Breaking News LIVE : मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज यांचे कोरोनामुळे निधन
Breaking News LIVE Updates, 15 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 'ब्रेक दि चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
Maharashtra Lockdown:एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही, मात्र...
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत 15 दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली. बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं असून पुढील 15 दिवसांसाठी संचारबंदी असेल. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना अनेक महत्वाचे प्रश्न पडले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज आहे की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावं लागणार आहे.
उस्मानाबादेत एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार, जागा अपुरी पडल्याने 8 मृतदेहांचा आज अंत्यविधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत आहे. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत याची प्रचिती आली. उस्मानाबाद स्मशानभूमीत आज कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळालं. बुधवारी एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आले. तर 8 मृतदेहांवर आज अंत्यविधी करण्यात येणार आहेत. हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या. उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत बुधवारी 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय, हे कुणा येरा गबाळ्याचं काम नाही; अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
पंढरपूर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दात आज अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट निशाणा साधला. बुधवारी संध्याकाळी पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी उमेदवार भागीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. आजवर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतक्या थेट शब्दात कधी बोलले नव्हते. मात्र आजची राष्ट्रवादीची सभा ही फडणवीसांच्या सभेला उत्तर देणारी सभा ठरली. या सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या भाषणाचा रोख हा फडणवीस यांच्या वक्तव्यावर होता.
मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज (वय 47) यांचे कोरोनामुळे गुरुवारी संध्याकाळी कांदिवली येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारा आघाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज (वय 47) यांचे कोरोनामुळे गुरुवारी संध्याकाळी कांदिवली येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारा आघाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.
यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.
केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद
केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद. ताजमहाल, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार.