एक्स्प्लोर

Breaking News LIVE : प्रवाशांना भूलथापा देऊन लूटणाऱ्या दोन तरुणांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचकडून अटक

Breaking News LIVE Updates, 1 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : प्रवाशांना भूलथापा देऊन लूटणाऱ्या दोन तरुणांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचकडून अटक

Background

Zika Virus: झिका व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री! काय आहेत या आजाराची लक्षणं, काय घ्यावी काळजी
महाराष्ट्र कोरोना रोगाच्या कचाट्यातून सुटत असताना महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.  कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रातील एका गावातील व्यक्तिला झिका नावाच्या विषाणुची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली गेली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 55 वर्षीय महिलेत झिका विषाणू आढळला होता. तो रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झिका विषाणू जीव घेणा नसला तरी तरी महिलांवर त्याचा मोठा फटका बसू शकतो.. सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.  

 राज्यात शनीवारी 7, 467 रुग्णांना डिस्चार्ज, 6,959 रुग्णांची भर; 32 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
 राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून नऊ हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज  6,959 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.  राज्यात आतापर्यंत 60 लाख 90 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के आहे. 

राज्यात आज 225 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 76  हजार 755 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (72), वाशिम (86), गडचिरोली (15)   या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 674 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

Pune : ती ऑडिओ क्लिप बनावट, हप्तेखोरीचं रॅकेट उद्ध्वस्त केल्यामुळे माझ्याविरोधात षडयंत्र: पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे
फुकट बिर्याणीची मागणी करण्याचा आरोप असलेल्या पुण्यातील पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी आता त्यांची बाजू एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. बिर्याणीबद्दल व्हायरल झालेली आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिलेली ती ऑडिओ क्लिप मॉर्फ्ड अर्थात बनावट असल्याचा दावा आयपीएस अधिकारी असलेल्या प्रियांका नारनवरे यांनी केलाय.  

त्याचबरोबर त्या ज्या झोनच्या पोलीस उपायुक्त आहेत तिथे मागील बारा वर्षांपासून सुरु असलेले वसुलीचे रॅकेट आपण उद्धस्त केल्यामुळेच आपल्याविरुद्ध बनावट क्लिपच्या सहाय्याने कट रचण्यात आल्याचा आणि त्याला पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. आपली बदली व्हावी यासाठी हे कारस्थान रचलं गेल्याच प्रियांका नारनवरे यांनी म्हटलंय.

19:29 PM (IST)  •  01 Aug 2021

Corona Update : राज्यात आज 6479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांची कोरोनावर मात, आज एकूण 157 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद

Corona Update : राज्यात आज 6479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांची कोरोनावर मात, आज एकूण 157 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद

18:23 PM (IST)  •  01 Aug 2021

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात भरदिवसा एकाची गोळ्या झाडून हत्या

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात भरदिवसा एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. ओंकार बाणखेले असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात अज्ञातांनी गोळी घातली आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दुपारी दीड ते दोनच्या सुमारासची ही घटना आहे. ओंकार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येतोय. मंचर पोलीस तिघांचा शोध घेतायेत. एकलारे गावाजवळ ओंकार आणि त्याचा मित्र दुचाकीवरून निघाले होते. तेंव्हा मागून एक दुचाकी आली. त्यावर बसलेल्या तिघांनी ओंकारची गाडी थांबवली आणि डोक्यावर बंदूक रोखून गोळी झाडली. ओंकारच्या साथीदाराला मात्र त्यांनी हात लावलेला नाही, अशी माहिती मिळत आहे. मंचर पोलीस तिघांचा शोध घेत आहे. गृहमंत्र्यांच्या आंबेगाव मतदार संघात गुन्हेगारी उफाळून आल्याचं यानिमित्ताने दिसून येतंय. याआधी 25 मे च्या रात्री दोघांच्या हत्या झाल्या होत्या.

18:24 PM (IST)  •  01 Aug 2021

पलुस तालुक्यातील दुधोंडी गावातील वसंतनगर भागात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून 3 जणांचा खून

पलुस तालुक्यातील दुधोंडी गावातील वसंतनगर भागात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून 3 जणांचा खून, 2 जण गंभीर तर तीनजण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल.
 
16:34 PM (IST)  •  01 Aug 2021

प्रवाशांना भूलथापा देऊन लूटणाऱ्या दोन तरुणांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचकडून अटक

प्रवाशांना भूलथापा देऊन लूटणाऱ्या दोन तरुणांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने अटक केली आहे. आरोपी हे प्रवाशाला विद्याविहारला घेऊन गेले. त्याठिकाणी त्याला चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील रोकड आणि वस्तू घेऊन पसार झाले होते. मात्र, सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोघांना अवघ्या 18 तासात अटक करण्यात आली आहे. नदीम शहा आणि मुकेश पिंपळीसकर अशी आरोपींची नावे आहेत.

14:19 PM (IST)  •  01 Aug 2021

नागपूर संघ मुख्यालयाजवळ भाजप- काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर येऊन आपापसात भिडले

नागपूर संघ मुख्यालयाजवळ भाजप- काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर येऊन आपापसात भिडले होते.

स्थानिक काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई, बेरोजगारी विरोधात काढलेली  बाईक रॅली संघ मुख्यालयाजवळून नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र काँग्रेस कार्यकर्ते त्या अरुंद गल्लीतून रॅली नेण्यावर अडून राहिल्यामुळे तिथे तणाव निर्माण होऊन शाब्दिक वादावादी व धक्काबुक्की झाली...

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget