज्यात काल 6,686 नव्या कोरोनाबाधितांची भर तर चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 6,686  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 80 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85टक्के आहे. 

राज्यात काल 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (1), परभणी (40), हिंगोली (81),   नांदेड (51), अमरावती (57), अकोला (37), वाशिम (21),  बुलढाणा (6), यवतमाळ (16), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83),  गडचिरोली (25) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 522 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर, अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू
 राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र,पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत आज जाहीर करण्यात आले आहे.  पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरायचा आहे. तर 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेश अर्ज चा भाग 2 विद्यार्थ्यांना भरायचा आहे. 27 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे. 

कोपरखैरणे पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू,  CID चौकशी सुरु
कोपरखैरणे सेक्टर 19 येथे 22 वर्षाचा तरुण चोरी करताना रंगेहाथ पकडला गेलेल्या तरुणाला स्थानिक नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाण झाल्यावर हा तरुण दोन तास कोपरखैरणे पोलिस ठाणे येथे होता. अचानक या तरुणाला उलट्या झाल्याने व चक्कर आल्याने बेशुध्द अवस्थेत तातडीने या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रुग्णालयाने या तरुणाला मृत घोषित केले. या तरुणाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला की जमावाने मारहाण केली याचा तपास पुणे येथील सीआयडी अधिकारी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पर्यंत करत होते.

कोपरखैरणे येथे गुरुवारी मध्यरात्री एका चोरट्याला चोरी करताना रंगेहाथ जमावाने पकडले. यानंतर पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून पोलिसांना पाचारण करून या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या चोरट्याला पोलिस ठाण्यात दोन तास बसवून ठेवले. हा तरुण जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात बसला असताना अचानक या तरुणाची तब्येत गंभीर झाल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. पोलिसांनी ताबडतोब या तरुणाला घेवून रुग्णालय गाठले. मात्र उपचारासाठी दाखल केल्यावर या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

18:17 PM (IST)  •  14 Aug 2021

रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याचा निर्णय रद्द

रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याचा निर्णय रद्द. काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पत्रकारीतेचा कोर्स हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र, फक्त स्थगितीवर समाधानी न राहता माजी विद्यार्थ्यांकडून हा निर्णय रद्द करण्याची मागणी होत होती.  आज विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव यांची उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर विद्यापीठाकडून हा निर्णय रद्द करण्यात आलाय.

16:41 PM (IST)  •  14 Aug 2021

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत थोड्या वेळात भेट देतायत

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत थोड्या वेळात भेट देतायत. रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारीतेचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कम्युनिकेशन एन्ड मिडीया स्टडीज या डिपार्टमेन्टमधे समाविष्ट करण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला ओता. मात्र, या निर्णयाला रानडे इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांकडून आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाकडून रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याच्या निर्णयाला काल स्थगिती देण्यात आली. मात्र, या वादाची दखल घेत उदय सामंत रानडे इन्स्टिट्यूटला भेट देतायत.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन कळमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार हे रानडे इन्स्टिट्यूटमधे उपस्थित असुन त्यांच्याशी बैठक झाल्यानंतर उदय सामंत पत्रकार परिषद घेणार आहेत.

16:30 PM (IST)  •  14 Aug 2021

गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांचे गंभीर आरोप, 3 दिवस उलटूनही गजानन काळेला अटक करण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ

गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांचे गंभीर आरोप. 3 दिवस उलटूनही गजानन काळेला अटक करण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ. पोलिसांमार्फत सेटलमेंट करण्यासाठी दबाव. गजानन काळे यांनी मनपाच्या आरोग्य व वाहन विभागात केलाय भ्रष्टाचार. मनपामध्ये भरती करून प्रत्येक कामगारामागे घेतले अडीच लाख. पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने केला भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जमवलेल्या करोडोंच्या संपत्तीची चौकशी करा. तक्रार मागे घेण्यासाठी पत्रकारांकडून केली जात आहे मध्यस्थी.

16:27 PM (IST)  •  14 Aug 2021

पाकिस्तानच्या लोकांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी भारतीयांची लस फुकट दिल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप

पुलवामाच्या घटनेत पाकिस्तानने आमच्या देशाच्या अनेक सैनिकांना शहीद केले. अनेक बहिणींच्या कपाळावरचे कुंकू पुसले. त्याच पाकिस्तानच्या लोकांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी भारतीयांची लस फुकट दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. एवढेच नाही तर थेट न बोलता अप्रत्यक्ष शब्दातच पटोले यांनी मोदींच्या या वॅक्सीन डिप्लोमॅसीचा संबंध पुलवामा दशतवादी हल्ल्याशी जोडून मोदींनी पाकिस्तानला तेव्हा मोफत लस देऊन जणू त्यांचे कर्ज फेडले असे आरोपही केले.

16:22 PM (IST)  •  14 Aug 2021

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीरच्या पोलीस कोठडीत वाढ

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीरच्या पोलीस कोठडीत वाढ. आणखी दोन दिवस पोलीस कोठडीची हवा खावी लागणार. वीर यांनी किती बेहिशेबी मालमत्ता गोळा केलीय. बँकेच्या लोकर्समध्ये काय आहे? या याबाबतचा तपास करण्यासाठी मुदतवाढ देण्याची सरकारी पक्षाची मागणी मान्य. अन्य दोघा संशयिताच्या जामीन अर्जावरील निर्णय सोमवारपर्यंत राखीव ठेवण्यात आला आहे. वैशाली वीरसह इतर दोघांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयातBaba Siddique Dead Update | बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात बिश्नाई गँगच्या अॅगलने पोलिसांचा तपास सुरुEknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget