Breaking News LIVE : 'एफआरपी'ची मोडतोड केल्यास देशभर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल - राजू शेट्टी
Breaking News LIVE Updates, 24 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
मोठा दिलासा, राज्यात 74, 045 रुग्ण बरे होऊन घरी, 66,836 नवीन रुग्णांचे निदान तर 773 मृत्यू
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. आज 66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 74 हजार 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 04 हजार 792 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.81 टक्के झाले आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.
एकही लस उपलब्ध नाही, ठाण्यातील लसीकरण ठप्प
एकीकडे बेड मिळेना, ऑक्सिजन मिळेना आणि इंजेक्शन मिळेना तरीही ठाणेकरांचे लसीकरण मात्र सुरु होते. तर शुक्रवारी (23 एप्रिल) ठाण्यातील लसीकरण केंद्रे देखील दुपारी 12 वाजताच साठा संपल्याने बंद करण्यात आली. ठाण्यात शुक्रवारी लसींचा साठा शून्य होता. त्यामुळे लसीकरणासाठी मोठी गर्दी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालय आणि पालिकेच्या पाच लसीकरण केंद्रावर दिसली. तसेच लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होताना दिसली.
मुंबईत रस्त्यावर विनामास्क क्रिकेट खेळणाऱ्या 20 वर्षीय मुलाला कोर्टानं जामीन नाकारला
राज्यातील कोरोनाची भयंकर परिस्थिती आणि विशेषत: मुंबईतील तीव्रता लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मुंबईसह राज्यभरात कलम 144 लागू (संचारबंदी) केलं आहे. अशा गंभीर परिस्थितीत आरोपी इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. तेही मास्क न घालता हे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघनच आहे. तसेच आरोपीनं मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता कायदाही हातात घेतला आहे. तो जरी 20 वर्षांचा असल्यानं त्याला सद्यपरिस्थितीची जाणीव असणं गरजेचं आहे. त्यासोबतच घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं भान असणंही आवश्यक आहे. त्यामुळे अर्जदाराला जामीन दिल्यास सर्वसामान्यांसमोर चुकीचा संदेश जाऊ शकतो. असं स्पष्ट करत न्यायालयानं युवकाचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
पिंपरी चिंचवड शहरात सूचना फलक कोसळला
पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी सूचना फलक कोसळला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हे सूचना फलक होता. या फलकाखाली वाहनं आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. आता हा मार्ग बंद करण्यात आला असून वाहतूक वळविण्यात आलेली आहे. हे फलक बाजूला घेतल्यावर वाहतूक पूर्ववत होईल.
'एफआरपी'ची मोडतोड केल्यास देशभर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल -राजू शेट्टी
केंद्र सरकारने 'एफआरपी'ची मोडतोड करून तुकड्या देण्याचा घाट घातला
'एफआरपी'ची मोडतोड केल्यास देशभर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल
महाविकास आघाडीने केंद्राचा निर्णय लागू केल्यास पत्त्याप्रमाणे राज्य सरकार भुईसपाट होईल
माजी खासदार राजू शेट्टी यांचा महाविकासआघाडीला इशारा
राज्यात आज 67160 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
राज्यात आज 67160 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 63818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3468610 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 694480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02% झाले आहे.
रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटून चांदी व्यापाऱ्याचा मुलगा ठार
रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटून चांदी व्यापाऱ्याचा मुलगा ठार, कोल्हापूरच्या हुपरीतील आज दुपारी घडला धक्कादायक प्रकार, सागर सुनील गाट असं मृत तरुणाचं नाव, घटनास्थळी पोलिसांची धाव, तपास सुरू,
सुनील गाट यांनी स्वसंरक्षणासाठी घेतला होती रिव्हॉल्व्हर